Thursday 22 June 2017

पीएफसाठी पॅन-यूएएन मध्ये साम्य आवश्यक



अहमदाबाद,दि.22 : पॅन, आधार आणि यूएएन (यूनिव्हर्सल अकाउंट नंबर) यांच्या माहितीत काही फरक असल्यास आॅनलाइन पीएफ काढता येणार नाही. त्यामुळेच आॅनलाइन पीएफ काढण्याची सुविधा असूनही अनेक कर्मचाऱ्यांना पीएफ आॅफिसमध्ये जावे लागेल.
आॅनलाइन पीएफ काढण्यासाठी ईपीएफओच्या वेबसाइटवर केवायसी अपलोड करावे लागते. खातेधारकांना बँक अकाउंट क्रमांक, पॅन, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स, मतदान कार्ड आदी माहिती वेबसाइटवर द्यावी लागते. परंतु ही माहिती देताना काही खातेधारकांच्या पॅन आणि आधार कार्ड यात नावात वा अन्य माहितीत फरक असल्यास ती माहिती स्वीकारली जात नाही. त्यामुळे आॅनलाइन पीएफही काढता येत नाही.
ईपीएफओच्या टेक्निकल डिपार्टमेंटचे राजेश पिल्लई यांनी याचे मुख्य कारण सांगितले की, यूएएन, पॅन आणि आधार यांची माहिती एकमेकांशी मिळतीजुळती असायला हवी. अन्यथा सीस्टिम ही माहिती स्वीकारत नाही. त्यामुळे ईपीएफओच्या वेबसाइटवर केवायसी अपलोडही करता येणार नाही.
ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी ईपीएफओने अहमदाबादच्या कार्यालयात आधार केंद्र उघडले आहेत. जर आधार, पॅन यावर आपले नाव एकसारखे नाही, तर आधार कार्ड घेऊन आपण एखाद्या सेंटर्सवर जाऊ शकता. आपले बायोमेट्रिक तपासून या माहितीत बदल करून दिले जातात. सध्या ईपीएफओच्या मनीनगर, नरोडा आणि आयकर कार्यालयांमध्ये ही सुविधा दिली जाते. ईपीएफओ लवकरच यासाठी शहरांमध्ये शिबिरे आयोजित करणार आहे.
पीएफ काढण्यासाठी भरण्यात येणाऱ्या फॉर्मवर आपल्या नियोक्त्यांची सही असायला हवी, तसेच आवश्यक कागदपत्रेही जोडायला हवीत. काही प्रकरणात नियोक्ता सही करण्यास नकार देतात. अशा वेळी ईपीएफओ वेबसाइटच्या लॉग इनवर जावे आणि आपले यूएएन व पासवर्ड लॉगइन करावा. सर्व माहिती आॅनलाइन भरावी. ही माहिती अपलोड केल्यानंतरही नियोक्ता सही करण्यास नकार देत असेल, तर आपण पीएफ आॅफिसमध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकता, असा सल्ला पीएफबाबतचे सल्लागार अमित पटेल यांनी दिला आहे.
आॅनलाइन केवायसी दाखल करण्यासाठी आपल्याला आधार, पॅन व यूएएन यातील त्रुटीत सुधारणा करावी लागेल. यासाठी आपण ईपीएफओच्या वेबासाइटवर जॉइंट डिक्लरेशन फॉर्म भरू शकता. तो पीएफ आॅफिसमध्ये जमा केल्यानंतर, यूएएन डेटाबेसमधील माहितीत सुधारणा करता येईल. त्यानंतर आपण आॅनलाइन केवायसी जमा करू शकता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...