Thursday 1 June 2017

चोवीस तासात औषधसाठा उपलब्ध न केल्यास आंदोलन-चांदेवार यांचा इशारा



देवरी,दि.01 : देवरी तालुका नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहूल आहे. मात्र तालुक्यातील अधिकारी विकासाप्रती सूस्त आहेत. येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. परंतु, येथील उपजिल्हा रूग्णालयात गेलया तीन महिन्यांपासून औषधींचा तुटवडा आहे. रूग्णाना खासगी दुकानांतून औषध खरेदी करावी लागत आहे. यासंदर्भात शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी जि.प.सदस्य राजेश चांदेवार यांनी वरिष्ठांशी संपर्क करून २४ तासात औषधे उपलब्ध करून द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पावसाळ्यात अतिसाराची लागण होते. त्यातच देवरी येथून राष्टÑीय महामार्ग गेल्या असल्याने येथील ग्रामीण रूग्णालयावर आरोग्याची मोठी भिस्त आहे. त्यादृष्टीने हे रूग्णालय औषधे आणि मनुष्यबळाने परिपूर्ण असणे आवश्यक आहे. त्याकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी देखील पुरविण्यात येते. तालुका नक्षलग्रस्तरित्या अतिसंवेदनशील असल्यामुळे शासनाच्या निधीत अधिकच भर पडते. मात्र, रूग्णालयातील अव्यस्था पाहता तो निधी जातो कुठे, हा प्रश्नच आहे.
पावसाळा सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक आहे. त्यादृष्टीने रूग्णालय प्रशासन सज्ज असणे आवश्यक आहे. परंतु गेल्या तीन महिन्यापासून रूग्णालयात सलाईन आणि इतर औषधांचा साठा उपलब्ध नाही. येथील डॉक्टर रूग्णांना बाहेरून औषधे खरेदी करून आणण्यास सांगतात. देवरी उपजिल्हा रूग्णालय प्रशासनच औषधांच्या तुटवड्याला जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ही बाब माहित होताच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश चांदेवार यांनी आरोग्य विभाग नागपूरचे उपसंचालक अग्रवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पातूरकर आणि उपजिल्हा रूग्णालयाचे डॉ. धुमनखेडे यांच्याशी संपर्क करून तत्काळ औषध उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच येत्या २४ तासात पुरेसा औषधसाठा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश चांदेवार यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...