Friday, 23 June 2017

'मेरा घर, भाजप का घर': घरांवर भाजपच्या सक्तीच्या घोषणा



भोपाळ,दि.22(वृत्तसंस्था) : भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील घरांवर ‘मेरा घर, भाजपा का घर’ अशा घोषणा लिहिल्या आहेत. भोपाळवासीयांनी या प्रकाराविरोधात तक्रार केली असून, घोषणा रंगवण्यापूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांना कल्पनाही दिली नाही किंवा कोणाची परवानगी घेतली नाही, असे त्यांनी सांगितले.
भाजपकडून प्रसिद्धीसाठी काहीही करण्याचा हा प्रकार करण्यात येत असल्याची टीका होत आहे. लोंकांनी भाजप कार्यकर्त्यांच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला असल्याचे वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील अनेक घरांच्या बाहेर भिंतीवर निळ्या रंगात मेरा घर भाजपा का घर असे लिहिले आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह इतका शिगेला पोचला की, त्यांनी ही घोषणा काँग्रेस नेते प्यारे खान यांच्या घरावरही रंगवली. याबाबत भाजप नेत्यांना विचारले असता, त्यांनी कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. उत्साहाच्या भरात कधी कधी असे करतात असे म्हणत त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजप नेते राहुल कोठारी म्हणाले, "यात काही चुकीचे नसून, या भागात आम्ही विकास केला आहे त्यामुळे अशा घोषणा कार्यकर्ते उत्साहात रंगवतात."

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...