Saturday, 1 June 2019

देवरीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकास अटक

देवरी,दि.01- येथील सुरभी चौकात राहणाऱ्या एका 29 वर्षीय आरोपी पत्रकाराने आज शनिवारी (दि.01) सकाळी साडेसातच्या सुमारास घराशेजारी राहणाऱ्या आपल्या काकाकडे पाहुणी म्हणून आलेल्या एका पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी देवरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेवून गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील त्या तथाकथिक पत्रकार आरोपीचे नाव अश्विन मेश्राम (वय29) राहणार देवरी असे असून तो नागपूर वरून प्रकाशित होणाऱ्या एका वर्तमानपत्राचा आणि एका युट्यूब चॅनलचा वार्ताहर असल्याचे बोलले जाते.
प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी साडेसातच्या सुमारास स्थानिक सुरभी चौकातील आपल्या काकाकडे पाहुणी म्हणून आलेल्या एका पाच वर्षीय अल्पवयीन मुलीला घराशेजारी राहणाऱ्या आरोपीने स्वतःच्या घरी बोलावून अत्याचार केल्याचा आरोप आहे. सदर प्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि च्या 376 आणि पास्को कायद्याच्या कलम 4,8 आणि 12 अन्वये गुन्ह्याची नोंद करून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि कमलेश बच्छाव हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...