गोंदिया येथील सभेत मोदींनी दीपक तलवारच्या अटकेवरुन प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला होता.
ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी अटक झालेला दलाल दीपक तलवार याचा एअर इंडियातील आर्थिक गैरव्यवहारात सहभाग दावा अमलबजावणी संचालनालयाने केला आहे. नफ्यात असलेल्या मार्गावरील एअर इंडियाची विमान सेवा बंद करुन त्या खासगी विमान कंपन्यांना देण्यात आल्याचा आरोप असून यात दीपक तलवार हा प्रमुख आरोपींपैकी एक असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
‘ईडी’ने शनिवारी प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावले असून त्यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ईडीला चौकशीत सहकार्य करण्यास तयार असून हवाई वाहतूक क्षेत्रातील गुंतागुंतीच्या प्रक्रियेबद्दल माहिती देऊ, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गोंदिया येथील सभेत मोदींनी दीपक तलवारच्या अटकेवरुन प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला होता. “सध्या या भागातील राष्ट्रवादीच्या एका नेत्याला रात्रभर झोप येत नाही. त्याचे कारण तिहारमध्ये असलेला एक कैदी आहे. तो काय बोलणार, याकडे या नेत्याचे लक्ष लागले आहे. तो बोलायला लागला की सारे सत्य समोर येईल”, असा दावा मोदी यांनी केला होता.
No comments:
Post a Comment