जिल्हा परिषद शाळेची उत्तम कामगिरी
देवरी,दि.21- यावर्षी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत देवरीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी योजन धनवंत कावळे याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून विनीत पालीवाल तृतीय स्थानी तर डेलिया सयाम यांनी गुणवत्ता यादीत 43वे स्थान पटकाविले आहे. उल्लेखनीय योजन काŸवळेसह प्रेरणा आचले यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून हे सर्व विद्यार्थी देवरीतील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहेत, हे विशेष.
उल्लेखनीय म्हणजे गतवैभवप्राप्त असलेल्या जिल्हा परिषदेच्या या शाळेत कधीकाळी अडीच हजारावर विद्यार्थी ज्ञानार्जन करीत होते. परंतु, ख्यातनाम असलेली ही शाळा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृतप्राय अवस्थेत गेली होती. मात्र, सद्य स्थितीत या शाळेला चांगले दिवस येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या शाळेतील कार्यरत शिक्षक एम के सयाम आणि आशिष वाघदेवे हे दोघेही सुटीच्या दिवशी सुद्धा विद्यादानाचे कार्य अविरत करीत असल्याचे सांगण्यात येते. या शाळेत विद्यार्थ्यांना धडे देण्यासाठी नवनवीन उपक्रम, अॅप्स आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत चांगली वाढ झाल्याचे पालकवर्गाचे म्हणणे आहे.
शिक्षण विभागाने घेतलेल्या पुढाकारामुळे आज देवरीतील मृतप्राय झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आणि नवोदय प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शिष्यवृत्ती परीक्षेत प्राथमिक विभागातून योजन धनंजय कावळे हा जिल्ह्यातून प्रथम, विनीत पालीवाल तृतीय आणि डेलिया सयाम ही 43 व्या स्थानी आली आले. यातील योजन कावळे सह प्रेरणा देवानंद आचले यांची नवोदयसाठी निवड झाली आहे.
देवरीचे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले. नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment