Friday 28 June 2019

मानव तस्करीचा पर्दाफाश : ३३ मुलांची राजनांदगाव रेल्वेस्थानकावर सुटका

राजनांदगाव(विशेष प्रतिनिधी)दि.28-ः हावडा-मुंबई मेलद्वारे बिहार राज्यातून ३३ अल्पवयीन मुलांना रेल्वेने मुंबईला घेऊन जात असतांना सजग प्रवाशांच्या जागृकतेमुळे बुधवारी सुटका करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारावर आरपीएफ व पोलिसांनी छत्तीसगड येथील राजनांदगाव रेल्वेस्टेशनवरून या मुलांची सुटका करून मानव तस्करीचा पर्दाफाश केला.
बिहार येथील भागलपूर जिल्ह्यातील तिरपैती गावातील आहेत. त्यांना हावडा ते मुंबई जात असलेल्या हावडा मेलच्या बोगी क्रमांक एस-५ आणि एस-७ मधून नंदूरबार/मुबंई येथे घेऊन जात होते. अ‍ॅड. स्मिता पांडे यांच्यासह काही महिला वकील रायपूर येथून राजनांदगावला जात होत्या. एका व्यक्तीसोबत इतक्या मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुलांना पाहून त्यांना संशय आला. त्यांनी विचारपूस केली तेव्हा त्यांचा संशय आणखी बळावला. आम्ही ऊर्दू शिकायला चाललो असे सांगितले परंतु तसे काही पुरावे न देऊ शकल्याने त्यांनी पोलिसांना कळविले. पोलीसही सूचना मिळताच  पोलीस तातडीने राजनांदगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तेथील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर हावडा वरून मुंबईला जात असलेली हावडा-मेल रेल्वेगाडी थांबताच बोगी क्रमांक एस-५ व एस-७ मधील मुलांना खाली उतरवण्यात आले. यासोबतच इतर मुलांना घेऊन जात असलेल्यां इसमालाही उतरवण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व मुले ७ ते १३ वर्ष वयोगटातील आहेत. मुलांसोबत पकडण्यात आलेल्या आरोपीचे म्हणणे आहे की, या सर्व मुलांना मदरस्यात घेऊन जात आहे. परंतु आरोपी कुठल्याही प्रकारचे दस्तावेज दाखवत नाही आहे. आरपीएफने सर्व मुलांना आपल्यासोबत नेले. मुलांची विचारपूस सुरू आहे.
मानव तस्करीची शंका
पोलीस अधिकारी यू.बी.एस. चौहान यांचे म्हणणे आहे की, मानव तस्करीची शंका नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. तपासानंतरच प्रकरण नेमके काय आहे ते उघडकीस येईल. पकडण्यात आलेले सर्व लोक एकाच समुदायातील आहेत. ही बाब लक्षात ठेवूनही तपास केला जात आहे.

वीज कोसळून आठ विद्यार्थी जखमी

नागपूर,दि.28ः- जिल्ह्यातील रामटेक पंचायत समितींतर्गत येत असलेल्या आसोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर गुरुवारला सायकांळी 4 वाजेच्या सुमारास विज कोसळल्याने 8 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली.त्यातील 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्याव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.जखमी विद्यार्थी हे पहिली ते चौथ्या वर्गाचे आहेत.यात एक शिक्षिकाही जखमी झाली असून सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही.

सागवान भरलेला मिनीट्रक पकडलाः देवरी पोलिसांची कारवाई


देवरी,दि,28- शेंडा परिसरात गस्तीवर असताना देवरी पोलिसांनी सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या चोरट्यांचा एक मिनीट्रक पुतळीच्या जंगलात पकडला. ही घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास रात्री अडीचच्या सुमारास घडली.
सविस्तर असे की, देवरी पोलिसांची एक चमू ठाणेदार कमलेश बच्छाव यांच्या नेतृत्वात शेंडा परिसरात गस्तीवर होती. दरम्यान, पुतळीच्या जंगलातून जात असताना रस्त्याच्या एका बाजूला प्रकाशाचा झोत चमकल्याने पोलिस चमू सतर्क झाली. त्या जागेचा कानोसा घेत पोलिस पथक घटना स्थळाकडे येत असल्याचे पाहून वन तस्करांनी तिथून पळ काढला. मात्र, सागवानाचे सुमारे सहा लाकडे भरून असलेला टाटा अश क्र. MH 35 K 5503 हा पोलिसांच्या हाती लागला. सदर मिनीट्रक हा पोलिसांनी सडकअर्जूनी वनविभागाच्या स्वाधीन केला. या प्रकरणी वनविभाग काय कार्यवाही करते,या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. उल्लेखनीय म्हणजे शेंडा आणि लगतच्या जंगलातून होणाऱ्या वनतस्करीवर वनविभागाचे वचक राहिले नसल्याने वनतस्करांचे चांगलेच फावत असल्याची चर्चा सडक अर्जूनी तालुक्यात आहे. वनविभागाच्या सुस्त कारभारामुळे जंगलांचे अस्तित्व धोक्यात आल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्याने देवरी पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. ठाणेदार कमलेश बच्छाव यांचेसह हेड कांस्टेबल राऊत, वसंत देसाई आणि पीएन चौधरी यांनी ही कार्यवाही केली.




Wednesday 26 June 2019

राष्ट्रीय युवा क्रीडा महोत्सवात ब्लॉसम स्कुलच्या दक्ष गवते ला सुवर्ण पदक

देवरी: 26 
तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कुलचा 9 व्या वर्गातील विद्यार्थी दक्ष सुरेश गवते यांनी शाळेचे प्रतिनिधित्व करत ताईकांडो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून गौरवास्पद कामगिरी केलेली आहे. 3 रे राष्ट्रीय युवा क्रीडा महोत्सव नुकताच 23 जून ते 25 जून या कालावधीत भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी तालुका क्रीडा संकुलात पार पडला. या मध्ये  ब्लॉसम स्कुलच्या दक्ष गवते यांनी आपल्या कौशल्य पणास लावत राष्ट्रीय स्पर्धे मध्ये सुवर्ण पदक पटकावलेला असून त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा थाईलँड या देशात आयोजित करण्यात आलेली असून दक्ष ने स्पर्धे कडे लक्ष केंदित केलेले आहे.
दक्ष ने या अगोदर तालुका, जिल्हा , राज्य तसेच अनेक राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवलेला असून शाळेचा व पालकांचा नाव रोशन केलेला आहे.
सदर यशाचे श्रेय त्याचे क्रीडा शिक्षक, शाळेचे प्राचार्य डॉ सुजित टेटे, शिक्षक , वडील सुरेश गवते आणि कुटुंबियांना दिलेला आहे.

26 जून ते 2 जुलै 2019 बेरार टाईम्सचा अंक व ताज्या बातम्यासांठी क्लिक करा http://berartimes.com





Monday 24 June 2019

सावली येथे घराच्या छतावरून पडून युवतीचा अपघाती मृत्यू

देवरी, दि.24- देवरी तालुक्यातील सावली येथील एका युवतीचा आपल्या घराच्या छतावरून पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे दहाच्या सुमारास घडल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे.
मृत युवतीचे नाव दीक्षा देवनाथ बिंझलेकर (वय 24) असे आहे.

सविस्तर असे की. मृत दीक्षा ही आज काही कामानिमित्त घराच्या छतावर गेली असल्याचे सांगण्यात येते. छतावरून तिचा तोल गेल्याने ती खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केद्रात उपचारासाठी नेले असता तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सदर युवती ही व्यवसायाने इंजिनिअर असून ती नागपूरच्या एका खासगी कंपनी कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यात तिचा साखरपुडा गोंदिया तालुक्यातील तुमखेडा येथील युवकाशी झाला होता. या घटनेने सावली गावात शोककळा पसरली आहे.

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा तडकाफडकी राजीनामा


Rbis Deputy Governor Viral Acharya resigns Six Months Before His Term Ends | सात महिन्यांमध्ये आरबीआयला दुसरा धक्का; डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा तडकाफडकी राजीनामा
नवी दिल्ली.दि.24: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य आचार्य यांचा कार्यकाळ संपण्यास सहा महिन्यांचा अवधी शिल्लक असताना त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 2017 मध्ये आचार्य आरबीआयच्या सेवेत दाखल झालेले आचार्य यांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा आरबीआयला सात महिन्यांमध्ये बसलेला दुसरा धक्का आहे. त्याआधी डिसेंबरमध्ये उर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारण देत गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता.
विरल आचार्य हे उर्जित पटेल यांच्या टीमचे महत्त्वाचे घटक होते. मात्र, त्यांनीही पटेल यांच्या प्रमाणेच कार्यकाळ संपण्याआधी राजीनामा दिला. 23 जानेवारी 2017 रोजी आचार्य आरबीआयच्या सेवेत रुजू झाले. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा होता. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर सरकारने शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी नियुक्ती केली. मात्र दास आणि विरल यांच्या मतांमध्ये बरंच अंतर होतं. पतधोरण निश्चित करण्यासाठी झालेल्या मागील दोन बैठकांमध्ये महागाई आणि विकास दर या मुद्द्यांवरुन दोघांचे मतभेद समोर आले होते. नुकत्याच झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत वाढत्या महसुली तुटीवरुन आचार्य यांनी मांडलेली मतं दास यांच्यापेक्षा वेगळी होती. 
आरबीआयचे वरिष्ठ डेप्युटी गव्हर्नर एन. विश्वनाथन यांचा कार्यकाळदेखील लवकरच संपणार आहे. मात्र आचार्य यांनी अचानक राजीनामा दिल्यानं त्यांचा कार्यकाळ वाढवला जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता राखणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी गेल्या वर्षी व्यक्त केलं होतं. त्यामुळे ते चर्चेत आले होते. 



Saturday 22 June 2019

नाली बांधकामात होत आहे दिरंगाई

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे बेजबाबदारपणा
प्रभाग 13 तील नगर पंचायत  सदस्य भूमिता बागडे यांचा सुद्धा दुर्लक्ष
देवरी:- स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने प्रभाग क्रमांक १३ मध्ये दोन्ही बाजूच्या नालीचे बांधकाम व सिमेंट रस्त्याचे बांधकाम दलीतवस्ती फंडातुन मंजूर करण्यात आले आहे, कामाला जवळपास 2 महिना झाले असून सुदधा आतापर्यंत 200 मीटर नालीचे बांधकाम पूर्ण झाले नाही, बांधकाम साहित्य रस्त्यावर असल्याने तसेच नालीत रेती पडून असल्याने *2 महिन्यापासून नालीत पाणी साचल्याने जंतू निर्माण झाले आहेत त्यामुळे रोग पसरण्याची शक्यता आहे*
 या प्रभागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे नगर पंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे
सदर परिसरात दाट वस्तीचे घरे आहेत. या घरातील लोकांना अर्धवट कामामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत  आहे.
सदर बांधकाम जलद गतीने व्हावा म्हणून वारंवार पालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांना सांगून सुद्धा कंत्राटदाराकडून या कामात गती दिसून येत नाही.
पालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी मोहन डोंगरे, उमेश येरपुडे, आशिष डोंगरे, आस्तिक येरपुडे,गुणीलाल शहारे, सुमित्राबाई गिऱ्हेपुंजे, जनाबाई येरणे, भागणबाई वट्टी यांच्यासह प्रभागवासीयांनी केली आहे. तसेच कामाची गती वाढवून उत्कृष्ट दर्जाचा काम नाही झाल्यास काम बंद करण्याचे चर्चा प्रभात सुरू आहे,

मुख्यकार्यकारी अधिकारी नगर पंचायत देवरी: राजेंद्र चिखलखुनदे :- कंत्राटदार स्वतःची मनमर्जी करत आहे, वारंवार सांगून सुद्धा दुर्लक्ष करत आहे, सदर कंत्राटदार बबलू डोये आहे, असे सांगितले

Friday 21 June 2019

देवरीचा योजन कावळे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात पहिला


जिल्हा परिषद शाळेची उत्तम कामगिरी

देवरी,दि.21- यावर्षी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत देवरीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी योजन धनवंत कावळे याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून विनीत पालीवाल तृतीय स्थानी तर डेलिया सयाम यांनी गुणवत्ता यादीत 43वे स्थान पटकाविले आहे. उल्लेखनीय योजन काŸवळेसह प्रेरणा आचले यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून हे सर्व विद्यार्थी देवरीतील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहेत, हे विशेष. 
उल्लेखनीय म्हणजे गतवैभवप्राप्त असलेल्या  जिल्हा परिषदेच्या या शाळेत कधीकाळी अडीच हजारावर विद्यार्थी ज्ञानार्जन करीत होते. परंतु, ख्यातनाम असलेली ही शाळा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृतप्राय अवस्थेत गेली होती. मात्र, सद्य स्थितीत या शाळेला चांगले दिवस येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या शाळेतील कार्यरत शिक्षक एम के सयाम आणि आशिष वाघदेवे हे दोघेही सुटीच्या दिवशी सुद्धा विद्यादानाचे कार्य अविरत करीत असल्याचे सांगण्यात येते. या शाळेत विद्यार्थ्यांना धडे देण्यासाठी नवनवीन उपक्रम, अ‍ॅप्स आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत चांगली वाढ झाल्याचे पालकवर्गाचे म्हणणे आहे.
शिक्षण विभागाने घेतलेल्या पुढाकारामुळे आज देवरीतील मृतप्राय झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून यावर्षीच्या  शिष्यवृत्ती परीक्षा आणि नवोदय प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.  शिष्यवृत्ती परीक्षेत प्राथमिक विभागातून योजन धनंजय कावळे हा जिल्ह्यातून प्रथम, विनीत पालीवाल तृतीय आणि डेलिया सयाम ही 43 व्या स्थानी आली आले. यातील योजन कावळे सह प्रेरणा देवानंद आचले यांची नवोदयसाठी निवड झाली आहे.
देवरीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले. नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

पोलीस अधिकारी शैलेश काळे निलंबितः मुंडेच्या प्रश्नावर केसरकरांची माहिती




मुंबई (विशेष प्रतिनिधी), दि.२१ - गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेडा भूसुरुंग स्फोट प्रकरणी तत्कालीन पोलिस उपविभागीय अधिकारी शैलेष काळे यांना निलंबित केल्याची माहिती गृहराज्यमंत्री दिलीप केसरकर यांनी विधान सभेत दिली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ना. केसरकर हे उत्तर देत होते.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात 1 मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात 15 पोलीस जवानांना व एका खासगी वाहनचालकाला प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिकाऱ्यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस दलाकडे 34 भूसुरूंग रोधक वाहने असताना ‘क्युआरटी’च्या (शिघ्र प्रतिसाद पथक) 15 जवानांसाठी त्यापैकी एकही वाहन का उपलब्ध होऊ शकले नाही. हे वाहन असते तर भूसुरूंग स्फोटाची झळ कमी जीवित हानी टाळणे शक्य झाले असते, असा कयास लावण्यात येत आहे. याप्रकरणी विधानसभेत विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे  यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करुन लक्ष वेधले.त्यानंतर या हल्ल्यातील 15 पोलीस जवानांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले तत्कालीन एसडीपीओ शैलेश काळे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी विधानसभेच्या अधिवेशनात दिली. तसेच, या हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्याची कारवाई 8 दिवसात सुरू होईल, असेही केसरकर यांनी म्हटले.
मुंडे यांनी विधानपरिषेदत प्रश्न उपस्थित केला. या हल्ल्यास जबाबदार असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी डीवायएसपी शैलेश काळेवर कडक कारवाईची/निलंबनाची आणि हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचीही मागणी मुंडे यांनी केली होती. या दोन्ही मागण्या मान्य करताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी डीवायएसपी काळे यांस निलंबीत केल्याची घोषणा केली. तसेच तसेच शहीद जवानांच्या कुटुंबातील व्यक्तीस नोकरी देण्याची कारवाई 8 दिवसात करण्यात येईल, असे आश्वासनही दिले

नागपूरच्या युवकाचा शिलापूर नाल्यात बुडून मृत्यू

देवरी,दि.21- देवरी येथे नागपूरहून शिक्षणासाठी आलेल्या एका 19 वर्षीय युवकाचा नजिकच्या शिलापूर नाल्यावर आपल्या मित्रांसोबत आंघोळीला गेले असता पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 9 ते 10 वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी देवरी पोलिसांत मर्ग दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.
मृताचे नाव धृव अशोकराव उजवनकर (वय19), राहणार संजय नगर, हसनबाग नागपूर असे आहे.
पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, मृत युवक हा नागपूरच्या हसनबाग परिसरातील रहिवासी असून तो शिक्षणासाठी आपल्या मावशीकडे देवरी येथे मुक्कामी होता. धृव हा स्थानिक मनोहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. आज सकाळी मृतक धृव हा आपल्या काही मित्रांसोबत नजिकच्या शिलापूर येथील नाल्यावर आंघोळीसाठी गेला होता. यावेळी त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात बडून मृत पावला. या प्रकरणी फिर्यादी भोजराज उद्धवराव हूड (वय 52) राहणार देवरी यांचे तक्रारी वरून देवरी पोलिसांनी मर्ग दाखल करून चौकशी सुरू केली आहे

ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीत अर्ज करणाèया शिक्षकामुळेच इतरावंर अन्याय

विस्थापीत यादीतील शिक्षकांच्या ऑनलाईन बदली करतांनाही घोळ
गोंदिया,दि.२० : महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागांतर्गत राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या करिता एन आय सी पुणे मार्फत बदली पोर्टल सुरू केले. सन २०१७-१८ या वर्षापासून सुरू झालेला बदली पोर्टल राज्यात वादात्मक ठरला आहे व कितीतरी याचिका कोर्टात दाखल करण्यात आल्या परंतु न्यायालयानेही शिक्षकांना न्याय दिला नाही.त्यातच यावर्षीच्या बदल्यामध्ये सुध्दा चांगलाच घोटाळा झालेला आहे.स्थानिक पातळीवर शिक्षण विभागाचा जो कर्मचारी बदली पात्र यादी तयार करण्याचे काम ऑनलाईन करतो त्याच्याही कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे.
या बदलीप्रकियेतील रॅण्डमप्रकियेत पती पत्नी एकत्रीकरणातंर्गत शिक्षकांना बदलीसाठी पंचायत समिती स्तरावर अर्ज जिल्हा परिषदेच्यावतीने मागविण्यात आले होते.ज्या शिक्षक-शिक्षिकांनी यासाठी अर्ज केले,त्यांनी ऑनलाईन बदलीकरीता अर्ज करायला नको होते,परंतु काहींनी अर्ज केल्याने त्यांच्या बदल्या झाल्या,त्या बदल्या सुध्दा त्यांच्या सोयीनुसार झाल्याने या प्रकियेवरच शंका निर्माण झाली आहे.एकत्रीकरणासाठी व ऑनलाईन या दोन्ही प्रकियेत अर्ज केल्याने ते शिक्षक विस्थापीत यादीत आले.परंतु या विस्थापीत यादीतील काही शिक्षकांची ऑनलाईन बदली झाल्याने इतरांवर अन्याय झालेला आहे.
यामध्ये देवरी पंचायत समिती देवाटोला शाळेतून सुरेश नै.पटले यांची बदली तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथे झाली.यांचे नाव विस्थापीत यादीमध्ये ५ व्या क्रमांकावर आहे. (यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या एका विभागात मुख्यालयात कार्यरत आहे),सालेकसा पंचायत समितीच्या सातगाव शाळेतून प्राजक्ता प्रल्हाद रणदिवे यां गोंदिया पंचायत समितीच्या पारडीबांध शाळेत आल्या.यांचे नाव विस्थापीत यादीमध्ये ६ व्या क्रमांकावर आहे. (यांचे पती हे गोंदियात कोषागार कार्यालयात नोकरीवर आहेत),अर्जुनी मोरगाव पंचायत समितीतील पांढरवाणी रैय्यत शाळेच्या मंदा चंद्रकुमार कोसरकर यांची बदली गोरेगाव पंचायत समितीतल कमरगाव येथे करण्यात आली, यांचे नाव विस्थापित यादीत १४ व्या क्रमांकावर आहे.(यांचे पती हे सालेकसा पंचायत समितीतील हलबीटोला येथे प्राथमिक शिक्षक आहेत आणि ते पत्नीपेक्षा सेवा काळात वरिष्ठ असल्याने त्यांची बदली आधी होणे अपेक्षित होती परंतु ११ महिने कार्यकाळ असलेल्या पतीपेक्षा ४ महिने सेवाकाळ आहे.),अर्जुनी मोरगाव पंचायत समितीतील अरुणनगर येथील अरुणा देशलाल मंडीया यांची बदली गोंदियातील तेढवा येथे करण्यात आली,त्यांचे विस्थापीत यादीतील क्रमांक २८ आहे.अशा विस्थापीत यादीतील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या कुठल्या निर्णयाने झाल्या अशा प्रश्न उपस्थितीत झालेला आहे.जेव्हा २६ मे २०१९ च्या शासन निर्णयानुसार ज्या शिक्षक शिक्षिकेचा सेवाकाळ सर्वाधिक त्या शाळेत असेल त्याचीच बदली आधी करायचे आहे.परंतु मंदा कोसरकर यांच्या कार्यकाळापेक्षा त्यांचे पती चंद्रकुमार कोसरकर यांचे कार्यकाळ शाळेतील अधिक असतानाही त्यांची बदली न करता श्रीमती मंदा कोसरकर यांची झालेली बदलीच नियमबाह्य झालेली आहे असे अनेक घोळ बदल्यामध्ये शिक्षण विभागाचे प्रमुख,ऑपरेटर व त्यांच्यासोबतच्या कर्मचाèयांनी मिळून केल्याने अनेक शिक्षकावंर अन्याय झालेला आहे.
सोबतच शिक्षण विभागाने पती पत्नी शिक्षक-शिक्षिकेंच्या एकत्रीकरणाला प्राधान्य देण्याएैवजी त्यांनी पती शिक्षक तर पत्नी इतर विभागात qकवा पती इतर विभागात तर पत्नी शिक्षिका अशांच्याच एकत्रीकरणात बदल्या केल्याचे दिसून येत आहे.यावेळची झालेली प्रकिया सुध्दा अन्यायकारक असून बदली झालेल्या शिक्षकांना मात्र तातडीने रुजु होण्याचे दिलेले आदेश गैरप्रकार लपविण्यासाठी व शिक्षणाधिकारी व त्यांच्या चमूने केलेली चूक लपविण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
वादाच्या भोवèयात असलेल्या बदली पोर्टल मार्फत सत्र २०१८-२०१९ ला पुन्हा सुरू करण्यात आले. गोंदिया जिल्हा परिषदेत जिल्हांतर्गत बदली करिता बदली पात्र शिक्षकांची यादी, रिक्त पदांची यादी, समानीकरण याची यादीची यादी दिनांक ७ जून २०१९ ला प्रकाशित करण्यात आली व दिनांक ८ जून २०१९ ला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगीन वरून बदली पोर्टल सुरू करून शिक्षकांना बदली करीता २० शाळांच्या पसंतीक्रम घालण्याकरिता मुभा देण्यात आली व बदलीपात्र शिक्षकांनी पोर्टल वर आपली माहिती ७ जून २०१०९ ला प्रकाशित करून रिक्त पदानुसार आपला पसंतीक्रम दाखल केला. जिल्ह्यातील शिक्षकांची सर्व माहिती अपलोड झाल्यानंतर दिनांक ११ जून ला रात्री १२ वाजता पोर्टल बंद करण्यात आले. ११ जून रोजी बदली पोर्टल बंद केल्यानंतर दिनांक १४ जून रोजी जिल्हा परिषदेमार्फत रात्री पुन्हा बदली पोर्टल सुरू करून दिनांक ७ जून २०१८ ला प्रकाशित केलेल्या रिक्त पदांच्या यादीतील २८ जागा कमी करण्यात आल्या व पुन्हा पोर्टल बंद करण्यात आले यामुळे बदलीपात्र ५३७ शिक्षकांनी दिनांक ८ ते ११ जून २०१९ या कालावधीत या २८ जागांना आपला पसंतीक्रम दर्शविला होता त्यांची दिशाभूल करण्यात आली यामुळे गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा अनागोंदी व भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत आहे नेहमी वादाच्या भोवèयात असलेली बदली प्रक्रयेमुळे जिल्ह्यातील शिक्षकावर विस्थापित होण्याची पाळी येईल करिता गोंदिया जिल्ह्यातील बदली प्रक्रया रद्द करण्यात यावी किंवा समानीकरण याच्या राखून ठेवलेल्या जागा खुल्या करण्यात येऊन सर्व शिक्षकांना पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांच्या लॉगिन वर फार्म भरून पसंतीक्रम भरण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

देवरीत योग दिवस साजरा

देवरी,दि.21- स्थानिक तालुका क्रीडा संकूलाच्या मैदानावर आज शुक्रवारी (दि.21) आयुष विभाग आणि नगर पंचायत प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने  जागतिक योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. 
या पाचव्या जागतिक योग दिवसाचे आयोजनाचे वेळी देवरीच्या नगराध्यक्ष कौशल कुंभरे, उपनगराध्यक्ष आफताब शेख आणि मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या योग दिवसाचे औचित्यावर पतंजली योग संस्थानच्या योग प्रशिक्षकांनी उपस्थितांना योग विद्येचे धडे योग्यरीत्या गिरविता येण्यासाठी मार्गदर्शन करीत योग करण्याचे मानवी जीवनावर होणारे फायदे सुद्धा विशद केले. या शिबीराला देवरी येथील लोकप्रतिनिधींसह कर्मचारी अधिकारी यांनी हजेरी लावली. स्थानिक नागरिकांनी सुद्धा या शिबीराचा लाभ घेतला.


Wednesday 19 June 2019

कुंभलीजवळील चुलबंद नदीवरुन काळीपिवळी पलटल्याने 6 ठार




साकोली,दि.18ः- तालुक्यातील लाखांदूरकडे जाणार्या कुंभली/धर्मापुरी गावाजवळील चुलबंद नदीवरील पुलावरुन काळीपिवळी वाहन उलटल्याने अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यास प्रशासन अपयशी ठरल्याने आज दुपारी वडापाच्या ट्रॅक्सला झालेल्या अपघातात पाच तरुणींसह एक महिला ठार झाली आहे. तर सहा जण जखमी आहेत. महिलांची ओळख पटविणे सुरु असून जखमींना साकोलीच्या उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
मृतामध्ये गुणगुण हितेश पालांदुरकर(गोंदिया),शितल सुरेश राऊत(सानगडी),अश्विनी सुरेश राऊत(सानगडी),शिल्पा श्रीरंग कावळे(सासरा),सुरेखा देवाजी कुंभरे(सासराटोली) तर सौ.शारदा गजानन गोटेफोडे(रा.सासरा)यांचा समावेश आहे.जखमीमध्ये सौ.वंदना अभिमन सतीमेश्राम(सासरा),कु.डिपंल कावळे(सासरा),शुभम नदंलाल पातोडे(तई) यांना भंडारा येथे हलविण्यात आले आहे.तर साकोली उपजिल्हा रुग्णालयात सौ.विना हितेशराव पालांदूरकर(गोंदिया),कु.सिध्दी हितेशराव पालांदूरक(गोंदिया),मालन तुळशीराम टेंभुर्णे(खोलमारा) व अभिमन तातोबा सतीमेश्राम (सासरा )यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अघोरी पूजा करणार्‍या भोंदूबाबाला अटक


भंडारा ,दि.18ः-उच्चशिक्षित मुलीला खुद्द तिच्या मैत्रिणीनेच भावनेत अडकवून तिच्या मृत आईशी बोलणी घालून देतो म्हणून भोंदूबाबाकरवी अघोरी पूजा करण्यास सांगितले. मुलीला याबाबत शंका येताच तिने पोलिसांना माहिती दिली. अघोरी पूजा करताना भोंदूबाबा व तिच्या मैत्रिणीला पोलिसांनी अटक केली. ही पूजा करण्यासाठी भोंदूबाबाने ३१ हजारांची मागणी केली होती. दोन्ही आरोपींना २0 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


पवनी येथील आरोपी तरूणी अंकीता (१९) (काल्पनिक नाव) हिने शिकवणी वर्गात मैत्री झालेल्या संगीता (१९) (काल्पनिक नाव) रा. पवनी हिला भावनेत अडकवून ‘तुझी आई मरण पावली आहे. तिला करणी करून मारण्यात आले होते. तुझ्या भावाला सुद्धा अशाच रितीने मारल्या जाणार आहे. हे सगळे थांबवायचे असेल तर तुला एक पूजा करावी लागेल. ही पूजा करण्यासाठी माझ्या ओळखीचा जितू अनिल मेर्शाम रा. राजनांदगाव नावाचा महाराज आहे. तु त्याचेकडून पूजा करून स्वत:चे जीवन व भावाचे जीवन वाचव’, अशी बतावणी करून मी सांगत असलेले खोटे वाटत असेल तर पूजा करून तुझ्या मृत आईला तुझ्याची प्रत्यक्ष बोलायला लावण्यास महाराज सक्षम असल्याचे सांगितले.
संगिताने शिकवणी वर्गातील अन्य मैत्रिणींकडून अंकिताबाबत अधिक माहिती घेतली असता ती अशाच रितीने भावनेत अडकवून जादूटोण्याच्या नावाखाली फसवून आर्थिक लुटमार करीत असल्याचे माहित झाले. संगिताने हा प्रकार आपल्या मित्रांना सांगून त्यांच्या मदतीने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना माहिती दिली. पवनी पोलिसांनी सापळा रचून गोसेखुर्द धरणाच्या नहरावर खापरी जंगल शिवारात अघोरी पूजा करताना भोंदूबाबा जितू अनिल मेर्शाम व अंकीता यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून पुजेचे साहित्य, घुबडाचे पाय, हडीची माळ, कोंबडा, देशी दारूची बॉटल, हवनाचे साहित्य आदी जप्त करून जादुटोणा प्रतिबंधक कायदा २0१३ चे कलम ३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.सदर कारवाई पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे, पोलिस उपनिरीक्षक पागारे, पोलिस हवालदार भरत ढाकणे, संतोष चव्हाण, किशोर देशमुख, सचिन खराबे, कळपते यांनी केली.

बेरार टाईम्स 19 ते 25 जून अंक बघण्यासाठी व ताज्याबातम्यासांठी क्लि करा berartimes.com





Sunday 16 June 2019

भाटिया पेट्रोलपंप समोर अज्ञात वाहनाची विजेच्या खांबाला धड़क

देवरी: १६
देवरी येथिल चिचगड रोड वर स्थित भाटिया पेट्रोलपंप समोर अज्ञात वाहनाने विजेच्या खांबाला धड़क दिल्याची घटना घडली असून सदर ठीकाणी या अगोदर सुद्धा असेच घटना घडलेल्या असल्याचे बोलले जाते. सदर घटनेमुळे नागरिकामढ़े असंतोष पसरल्याचे दिसून येत आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात; पहिल्या शपथेचा मान आयात नेत्यांना

राजकुमार बडोले, प्रकाश मेहता यांचे राजीनामे

राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे,  अंबरिष अत्राम यांनी त्यांच्या  मंत्रीपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना सादर केले असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे स्विकारले आहेत.
मुंबई,दि.16 : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुरु झाला असून पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांना दुसरा मान देण्यात आला. तर तिसरा स्थान भाजप मुबंई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांना देण्यात आला. तिकडे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. या फेरबदलात आठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. विस्तारानंतर लगेच कॅबिनेटची बैठक घेऊन खातेवाटप जाहिर होणार आहे.भंडारा-गोंदिया जिल्हाचे विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय रमेश फुके यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.पहिल्यांदाच विधानपरिषदेत 3 वर्षापुर्वी निवडून गेले ते मुख्यमंत्र्याचे खास असल्याने त्यांना संधी मिळाली.विखेंनी काँग्रेसच्या सर्व पदाचा व आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. सध्या ते विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.
फडणवीस सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर रविवारी सकाळी ११ वाजता राजभवनात पार पडला. यात भाजपच्या १० तर शिवसेनेच्या दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आठवले गटाच्या अविनाथ महातेकर यांच्यासह एकून १३ जणांचा आज शपथविधी झाला. मात्र, यात आयात नेते विखे आणि क्षीरसागर यांना शपथ घेण्याची सर्वप्रथम संधी देण्यात आली. हे दोन्हीही नेते ज्येष्ठ व बडे असले तरी आयात नेत्यांना मंत्रिपद देण्याबाबत भाजप-शिवसेनेतर्गंत धुसफूस सुरू होती. 
बुलडाण्याचे डाॅ.संजय कुटे यांनीही शपथ घेतली.सुरेश खाडे,डाॅ.अनिल बोंडे यानीही शपथ घेतली.विखेपाटील शपथ घेताना कोणीही टाळ्या किंवा घोषणा दिल्या नाहीत. मात्र, शिवसेनेचे क्षीरसागर यांनी शपथ घेताना आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर शेलार, खाडे व बोंडेच्या वेळीही आवाज कुणाचा भारतीय जनता पार्टीचा व भाजपा जिंदाबादचे नारे देण्यात आले. कुटे यांच्यावेळी गजानन महाराजांच्या घोषणा देण्यात आल्या.तानाजी सावंत यांच्यावेळी जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा निणादंल्या.भाजपचे अशोक उईके यांनी कॅबिनेटची,योगेश सागर यांनी राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली.दलित पँंथरचे संस्थापक सदस्य आरपीआय नेते अविनाश महातेकर यांनाही राज्य मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.मावळचे आमदार संजय भेगडे यांनीही राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.फुके यांच्या शपथेच्यावेळीही घोषणाबाजी झाली.

मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांचे मतदारसंघ

अतुल सावे    मराठवाडा
परिणय फुके     विदर्भ
अविनाश महातेकर मुंबई
योगेश सागर।    मुंबई
बाळा भेगडे –    पुणे पश्चिम महाराष्ट्र राज्यमंत्री

विखे पाटील।  उत्तर महाराष्ट्र
तानाजी सावंत।   यवतमाळ विदर्भ
संजय कुटे।       विदर्भ
आशिष शेलार।     मुंबई
अशोक उईके।      विदर्भ
अनिल बॉंडे।         विदर्भ
जयदत्त क्षीरसागर।    मराठवाडा
सुरेश खाडे  कॅबिनेट।     पश्चिम महाराष्ट्र

रापम अधिकाऱ्यांच्या बचावासाठी तक्रारी गहाळ केल्या -नरेश जैन

देवरी,दि.16- राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागीय कार्यालयात निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अधिकाऱ्यांची पाठराखण करून त्यांच्या बचावासाठी महामंडळाच्या हिताच्या तक्रारी जाणून गहाळ करून शासनाचा महसूल बुडविण्याचा सपाटा बिनभोबाट सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

सविस्तर असे की, भंडारा विभागातील गोंदिया आगाराची सर्वांत जास्त उत्पन्न देणारी गोंदिया लांजी व्हाया रजेगाव फेरी गोंदियाचे तत्कालीन आगार व्यवस्थापक व  भंडाराचे तत्कालीन विभाग नियंत्रक यांनी संगनमत करून बंद केल्याबाबतची  तक्रार देवरी येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रा.प. मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांचकडे दि. 8 जानेवारी 2018 रोजी केली होती. या पत्राची प्रत भंडारा विभागीय कार्यालयातील आस्थापना शाखेच्या आवक विभागात दि 8 जानेवारी 2018 रोजी नरेश जैन यांनी दिली. 
नरेश जैन यांच्या द्वारे दि.15 एप्रिल 2019 रोजी माहितीच्या अधिकारात जनमाहिती अधिकारी तथा विभागीय वाहतूक अधिकारी भंडारा यांना अर्ज करून सदर प्रकरणी विभाग नियंत्रक भंडारा यांचेद्वारे महाव्यवस्थापक (वाहतूक) मुंबई यांना पाठविलेल्या अहवालाच्या प्रतची मागणी केली असता विभागीय माहिती निरंक आहे या प्रकारची माहिती नियमाप्रमाणे 30 दिवसात न पुरविता प्रथम अपिलिय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केल्यानंतर विलंबाने जैन यांना पुरविली.
दि.6 जून 2019 रोजी झालेल्या प्रथम अपील सुनावणी दरम्यान च ना वडस्कर माहिती अधिकारी तथा विभागीय वाहतूक अधिकारी भंडारा यांनी अपिलिय अधिकारी तथा विभाग नियंत्रक (प्रभारी) ग.ज. नागुलवार यांचे समक्ष सदर प्रकरणाची कोणतीच माहिती कार्यालयात उपलब्ध नाही, जैन यांची कोणतीच तक्रार कार्यालयात आलेली नाही, तसेच मध्यवर्ती कार्यालयात पत्र सुद्धा विभागीय कार्यालयात आलेला नाही,अशी कबुली दिली. त्यांच्या या कबूलीवर जैन यांनी आक्षेप घेतला व सर्व पुरावे अपिलीय अधिकारी यांच्या समक्ष सादर केले. जैन यांच्या विनंतीवरून आस्थापना शाखेतील आवक रजिस्टरची तपासणी करण्यात आली असता जैन यांच्या दोनही तक्रारींची नोंद आढळून आली. तसेच या दोन्ही तक्रारी विभागीय नियंत्रकांचे स्विस सहायक यांनी स्वीकारल्याची नोंद आढळून आली आणि तशी कबुली सुद्धा स्विस सहायकाने दिली. 
तत्कालीन विभाग नियंत्रक हे 30 सप्टेंबर 2019 रोजी राप सेवेतून निवृत्त होत असल्याने त्यांना शिक्षेपासून वाचविण्याकरिता जैन यांच्या तक्रारीला व मध्यवर्ती कार्यालयाच्या पत्राला भंडारा विभागीय कार्यालयातून गहाळ करण्यात आल्याचा आरोप नरेश जैन यांनी केला आहे.या प्रकरणी तक्रार दि 8 जून 2019 रोजी विभाग नियंत्रक भंडारा व महाव्यवस्थापक (वाहतूक)मुंबई यांचेकडे करून सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यावर माहिती दडविल्याचा कारणावरून योग्य की कार्यवाही करावी, अशी मागणी नरेश जैन यांनी केली आहे.

Wednesday 12 June 2019

अभियंत्याच्या चुकीमुळे पालांदूरची पाणी पुरवठा योजना धोक्यात


  सरपंच चंद्रकला कावळेंसह गावकऱ्यांचा आरोप
  बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच विहीर कलंडली

देवरी,दि.12- आदिवासी, नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भागातील विकास कामांचा दर्जा काय असतो, याची पुन्हा एकदा प्रचिती तालुक्यातील पालांदूर (जमीदारी) येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारभारावरून आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत गावात उभारण्यात येणारी पूरक पाणी पुरवठा योजना पहिल्याच टप्प्यात विहीर बांधकामासाठी अभियंत्यांनी चुकीची जागा निवडल्याने धोक्यात आल्याचा आरोप सरपंच चंद्रकला शामराव कावळे यांचेसह सदस्य आणि गावकऱ्यांनी केली आहे. या चुकीच्या बांधकामाला जबाबदार अभियंत्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी पालांदूरवासियांनी प्रशासनाकडे केली आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील पालांदूर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या पालांदूर, गरारटोला आणि टेकरी या गावातील साडेतीन हजार लोकवस्तीला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्हा परिषदेने सन 2017-18 या वर्षात 1 कोटी, 4 लाख, 30 हजार 175 रुपयांचा निधी मंजूर केला. यामुळे गावाजवळून वाहणाऱ्या चुंभली नदीच्या तीरावर जागेचे नियोजन ग्रामीण पाणी पुरवठा,उपविभाग देवरीच्या अभियंत्यांनी केले. या सहा मीटर व्यासाची आणि 15 मीटर खोल विहीर तयार करण्याच्या कामाला मे2017 मध्ये प्रत्यक्ष सुरवात करण्यात आली. सुमारे 30-35 फूट खोल विहिरीचे बांधकाम करून पावसाळ्यामुळे काम थांबविण्यात आले. दरम्यान, थांबलेले बांधकामास यावर्षी पुन्हा सुरवात करताच ही विहीर नदीच्या पात्राच्या दिशेने कलंडली. यामुळे सदर विहिरीच्या काँक्रिट भिंतीला तडे केले. सदर प्रकार लपविण्यासाठी अभियंत्यांच्या सूचनेनुसार घाईगडबडीत विहिरीलगतच पात्रातील मातीचा जेसीबीच्या साहाय्याने उपसा करून विहीरीभोवती भरणा भरण्यात आले. परिणामी, विहिरीजवळील पात्राकडील मातीची पकड आणखी सैल झाल्याने पावसाळ्यात संपूर्ण विहीर कोलमडण्याची भीती ग्रामपंचायत कार्यकारिणीसह गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अद्यापही अपूर्ण असलेल्या या विहिरीच्या बांधकामावर आतापर्यंत 19 लाख, 93 हजार 786 रुपये खर्च झाल्याचे कार्यकारिणी सदस्यांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय म्हणजे कंत्राटदाराने या विहिरीशेजारीच दुसरी छोटी विहीर तयार केली, त्या विहिरीला मूळ विहीरीपेक्षा पाण्याचा साठा अधिक असल्याचे तेथे उपस्थित नागरिकांनी सांगितले. याविषयी ग्रामपंचायतीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह देवरीचे गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांचेकडे लेखी तक्रार सुद्धा दाखल केली आहे. उल्लेखनीय म्हणजे या कामाच्या पाहणीसाठी आलेल्या अभियंत्यांनी कार्यकारिणीच्या सदस्यांना कलंडलेली विहीर ही दोराच्या साहाय्याने ओढून सरळ करून देण्याचे आश्वासन दिल्याचे कार्यकारिणी सदस्य सांगतात, हे विशेष. या विषयी सरपंच कावळे, उपसरपंच मूलचंद नाईक, सदस्य श्रीराम राऊत, प्रल्हाद चौधरी, उत्तरा वळगाये लता राऊत यांनी या सदोष बांधकाम करणाऱ्या अभियंत्यावर कार्यवाही करून खर्च झालेला निधी वसूल करण्याची मागणी केली आहे.
याविषयी देवरीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला भेट दिली असता संबंधित अभियंता आणि उपविभागीय अभियंता कार्यालयात हजर नव्हते. उपअभियंता एस.व्ही.पवार यांचेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी गावकऱ्यांची तक्रार प्राप्त झाल्याचे मान्य करून गावकऱ्यांना तांत्रिक बाबी खुलासेवार समजावून सांगितल्याचे आणि तक्रारीला लेखी उत्तर दिल्याचे सांगितले. मात्र, असे कोणतेही लेखी उत्तर ग्रामपंचायतीला मिळाले नसल्याचे सरपंच कावळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.

जहाल नक्षली नर्मदाक्का पतीसह अटक


गडचिरोली पोलिसांची कारवाई

गडचिरोली-गेल्या कित्येक दिवसापासून पोलिसांना हव्या असलेल्या दंडकारण्य स्पेशल झोन समितीची सदस्य आणि वेस्टर्न सबझोनल प्रमुख उप्पगंटी निर्मलाकुमारी ऊर्फ नर्मदाक्का ऊर्फ नर्मदा दीदी आणि तिचा पती राणी सत्थ्यनारायण ऊर्फ किरण ऊर्फ किरणदादा हे दांपत्य अखेर गडचिरोली पोलिसांच्या सापळ्यात अडकले. या दोघांना पोलिसांनी  गडचिरोली पोलिसांनी सिरोंचा बसस्थानकावर अटक केली.
सविस्तर असे की नर्मदाक्का आणि किरण हे दोघे नक्षली दांपत्य अनेक नक्षली घातपातातील गुन्ह्यात सहभागी असल्याने ते तेलंगानासह गडचिरोली पोलिसांना हवे होते.नर्मदाक्का (वय 58), राहणार कोडापावनुरू, गलावरम मंडल जिल्हा कृष्णा (आंध्रप्रदेश) आणि तिचा पती किरण (वय 70) राहणार नरेंद्रपुरम, अमलापुरम जवळ, राजानगरम मंडल,जिल्हा पूर्व गोदावरी (आंध्रप्रदेश) हे दोघेही तेलंगाना राज्यातून सिरोंचा मार्गे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची माहिती तेलंगाना आणि गडचिरोली पोलिसांच्या हाती लागली. मिळालेल्या माहितीवरून तेलंगाना पोलिसांच्या सहकार्याने गडचिरोली पोलिसांनी सिरोंचा बसस्थानकात सापळा लावून या दोन्ही जहाल नक्षलवाद्यांना अटक केली.
नर्मदाक्का हिचा नक्षलवाद्यांनी पोलिसांविरुद्ध घडवून आणलेल्या अनेक गुन्ह्यात सक्रिय सहभाग होता. 1 मे 2019 रोजी कुरखेडा उपविभागांतर्गत मौजा जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी  घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात गडचिरोली पोलिस दलाचे 15 जवान आणि 1 खासगी वाहनचालक शहीद झाले होते.  या हत्याकांडाच्या नियोजनात नर्मदाक्का व तिचा पती किरण यांची प्रमुख भूमिका होती. उल्लेखनीय म्हणजे नर्मदाक्काच्या विरोधात गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यात एकूण 65 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर किरण हा दंडकारण्य पब्लिकेशन टिमचा प्रमुख आहे. याशिवाय नक्षलवाद्यांच्या प्रभात मासिकाचा तो प्रमुख आहे. या नक्षली दांपत्याच्या अटकेमुळे गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

बेरार टाईम्सचा 12 ते 18 जून अंक बघण्यासाठी व ताज्या बातम्यासांठी berartimes.com





Monday 10 June 2019

वृक्ष आणि पर्यावरण कर घेणाऱ्या देवरीच्या नगरपंचायती समोरील झाडे मेली!

देवरी,दि 10 (बातमीदार) - देवरी नगरपंचायतीमध्ये सध्या विकासाची घौडदौड सुरू असून यामध्ये देवरी शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली. आता त्यावर नगरपंचायतीद्वारे वृक्ष आणि पर्यावरणाच्या नावावर जनतेकडून कर वसूल करण्यात येत आहे. परंतु, त्याच नगरपंचायतीसमोर लावण्यात आलेली झाडे उन्हाच्या दाहामुळे मेल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. परिणामी, नागरिकांनी नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
उल्लेखनीय म्हणजे दररोज या कार्यालयामध्ये मुख्याधिकारी आणि नगरसेवक यांचे येणेजाने असून नगरपंचायतीच्या आवारातील झाडांकडे कुणाचे लक्ष का गेले नाही ? असा प्रश्न निर्माण विचारला जात आहे.
नगरवाशीयांच्या म्हणण्यानुसार, शहरात विकास कार्य करीत असताना येथील रस्त्याच्या दुतर्फा भली मोठी शासकीय निधी खर्च करून वृक्ष लागवड करण्यात आली. या लावलेल्या रोपट्यांना स्वयंओलीताची सोय करण्यासाठी सुद्धा करण्यावर अमाप खर्च करण्यात आला. यामुळे देवरीकर जाम खुश होते. मात्र, देवरीकरांचा हा भ्रम लवकरच दूर झाल्याचे आता नागरिक बोलू लागले आहे. यावर्षी नगरपंचायत प्रशासनाने करांचे फेरमुल्यांकन करताना जनतेवर प्रत्येकी 1 टक्के प्रमाणे कर लादला. यातून वृक्ष संवर्धन करण्यात येणार असल्याचे नागरिकांना सांगण्यात आल्याचे बोलले जाते. असे असताना चक्क नगरपंचायती समोर लावण्यात आलेली झाडे उन्हामुळे करपली आहेत. या नगरपंचायतीच्या कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचा ताफा उपलब्ध असताना आणि लोकसेवक तिथून दररोज ये-जा करीत असताना जर नगरपंचायती समोरील झाडे मरत  असतील तर इतर झाडांचे काय, असा सवाल नगरवासियांनी प्रशासनाला केला आहे. दरम्यात, मालमत्ता करात झालेल्या वाढी संदर्भात देवरीमध्ये असंतोषाचे वातावरण असून नागरिकांनी मालमत्तांच्या मूल्यांकनाच्या पद्धतीवरच संशय व्यक्त केला आहे. परिणामी, शहरातील मालमत्तांचे योग्य मुल्यांकन करून कर लावण्यात आले तर सामान्य जनतेला दिलासा नक्कीच मिळेल, अशाही चर्चा देवरी शहरात आहेत.

सागवान तस्करांना रंगेहाथ पकडले;पाच आरोपी अटकेत, चार फरार



अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे)दि.10ः- राखीव वनातील सागवान झाडांची अवैधरित्या कटाई करून ते ट्रॅक्टर मधून दुलाई करण्याच्या तयारीत असलेल्या वन तस्करांना वन विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.ही घटना गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत तिरखुरी-2 कक्ष क्रमांक 336 मध्ये घडली. यात पाच आरोपींना अटक केली असुन अन्य चार आरोपी फरार आहेत.
आरोपीमध्ये गेंदलाल आनंदी दुधकवर, अतुल गुलाब करसाल,राहूल सुखलाल कमरो,विलास सखाराम हलामी, दरबारी बैसाकु उईके, देवा पोटावी,प्रल्हाद कुंभरे, जोहन मडावी,व इशा गेडाम ( रा.चारभट्टी, गडचिरोली)असे आरोपींची नावे आहेत .
आरोपी हे तिरखुरी-2 राखीव वनातील कक्ष 336 मध्ये सागवान वृक्ष अवैध रित्या तोडुन ट्रॅक्टर मध्ये भरत असतांना वन विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली. यात गेंदलाल दुधकवर, अतुल करसाल, राहूल कमरो, विलास हलामी व दरबारी उईके हे पकडल्या गेले तर देवा पोटावी, प्रल्हाद कुंभरे, जोहन मडावी व इशा गेडाम फरार झाले.
वनविभाग पथकाने पाचही वनतस्करांना पकडून ट्रॅक्टर व सागवान लठ्ठे जप्त केले .जप्ती केलेले ट्रॅक्टर हे पंकज लोकचंद दरवडे( रा.गौरिटोला,कुरखेडा) याच्या मालकीचे आहे.ट्रॅक्टर मालकाचेही या प्रकरणात साठे लोटे असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यातील वंनतस्कर गोंदिया जिल्ह्यातील वनां मध्ये चोरी करतात.याचा अर्थ ही मोठी टोळी असल्याचे दिसून येते आहे. ह्या टोळीचा भांडाफोड करण्याचे आवाहन वनविभागाला आहे.सखोल चौकशी केल्यावर मोठे घबाड समोर येऊ शकते.आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे व चमू करीत आहे.

Sunday 9 June 2019

अंध विद्यार्थ्यांमध्ये गोंदियाची ईशा बिसेन राज्यात प्रथम


गोंदिया,दि.09ः-महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परिक्षेचा निकाल शनिवारला जाहिर झाला असून यात गोंदियाच्या जानकीदेवी हायस्कलची विद्यार्थीनी ईशा किरणकुमार बिसेन हिने अंध विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.सदर शाळेचा निकाल 100 टक्के लागला.ईशा बिसेनचे शाळेच्यावतीने ईशा व तिच्या आईवडिलांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले आहे.ईशा चे वडील हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत.ईशाच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव सुरेश चौरागडे,संचालिका रेखादेवी चौरागडे व मुख्याध्यापक प्रमोद चौरागडे यांनी अभिनंदन केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय संपूर्ण शिक्षकांना आणि शाळेच्या मुख्याध्यापक प्रमोद चौरागडे  यांना आणि आई वडिलांना दिले.

५७ विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड

57 students selected for the newborn | ५७ विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड
गोंदिया : केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय पात्रता परीक्षेत जिल्ह्यातील अतिदुर्गम व ग्रामीण क्षेत्रातील ५७ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषदेच्यावतीने गौरव करण्यात आला.
गुरूवारी (दि.६) आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी होते. शिक्षण समिती सभापती रमेश अंबुले, शिक्षणाधिकारी (प्राथ) उल्हास नरड प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. दयानिधी यांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधायुक्त दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे याकरिता केंद्र शासनाने जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना १९८६ मध्ये केली. याचा लाभ ग्रामीण क्षेत्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, तसेच आपला सर्वांगिण विकास या विद्यालयाच्या माध्यमातून करुन उच्च पदावरती प्रत्येक विद्यार्थी पोहोचला पाहिजे असे प्रतिपादन केले. अंबुले यांनी, यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे कौतुक केले.
कार्यक्रमात एकूण पात्र ५७ विद्यार्थ्यांपैकी ३८ विद्यार्थी हजर होते. यामध्ये क्रिया कुंवरलाल बघेले आणि धनश्री योगराज बिसेन या दोन दिव्यांग विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश होता. तसेच आमगाव तालुक्यातील दोन, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एक, देवरी तालुक्यातील तीन, गोंदिया तालुक्यातील चार, गोरेगाव तालुक्यातील १३, सालेकसा तालुक्यातील तीन, सडक-अर्जुनी तालुक्यातील सात व तिरोडा तालुक्यातील दोन अशाप्रकारे विद्यार्थ्यांचा डॉ. राजा दयानिधी, रमेश अंबुले, उल्हास नरड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गुलाबाचे फुल देवून गौरव करण्यात आला.
संचालन विजय ठोकणे यांनी केले. आभार बाळकृष्ण बिसेन यांनी मानले. कार्यक्रमासाठी कुलदीपीका बोरकर, दिलीप बघेले, मनोजकुमार शेणमारे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व काही गावातील सरपंच उपस्थित होते.

Saturday 8 June 2019

देवरीची अनुश्री जिल्हयात प्रथम



गोंदिया,दि.०८ः- महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता १०वी परिक्षेचा निकाल जाहिर झाला असून गोंदिया जिल्ह्याचा निकाल ६८.४६ टक्के लागला आहे. नागपूर विभागात जिल्ह्याचा निकाल दुसऱ्या क्रमांकावर राहिला असून २१हजार ३३९ परिक्षार्थ्यापैकी  २१ हजार ०५७ परिक्षार्थीनी परीक्षा दिली. तर १४ हजार ४१६ उत्तीर्ण झाले. यामध्ये २६६० विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत,६७९३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत,४५४७ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेदेवरी मनोहरभाई पटेल हायस्कूलची अनुश्री हेमंतकुमार भेंडारकर हिने यावर्षी नागपूर बोर्डाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेत 95.60 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.तर द्वितीय क्रमांकावर अर्जुनी मोरगाव येथील जी.एम.बी.विद्यालयाची विद्यार्थीनी कल्याणी प्रभु सोनवाने हिने 94:60%गुण मिळवुन अर्जुनी मोर तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

जिल्ह्यात सालेकसा तालुक्याचा निकाल सर्वाधिक ७२.२३ टक्के लागला आहे.नंतर तिरोडा तालुका ६९.९६ टक्के, गोंदिया तालुका ६९.७६टक्के,आमगाव तालुका ६९.६४ टक्के,सडक अर्जुनी तालुका ६८.४३ टक्के,गोरेगाव तालुका ६६.१५ टक्के तर देवरी तालुक्याचा निकाल सर्वात कमी ६१.४५ टक्के लागला.मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७४.१३ टक्के आहे.तर मुलांचे प्रमाण ६२.८४ टक्के आहे.
गोरेगाव तालुक्यातील माडेल कान्वेटचा निकाल ९३.३३ टक्के,किरसान मिशन स्कुल गोरेगाव १०० टक्के,परशुराम विद्यालय मोहगाव बु.६४.०६ टक्के निकाल लागला आहे.प्रथम श्रेणीत २०,द्वितीय श्रेणीत १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.परिक्षेला बसलेल्या ६४ पैकी ४१ विद्याथ्र्यांनी यश संपादन केले.

देवरी-मनोहरभाई पटेल हायस्कूलचा निकाल 68.18 टक्के लागला असून यामध्ये प्राविण्य श्रेणीत 18 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 51, द्वितीय श्रेणीत 55 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये अनुश्री भेंडारकर हिने 95.60 टक्के गुणे घेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याशिवाय सानिया राजेश देशपांडे 94.40 टक्के, आदित्य नेपालचंद बावणथडे 91.40 टक्के आणि अंकिता रोशण शहारे 90.20 टक्के गुण मिळवून प्राविण्य श्रेणीत स्थान मिळविले आहे.यशस्वी विद्यार्थ्याचे प्राचार्य के.सी.शहारे, उपमुख्याध्यापक गोंडाणे, एसटी हलमारे आदी शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

 गोरेगाव तालुक्यात पी.डी.रहागंडाले विद्यालयाची उषा पटले प्रथम

पी.डी.रहागंडाले विद्यालय गोरेगावचा दहाविचा निकाल ७४.२८ टक्के लागला असून १०५ विद्याथ्र्यापैकी ७८ उत्तीर्ण झालेत.त्यातील १७ विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत तर ४१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.विद्यालयातून प्रथम क्रमांक उषा तिलकचंद पटले हिने 456 गुण(91.20%) मिळवित पटकावला.तर  द्वितीय क्रमांक सायली आर बोपचे द्वितिय 448 गुण( 90.20%)व तृतीय क्रमांक गुलशन बी. कटरे ने 447 गुण(90.00),चतुर्थ क्रमांक कार्तीकेय पी डोमळे याने ४३८ गुण घेऊन तर चैतन पी पारधी याने ४३६ गुणे पाचवा क्रमांक विद्यालयातून पटकावला.उत्तीर्ण विद्याथ्र्यांचे संस्था अध्यक्ष डॉ.टी.पी.येळे,सचिव एड.टी.बी.कटरे,संचालक यु.टी.बिसेन,प्राचार्य एच.डी.कावळे,पर्यवेक्षक वाय.आर.चौधरी,सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे. तालुक्यातीलच किरसान मिशन स्कुल येथील विद्यार्थी सुजल रवीशंकर अग्रवाल याने 450 गुण मिळवित तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथील विकास हायस्कुलचे 32 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले त्यापैकी 18 विद्यार्थी हे नापास झाले.फक्त 14 विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले.शाळेचा निकाल 43.75 टक्के एवढा लागला आहे.
प्रांजली आगाशे  तिरोडा तालुक्यात प्रथम
तिरोडा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने आज (ता.८) दहावीचा निकाल जाहीर  करण्यात आला. या दहावीच्या परिक्षेत शहीद मिश्रा विद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्रांजली ओंकार आगाशे हिने ९४.४० टक्के गुण प्राप्त करून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला.
विशेष म्हणजे, अंजलीच्या मोठ्या वडिलाची तिन्ही मुली सुद्धा तालुक्यात प्रथम आल्या होत्या. हीच परंपरा प्रांजलीने कायम ठेवली. त्यातील मोठी बहीण एमडीएस तर दोघ्या जुडव्या बहिणी ह्या एमबीबीएस करीत आहेत व प्रांजलीनेही सुद्धा मी पण वैद्यकीय क्षेत्रात वळण्याची ईच्छा व्यक्त केली. प्रांजलीने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक वृंद व आई-वडिलांना दिले. अंजलीचे वडील झेरॉक्स दुकान चालवितातत तर आई गृहिणी आहे.

आदिवासी विकास हायस्कूल खजरी/डों. चा 83.24 टक्के निकाल
खजरी:जगत कल्याण शिक्षण संस्था साकोली द्वारा संचालित खजरी येथील आदिवासी विकास हायस्कूल येथील इ.10वी चा निकाल 83.24 %.लागलेला आहे. परिक्षेला बसलेल्या 185 परिक्षार्थ्यापैकी
154 उत्तीर्ण झाले असून विशेष प्राविण्य श्रेणीत 53,प्रथम श्रेणी -87,द्वितिय श्रेणी -13 व तृतिय श्रेणीत – 01 विद्यार्थी आला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष जे.एस.रंहागडाले,
सचिव एन.एन.येडे,प्राचार्य खुशाल कटरे ,उपमुख्याध्यापक बी.आर.देशपांडे,पर्यवेक्षक आर.के.कटरे,सर्व प्राध्यापक,हायस्कूल शिक्षक,मिडल स्कूल शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी केले आहे.

अनुश्री भेंडारकर देवरी तालुक्यातून प्रथम

देवरी,दि.8- स्थानिक मनोहरभाई पटेल हायस्कूलची अनुश्री हेमंतकुमार भेंडारकर हिने यावर्षी नागपूर बोर्डाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेत 95.60 टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
मनोहरभाई पटेल हायस्कूलचा निकाल 68.18 टक्के लागला असून यामध्ये प्राविण्य श्रेणीत 18 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 51, द्वितीय श्रेणीत 55 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये अनुश्री भेंडारकर हिने 95.60 टक्के गुणे घेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याशिवाय सानिया राजेश देशपांडे 94.40 टक्के, आदित्य नेपालचंद बावणथडे 91.40 टक्के आणि अंकिता रोशण शहारे 90.20 टक्के गुण मिळवून प्राविण्य श्रेणीत स्थान मिळविले आहे.
यशस्वी विद्यार्थ्याचे प्राचार्य के.सी.शहारे, उपमुख्याध्यापक गोंडाणे, एसटी हलमारे आदी शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...