Friday 28 June 2019

मानव तस्करीचा पर्दाफाश : ३३ मुलांची राजनांदगाव रेल्वेस्थानकावर सुटका

राजनांदगाव(विशेष प्रतिनिधी)दि.28-ः हावडा-मुंबई मेलद्वारे बिहार राज्यातून ३३ अल्पवयीन मुलांना रेल्वेने मुंबईला घेऊन जात असतांना सजग प्रवाशांच्या जागृकतेमुळे बुधवारी सुटका करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारावर आरपीएफ व पोलिसांनी छत्तीसगड येथील राजनांदगाव रेल्वेस्टेशनवरून या मुलांची सुटका करून मानव तस्करीचा पर्दाफाश केला.
बिहार येथील भागलपूर जिल्ह्यातील तिरपैती गावातील आहेत. त्यांना हावडा ते मुंबई जात असलेल्या हावडा मेलच्या बोगी क्रमांक एस-५ आणि एस-७ मधून नंदूरबार/मुबंई येथे घेऊन जात होते. अ‍ॅड. स्मिता पांडे यांच्यासह काही महिला वकील रायपूर येथून राजनांदगावला जात होत्या. एका व्यक्तीसोबत इतक्या मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुलांना पाहून त्यांना संशय आला. त्यांनी विचारपूस केली तेव्हा त्यांचा संशय आणखी बळावला. आम्ही ऊर्दू शिकायला चाललो असे सांगितले परंतु तसे काही पुरावे न देऊ शकल्याने त्यांनी पोलिसांना कळविले. पोलीसही सूचना मिळताच  पोलीस तातडीने राजनांदगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तेथील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर हावडा वरून मुंबईला जात असलेली हावडा-मेल रेल्वेगाडी थांबताच बोगी क्रमांक एस-५ व एस-७ मधील मुलांना खाली उतरवण्यात आले. यासोबतच इतर मुलांना घेऊन जात असलेल्यां इसमालाही उतरवण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व मुले ७ ते १३ वर्ष वयोगटातील आहेत. मुलांसोबत पकडण्यात आलेल्या आरोपीचे म्हणणे आहे की, या सर्व मुलांना मदरस्यात घेऊन जात आहे. परंतु आरोपी कुठल्याही प्रकारचे दस्तावेज दाखवत नाही आहे. आरपीएफने सर्व मुलांना आपल्यासोबत नेले. मुलांची विचारपूस सुरू आहे.
मानव तस्करीची शंका
पोलीस अधिकारी यू.बी.एस. चौहान यांचे म्हणणे आहे की, मानव तस्करीची शंका नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. तपासानंतरच प्रकरण नेमके काय आहे ते उघडकीस येईल. पकडण्यात आलेले सर्व लोक एकाच समुदायातील आहेत. ही बाब लक्षात ठेवूनही तपास केला जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...