Monday 10 June 2019

वृक्ष आणि पर्यावरण कर घेणाऱ्या देवरीच्या नगरपंचायती समोरील झाडे मेली!

देवरी,दि 10 (बातमीदार) - देवरी नगरपंचायतीमध्ये सध्या विकासाची घौडदौड सुरू असून यामध्ये देवरी शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली. आता त्यावर नगरपंचायतीद्वारे वृक्ष आणि पर्यावरणाच्या नावावर जनतेकडून कर वसूल करण्यात येत आहे. परंतु, त्याच नगरपंचायतीसमोर लावण्यात आलेली झाडे उन्हाच्या दाहामुळे मेल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. परिणामी, नागरिकांनी नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
उल्लेखनीय म्हणजे दररोज या कार्यालयामध्ये मुख्याधिकारी आणि नगरसेवक यांचे येणेजाने असून नगरपंचायतीच्या आवारातील झाडांकडे कुणाचे लक्ष का गेले नाही ? असा प्रश्न निर्माण विचारला जात आहे.
नगरवाशीयांच्या म्हणण्यानुसार, शहरात विकास कार्य करीत असताना येथील रस्त्याच्या दुतर्फा भली मोठी शासकीय निधी खर्च करून वृक्ष लागवड करण्यात आली. या लावलेल्या रोपट्यांना स्वयंओलीताची सोय करण्यासाठी सुद्धा करण्यावर अमाप खर्च करण्यात आला. यामुळे देवरीकर जाम खुश होते. मात्र, देवरीकरांचा हा भ्रम लवकरच दूर झाल्याचे आता नागरिक बोलू लागले आहे. यावर्षी नगरपंचायत प्रशासनाने करांचे फेरमुल्यांकन करताना जनतेवर प्रत्येकी 1 टक्के प्रमाणे कर लादला. यातून वृक्ष संवर्धन करण्यात येणार असल्याचे नागरिकांना सांगण्यात आल्याचे बोलले जाते. असे असताना चक्क नगरपंचायती समोर लावण्यात आलेली झाडे उन्हामुळे करपली आहेत. या नगरपंचायतीच्या कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचा ताफा उपलब्ध असताना आणि लोकसेवक तिथून दररोज ये-जा करीत असताना जर नगरपंचायती समोरील झाडे मरत  असतील तर इतर झाडांचे काय, असा सवाल नगरवासियांनी प्रशासनाला केला आहे. दरम्यात, मालमत्ता करात झालेल्या वाढी संदर्भात देवरीमध्ये असंतोषाचे वातावरण असून नागरिकांनी मालमत्तांच्या मूल्यांकनाच्या पद्धतीवरच संशय व्यक्त केला आहे. परिणामी, शहरातील मालमत्तांचे योग्य मुल्यांकन करून कर लावण्यात आले तर सामान्य जनतेला दिलासा नक्कीच मिळेल, अशाही चर्चा देवरी शहरात आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...