Saturday 17 June 2017

नागपूरात 28 जूनला ओबीसी परिषदेचे आयोजन


नागपूर,दि16-राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या 28 जून रोज बुधवारला शिवाजी विज्ञान महाविद्यालय,काँग्रेसनगर नागपूरच्या सभागृहात सायकांळी 5 वाजता ओबीसी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या ओबीसी परिषदेला मुख्य मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष माजी न्यायमुर्ती व्ही ईश्वरैय्या उपस्थित राहणार आहेत.या परिषदेचे उदघाटन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य डाॅ.बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले,आमदार सुनिल केदार,आमदार डाॅ.परिणय फुके,प्राचार्य अशोक जिवतोडे उपस्थित राहणार आहेत.या ओबीसी परिषदेला विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते,अधिकारी,कर्मचारी,विद्यार्थी,शेतकरी ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सचिन राजुरकर,खेमेंद्र कटरे,शरद वानखेडे,मनोज चव्हाण,गुणेश्वर आरीकर,सुषमा भड,शेषराव येलेकर,अजय तुमसरे,बबलू कटरे,संजय पन्नासे,कृष्णा देवासे,गोपाल सेलोकर,संजय माफले,संजय पिदुरकर,रेखा बारहाते,उज्वला महल्ले,शुभांगी मेश्राम,राजू ख़़डसे,पंकज पांडे आदींनी केले आहे.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...