Wednesday 7 June 2017

शॉक लागून मजुराचा मृत्यू

गोंदिया,दि.07- गोंदिया तालुक्यातील कारंजा येथील कृषी विभागाच्या कृषी अनुषंधान केंद्रातील एका कामगाराचा आज दुपारी दोनच्या सुमारास विजेचा शाॅक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर मजूराचे नाव श्रीकिसन उर्फ नवली छोटेलाल लिल्हारे (रा. कारंजा वय 50) असे आहे.सदर मजूर हा कृषीफार्म येथे गेल्या काही दिवसापासून कामावर होता.आज तो आतमध्ये आलेली जनावरे हाकलण्यासाठी शेततळ्याकडे गेला असता कृषीफार्ममधून विज वितरण कंपनीच्या 33 केव्हीच्या तुटलेल्या तारेच्या संपर्कात आल्याने त्याला शाॅक लागला.सदर मजूर का येत नाही म्हणून बघण्यासाठी इतर मजूर गेले असता त्यांना धुर निघत असल्याचे दिसून आले जवळ जाऊन बघितल्यावर लिल्हारे हे विजेचा शाॅक लागल्याने तडफडत असल्याचे लक्षात येताच तेथील अधिकार्यांना माहिती दिली.अधिकारी येईपर्यंत लिल्हारेचा मृत्यू झालेला होता.सदर मृत मजुराचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून कृषी विभागासह महावितरण कंपनीकडून त्यांच्या कुटूबिंयाना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.उपविभागीय कृषी अधिकारी नाईनवाडे हे स्वत मजूराच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीच्यावेळी हजर होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...