Friday, 21 June 2019

पोलीस अधिकारी शैलेश काळे निलंबितः मुंडेच्या प्रश्नावर केसरकरांची माहिती




मुंबई (विशेष प्रतिनिधी), दि.२१ - गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेडा भूसुरुंग स्फोट प्रकरणी तत्कालीन पोलिस उपविभागीय अधिकारी शैलेष काळे यांना निलंबित केल्याची माहिती गृहराज्यमंत्री दिलीप केसरकर यांनी विधान सभेत दिली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ना. केसरकर हे उत्तर देत होते.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात 1 मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात 15 पोलीस जवानांना व एका खासगी वाहनचालकाला प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिकाऱ्यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस दलाकडे 34 भूसुरूंग रोधक वाहने असताना ‘क्युआरटी’च्या (शिघ्र प्रतिसाद पथक) 15 जवानांसाठी त्यापैकी एकही वाहन का उपलब्ध होऊ शकले नाही. हे वाहन असते तर भूसुरूंग स्फोटाची झळ कमी जीवित हानी टाळणे शक्य झाले असते, असा कयास लावण्यात येत आहे. याप्रकरणी विधानसभेत विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे  यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करुन लक्ष वेधले.त्यानंतर या हल्ल्यातील 15 पोलीस जवानांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले तत्कालीन एसडीपीओ शैलेश काळे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी विधानसभेच्या अधिवेशनात दिली. तसेच, या हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्याची कारवाई 8 दिवसात सुरू होईल, असेही केसरकर यांनी म्हटले.
मुंडे यांनी विधानपरिषेदत प्रश्न उपस्थित केला. या हल्ल्यास जबाबदार असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी डीवायएसपी शैलेश काळेवर कडक कारवाईची/निलंबनाची आणि हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचीही मागणी मुंडे यांनी केली होती. या दोन्ही मागण्या मान्य करताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी डीवायएसपी काळे यांस निलंबीत केल्याची घोषणा केली. तसेच तसेच शहीद जवानांच्या कुटुंबातील व्यक्तीस नोकरी देण्याची कारवाई 8 दिवसात करण्यात येईल, असे आश्वासनही दिले

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...