Wednesday 14 June 2017

मनोहरभाई पटेल विद्यालयाचे सुयश

देवरी,दि.१४- स्थानिक मनोहरभाई पटेल विद्यालयाचा यंदाचा दहावीचा निकाल ८१ टक्के लागला आहे.
यंदा नागपूर बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत स्थानिक मनोहरभाई पटेल विद्यालयाचे २०५ विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये १७ विद्याथ्र्यांनी प्रावीण्य सूचित स्थान मिळविले असून ४७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ७८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २५ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. नीतिश रमेश चौधरी या विद्याथ्र्याने ९०.४० टक्के गुण घेत प्रथम क्रमांक पटकाविला.तर रिद्धी वाडीभस्मे हिने ८९.६० तर सलोनी बागडे हिने ८९.४० टक्के गुण संपादन करून अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान मिळविले. संस्था सचिव वासुदेव गजभिये, मुख्याध्यापक के.सी शहारे, उपमुख्याध्यापक के.बी. गोंडाणे. पर्यवेक्षक एस.टी. हलमारे यांचे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाèयांनी उत्तीर्ण विद्याथ्र्याचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...