Monday, 10 June 2019

सागवान तस्करांना रंगेहाथ पकडले;पाच आरोपी अटकेत, चार फरार



अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे)दि.10ः- राखीव वनातील सागवान झाडांची अवैधरित्या कटाई करून ते ट्रॅक्टर मधून दुलाई करण्याच्या तयारीत असलेल्या वन तस्करांना वन विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.ही घटना गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत तिरखुरी-2 कक्ष क्रमांक 336 मध्ये घडली. यात पाच आरोपींना अटक केली असुन अन्य चार आरोपी फरार आहेत.
आरोपीमध्ये गेंदलाल आनंदी दुधकवर, अतुल गुलाब करसाल,राहूल सुखलाल कमरो,विलास सखाराम हलामी, दरबारी बैसाकु उईके, देवा पोटावी,प्रल्हाद कुंभरे, जोहन मडावी,व इशा गेडाम ( रा.चारभट्टी, गडचिरोली)असे आरोपींची नावे आहेत .
आरोपी हे तिरखुरी-2 राखीव वनातील कक्ष 336 मध्ये सागवान वृक्ष अवैध रित्या तोडुन ट्रॅक्टर मध्ये भरत असतांना वन विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली. यात गेंदलाल दुधकवर, अतुल करसाल, राहूल कमरो, विलास हलामी व दरबारी उईके हे पकडल्या गेले तर देवा पोटावी, प्रल्हाद कुंभरे, जोहन मडावी व इशा गेडाम फरार झाले.
वनविभाग पथकाने पाचही वनतस्करांना पकडून ट्रॅक्टर व सागवान लठ्ठे जप्त केले .जप्ती केलेले ट्रॅक्टर हे पंकज लोकचंद दरवडे( रा.गौरिटोला,कुरखेडा) याच्या मालकीचे आहे.ट्रॅक्टर मालकाचेही या प्रकरणात साठे लोटे असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यातील वंनतस्कर गोंदिया जिल्ह्यातील वनां मध्ये चोरी करतात.याचा अर्थ ही मोठी टोळी असल्याचे दिसून येते आहे. ह्या टोळीचा भांडाफोड करण्याचे आवाहन वनविभागाला आहे.सखोल चौकशी केल्यावर मोठे घबाड समोर येऊ शकते.आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे व चमू करीत आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...