Thursday 29 August 2019

मुद्रा योजना : महाराष्ट्रात 84 हजार कोटींचे कर्ज वितरण

‘तरूण’ कर्ज गटात महाराष्ट्र देशात अव्वल
नवी दिल्ली दि. 29 : असंघटीत  लघु उद्योगांच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत गेल्या चार वर्षात महाराष्ट्राने84,837 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. मुद्रा योजनेत सर्वाधिक कर्ज वितरित करणा-या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुस-या स्थानावर आहे, तर या योजनेच्या तरुण कर्ज प्रकरणात महाराष्ट्राने देशात सर्वाधिक 24,138 कोटी रूपये कर्ज वितरण करून अव्वल स्थान राखले आहे.एप्रिल 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत शिशु, किशोर आणि तरूण अशा तीन गटामध्ये कर्ज पुरवठा करण्यात येतो. शिशु कर्ज गटात 50 हजार रुपयांपर्यंत, किशोर कर्ज गटात 50हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत तर तरुण कर्ज गटात 5 ते 10लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.
दीड कोटीहुन अधिक कर्ज प्रकरणे मंजूर
महाराष्ट्रात एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2019 या सव्वा चार वर्षाच्या कालावधीत 1 कोटी 62 लाख 5828 कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली. या कर्ज प्रकरणांसाठी  आजपर्यंत 87,028 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट2019 या एका वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राने 4 लाख 75 हजार कर्ज प्रकरणे मंजूर करून 27,394 कोटी रुपये प्रत्यक्ष कर्ज वितरित केले आहे.
तरूण कर्ज गटात महाराष्ट्र अव्वल
या योजनेत तरूण कर्ज गटात सर्वाधिक 5 ते 10 लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. या कर्ज प्रकारात महाराष्ट्राने एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत 3 लाख 59 हजार 840 कर्ज प्रकरणांसाठी 24,996 कोटी रुपये मंजूर केले तर प्रत्यक्षात 24,138 कोटी रूपयांचे कर्ज लाभार्थ्यांना वितरित केले आहे. देशात या प्रकारात सर्वाधिक कर्ज वितरित करुन महाराष्ट्राने सलग चौथ्या वर्षी अव्वल स्थान कायम राखले आहे.  ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2019 या  एका वर्षाच्या कालावधीत राज्यांने 1 लाख 34 हजार 617 कर्ज प्रकरणे मंजूर करून 7,609 कोटी रूपयांचे कर्ज वितरित केले आहे.
शिशु कर्ज गटात 34 हजार कोटी कर्ज
शिशु कर्ज गटात एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत  राज्यात 1 कोटी 44 लाख 63 हजार 970 कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली. या कर्ज प्रकरणांसाठी 35,246 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले तर प्रत्यक्षात  34,771कोटी रुपये लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. गेल्या एक वर्षाच्या कालावधित 40 लाखांहुन अधिक कर्ज प्रकरणे या प्रकारात मंजुर करण्यात आली असुन यासाठी  10,989 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
 किशोर कर्ज गटात 25 हजार कोटींचे कर्ज
किशोर कर्ज गटात 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.  गेल्या सव्वा चार वर्षात महाराष्ट्राने या कर्ज गटात  13 लाख 82 हजार कर्ज प्रकरणे मंजूर केली असून यासाठी  26,785 कोटी रूपये मंजूर केली तर  25,927 कोटी रुपये प्रत्यक्षात वितरित करण्यात आले आहेत. गेल्या एक वर्षाच्या कालावधीत 8,797 कोटी रूपये या कर्ज गटात महाराष्ट्राने वितरित केले आहेत.
गेल्या एका वर्षात 27 हजार कोटींचे कर्ज वितरण
मुद्रा योजनेत महाराष्ट्राने ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2019 या एका वर्षाच्या कालावधित  सर्व कर्ज प्रकारात मिळुन27,394 कोटी रूपयांचे कर्ज वितरित केले आहे. शिशु कर्ज गटात गेल्या एका  वर्षात 10,989 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. किशोर कर्ज गटात गेल्या  एका वर्षात 8,797 कोटी रूपये या कर्ज गटात महाराष्ट्राने वितरित केले आहेत, तर तरूण कर्ज गटात गेल्या एका वर्षात 7,609 कोटी रूपयांचे कर्ज वितरित केले आहे.

राज्यातील 50 आश्रमशाळांचे इंग्रजी, सेमी इंग्रजीत रूपांतरण

मुंबई,दि.29ः-आदिवासी विकास विभागातर्फे सुरू असलेल्या 50 आश्रमशाळांचे इंग्रजी-सेमी इंग्रजीमध्ये रुपांतरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या शाळांमध्ये पहिलीचा इंग्रजी माध्यमाचा वर्ग सुरू करण्यासह इयत्ता ६ वी पासूनच्या वर्गांचे विज्ञान व गणित हे विषय यंदापासून इंग्रजी भाषेमधून शिकविण्यास मंत्रीमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील सामाजिक-शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी समुहातील विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागांतर्गत 502 शासकीय आश्रमशाळा चालविण्यात येत आहेत. यापैकी 121 आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण देण्यात येते. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार मराठीमधून शिक्षण देण्यात येते असून यामध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी आहेत.
आदिवासी पालकांचीही त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याबद्दल मागणी वाढत आहे. राज्य शासनाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्याच्या योजनेंतर्गत खाजगी नामांकित शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्यात येऊन त्याला इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षणाची मोफत सोय उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत 179 खाजगी शाळांमध्ये सुमारे 54 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, ग्रामीण भागात आणखी नवीन दर्जेदार निवासी शाळा उपलब्ध होत नसल्याने आणखी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होत नाही.  या बाबींचा विचार करुन शासकीय आश्रमशाळांपैकी पहिल्या टप्प्यात 50 शासकीय आश्रमशाळांचे रुपांतरण इंग्रजी-सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे पहिल्या टप्प्यात प्रति वर्षी दोन हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होऊन त्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांचे मेडिकल, पॅरामेडिकल, अभियांत्रिकी, तंत्र शिक्षण अशा शाखांमधील शिक्षणाचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे.
एकलव्य निवासी शाळांमध्ये पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार
नाशिकच्या महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी अंतर्गत सुरू असलेल्या एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या शाळांमध्ये अगोदरच नवोदय विद्यालयांच्या धर्तीवर सहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने केंद्र शासनाने नवव्या पंचवार्षिक योजनेत भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५ (१) अन्वये वितरित होणाऱ्या निधीतून नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर “एकलव्य निवासी शाळा” सुरू करण्यात आल्या. राज्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रामध्ये 25 एकलव्य निवासी शाळा सुरू असून या शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या (CBSE) अभ्यासक्रमानुसार सहावी ते  बारावीपर्यंतचे इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षण दिले जाते.
 आदिवासी पालकांचा आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठविण्याचा कल वाढत आहे. एकलव्य निवासी शाळांमध्ये सीबीएसईच्या इयत्ता सहावीच्या वर्गामध्ये थेट प्रवेश देण्यात येत असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना भाषेची अडचण येते. पहिली ते पाचवी सीबीएसईचे वर्ग सुरू केल्यास विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया उत्तम असल्याने त्यांना सहावीपासून पुढील शिक्षण सुलभ होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होऊन आदिवासी विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांचे मेडिकल, पॅरामेडिकल, अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण अशा शाखांमधील शिक्षणाचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे.  या 25 शाळांमध्ये पहिलीचा वर्ग सुरू केल्यामुळे प्रतिवर्षी 2000 आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमात प्रवेश देणे शक्य होणार आहे.

दडपशाहीविरोधात आंदोलनकर्त्यांची निदर्शने;चंद्रपूर बंदला संमिश्र प्रतिसाद

चंद्रपूर,दि.29 : केंद्र व राज्यातील सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून बहुजन समाजातील विरोधकांवर दडपशाहीचा वापर केल्या जात असल्याच्या निषेधार्थ दि.२८ ऑगस्टला पुकारण्यात आलेल्या सर्वपक्षीय बंदला चंद्रपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदचे आवाहन करण्यासाठी सकाळीच रस्त्यावर उतरलेल्या अनेक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी अटक करून दुपारपर्यंत रामनगर व शहर पोलिस ठाण्यात बसवून ठेवित पोलिस बंदोबस्तात बाजारपेठ सुरू ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पोलिसांच्या या हस्तेक्षपेमुळे चंद्रपुरातील अनेक सामाजिक संघटनांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. लोकशाही मार्गाने सरकारी दडपशाहीचा निषेध करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिस व जिल्हा प्रशासनाकडून बळाचा वापर करण्यात आला, हे विशेष.
या बंदला अनेक व्यवसायिकांनी पाठिंबा दाखवित प्रतिष्ठाने बंद ठेवली तर काहींनी एका विशिष्ट व्यक्तीला पाठिंबा देण्यासाठी बंद असल्याचे गृहित धरुन काही धनाढ्य व्यापाऱ्यांनी विशेष प्रतिसाद दिला नाही.जेव्हा की हा बंद एका व्यक्तीसाठी नसून ओबीसींची विचारधारा दाबणार्या सरकारच्या विरोधात असताना सरकारच्या दबावात काही स्वतःला ओबीसीचे कर्तेधर्ते समजणारेही या बंदमध्ये सहभागी झाले नसल्याचे दिसून आले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आम आदमी पार्टी, बी.आर.एस पी, संभाजी ब्रिगेड, वंचित बुहुजन आघाडी, मनसे, बानाई चंद्रपूर, धनोजे कुणबी समाज संघटना, अखील भारतीय कुणबी संघटना, जनसुराज्य सेना, वैदर्भ तैली संघटन, विदर्भ राज्य आंदोलन समिती, तेलगु समाज संघटन, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षकत्तेर कर्मचारी संघटना, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, ओबीसी फेडरेशन, तिरंगा वाहनी आदी संघटनातील पदाधिकाऱ्यांनी हा बंद पुकारला होता. या पदाधिकाºयांनी सकाळी शहरात फिरून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. काही व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे संस्थापक बळीराज धोटे यांनी भाजपा नेत्यांवर सोशल मिडीयातून केलेल्या आक्षेपार्ह टिकेनंतर त्यांना पहाटेच पोलिसांनी केलेली अटक व त्यानंतर भाजपाच्या महिला आघाडीतर्पेâ धोटे यांचा पुतळा जाळून निषेधाचे आंदोलन करण्यात आले होते मात्र धोटे यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय सुडबुध््दीतून झाली असल्याचा आरोप करीत चंद्रपुरातील जवळपास ३५ विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी पोलिसांच्या व सरकारच्या दडपशाही कारवाईचा निषेध  करीत चंद्रपूर बंदचे आवाहन केले. यासंदर्भात मातोश्री विद्यालयात सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठक घेऊन बंदचे आवाहन केले होते.२८ ऑगस्टला सकाळीच चंद्रपुरातील जटपुरा गेट, गिरणार चौक, गांधी चौक व बाजारपेठ असलेल्या परिसरातील महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. दंगानियंत्रक पथकही जटपुरा गेट येथे सकाळी ७.३० वाजतापासून तैनात करण्यात आले. शहरात आंदोलनकत्र्यांनी बंदचे आवाहन करण्यासाठी रस्त्यावर उतरताच पोलिसांनी ठिकठिकाणाहून अनेकांना ताब्यात घेणे सुरू केले. काँग्रेसचे चंद्रपूर शहर अध्यक्ष नंदू नागरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांना जटपुरा गेट येथून पोलिसांनी अटक केली. राजु झोडे, विनोद थेरे, चंद्रकांत वैद्य, गजानन नागपुरे, किशन नागरकर, बापू धोटे, हिराचंद बोरकुटे, किशोर ढुंमणे, दिलीप झाडे, अजय खांडेकर,अँड फरहत बेग,सुर्या अडबाले,सुनिल भोयर ,प्रा.नाहिद हुसैन ,सुनील मुसळे, मुकेश वरारकर,संजय पारखी आदींसह अनेक कार्यकत्र्यांना अटक करून शहर पोलिस ठाण्यात दुपारपर्यंत ठेवण्यात आले व नंतर सुटका करण्यात आली. अनेक समाजिक कार्यकत्र्यांना पोलिसांनी जेरबंद करीत बंद केलेले दुकाने सुरु करण्यास पोलिस पुढाकार घेत होते. विविध राजकीय पक्ष व विविध सामाजीक संघटनाने पोलीसांचा दडपशाहीचा यावेळी निषेध केला.जटपुरा गेटजवळ घोषणाबाजी करण्यात आली.

जि.प.बांधकाम विभागातील वरिष्ठ सहाय्यक(लेखा)एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया,दि.29ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ सहायक (लेखा) रेखा राऊत सह परिचर रविंद्रा लांजेवार यांना १२०० रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज गुरुवारला रंगेहाथ पकडले.तक्रारदार हा गोंदिया तालुक्यातील रहिवासी असून कंत्राटदार आहे.तक्रारदाराला कामाचे देयके काढण्यासाठी लाच द्यायची मुळीच इच्छा नसल्याने त्याने तक्रार नोंदविली त्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

Monday 26 August 2019

ओबीसी चळवळीचे प्रखर वक्ते बळीराज धोटेंना अटक,सरकार करतेय सत्तेच दुरुपयोग



आरएसएस व भाजप मिडिया सेल संयोजक राहुल लांजेवारच्या माध्यमातून केली तक्रार


चंद्रपूर(विशेष प्रतिनिधी)दि.25 :-चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी समाजाला त्यांचे सामाजिक सविंधानिक हक्क अधिकार मिळावे यासाठी गेल्या दोन दशकाहूनही अधिक काळापासून काम करणारे ‘सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट’ संघटनेचे अध्यक्ष  व ओबीसीचे प्रखर वक्ते बळीराज धोटे यांच्याविरुध्द आरएसएस व भाजप मिडिया सेलचा सयोंजक राहुल लांजेवारने सोशल मिडियावर भगतसिंह यांच्यावर चालविण्यात आलेल्या न्यायालयीन खटल्याबाबत आक्षेपार्य टिप्पणी केल्याप्रकरणातील तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दंडुकेशाहीचा वापर करीत धोटे यांना त्यांच्या राहत्या घरातून पहाटे 4 वाजता अटक केली.विशेष म्हणजे सध्याचे सरकार हे ओबीसी चळवळीतील कार्यकर्त्यांना पोलिसी खाक्या दाखविण्यासाठी काम करीत असून हे काम सरकार ओबीसी असलेल्या त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते व मंत्र्याच्या माध्यमातूनच करीत आहे.धोटे यांना पहाटे अटक करण्यासाठी पोलिसांनी जाण्याएवढा काही गुन्हा झालेला नसतांना पहाटे अटक करायला जाणे म्हणजे विचारधारेवर काम करणार्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी असल्याचा सुर संपुर्ण महाराष्ट्रातून उमटला आहे.चंद्रपूर पोलिसांनी आरएसएस व भाजपच्या दबावात गोंदिया,गडचिरोलीतील कार्यकर्त्यांनंतर आता चंद्रपूरात धोटे यांना केलेल्या अटकेचा निषेध सर्वच स्तरातून नोंदविण्यात येत आहे.
बळीराज धोटे यांनी 20 -25 वर्षापुर्वी RSS आणि भाजपमधे काम केल्यानंतर या दोन्ही संघटनेत ओबीसींचा वापर करुन फक्त सत्ता हस्तगत करुन ओबीसी व इतर समाजात भांडण लावण्याचे काम होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी हे दोन्ही संघटन सोडून दिले.तेव्हापासून चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी आंदोलनाची सुरवातच धोटे यांनी केली आणि आजही ते करीत आहेत.धोटे यांच्यावर समाजजागृतीदरम्यान चंद्रपूर, सावली, मुल आणि ढाबा पोलीस स्टेशन येथे RSS आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात टिका केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी तक्रारी दिल्या.चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता 1860 कलम 505/2 अन्वये राहुल लांजेवार या RSS आणि भाजप मिडीया सेल चे संयोजक असलेल्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.त्या तक्रारीच्या अनुषंगाने आधी चौकशी करायला हवी होती मात्र सत्तेच्या दबावात पोलिसांनी पहाटे चार वाजता बळिराज धोटे यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले.कुठल्याही सामान्य व्यक्तीलाही पोलिसांना अशापध्दतीने अटक करण्याचे अधिकार नाहीत.कुठल्याही सभ्य व्यक्तीला अशाप्रकारे पोलीस कशी काय अटक करू शकते? असा प्रश्न बळीराज धोटे यांना पडल्यामुळे त्यांनी खाकी वर्दीत नसलेल्या पोलिसांना विचारले की माझी काय चूक आहे ? त्यावर पोलिसांनी फेसबुक वरील आक्षेपार्ह पोस्टबद्द्दल तुमच्या विरोधात तक्रार असल्याचे सांगितले आणि त्यांना अटक केली.या सोबतच सावली आणि इतर ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी तक्रारी दिल्याची माहिती समोर आली आहे.चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन मधे रात्रीच्या 1 वाजून 45 मिनिटानी गुन्हा नोंद झाल्याची माहिती असतांना अनेक वृत्तपत्रात गुन्हा नोंद होऊन अटक झाल्याचे वृत्त अगोदरच कशा प्रकाशित झाल्या ?  बळीराज धोटे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होणार असा साक्षात्कार पत्रकारांना झाला कसा ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून हा सर्व विषय कुठे तरी सत्तेचा गैरफायदा घेण्याचा दिसून येत आहे.
बळीराज धोटे यांना अटक झाल्याचे वृत्त कळताच ओबीसी चळवळीतील त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी पोलीस ठाण्यात केली. त्यावेळी तिथे असलेल्या काही पत्रकारांनी धोटे यांना झालेल्या अटकेबाबत विचारले असता पोलिसांनी  धोटे यांना बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत मानवाधिकाराचे हनन करण्याचा प्रयत्न केला.त्यातच कार्यकर्त्यांचा रोष बघून शेवटी पोलिसांनी धोटे यांना बोलू दिले असतान आपल्याला पहाटे चार वाजता पोलिसांनी कसे घरी येऊन कशापध्दतीने अटक केली,याबद्दल आपबीती सांगितली.एक उपपोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून परिस्थिती सांगितली आणि लगेच फोनवरील आदेशान्वये आपणास पोलिसांनी अक्षरशः ओढाताण करून प्रतिक्रिया देण्यास मनाई केली आणि त्यांना अमानुषपणे ओढत नेले.पोलीस हे कायद्याचे सरंक्षक राहिले नसून आत्या कायदाच वेशीवर टांगू लागल्याने लोकशाहीची हत्या करीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त करीत सरकारच्या कृत्याचा निषेध नोंदविला.

Wednesday 21 August 2019

दोन हजारांच्या उधारीवरून तरुणाची हत्या,तपास पथकाला आयुक्तांनी दिला ८० हजारांचा रिवॉर्ड !

नागपूर,दि.21 : अवघ्या दोन हजाराच्या उधारीतून वाद निर्माण झाल्याने तिघांनी एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. या हत्येच्या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर मृत किंवा आरोपींबाबत कसलीही माहिती नसतानादेखील गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने या हत्याकांडाचा छडा लावून आरोपींना अटक करण्यात यश मिळविल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिली. यावेळी सहायक आयुक्त सुधीर नंदनवार आणि तपास पथक प्रमुख नरेंद्र हिवरे हजर होते.
कामठी मार्गावर नोवाटेल हॉटेल आहे. त्याच्या बाजूला नाल्याजवळ झुडूपात एक मृतदेह पडून असल्याची माहिती हॉटेलच्या सिक्युरिटी गार्डने जुना कामठी ठाण्यातील पोलिसांना १४ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजता कळविली. पोलीस तेथे पोहचले. मात्र, तत्पूर्वीच तेथून तो मृतदेह हटविण्यात आला होता. पोलिसांनी चौकशी केली असता तेथे रक्ताचे डाग, दगड अन् कपडे आढळले. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला असता खैरी शिवारातील एका विहिरीत एक मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून त्या तरुणाची हत्या करण्यात आल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृताबाबत इकडे तिकडे चौकशी करूनही त्याची ओळख पटली नाही. त्यामुळे या हत्याकांडाचा तपास करणे पोलिसांसाठी आव्हान ठरले. पोलिसांनी हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एका ऑटोरिक्षा जाताना दिसली. इमेज फारच अस्पष्ट होती मात्र तो ऑटो बजाज मॅक्झिमा सारखा नवीन असल्याचे दिसत होते. तो धागा पकडून पोलिसांनी बजाज मॅक्झिमा ऑटो विकणाऱ्या वितरकांकडे जाऊन १ जानेवारी ते १३ जुलै २०१९ दरम्यान कुणाकुणाला ऑटो विकले त्याची माहिती काढली. या कालावधीत एकूण ७४९ ऑटो विकण्यात आल्याचे कळाल्याने युनिट तीन मधील १५ पोलिसांना प्रत्येकी ५० ऑटोचालकांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यातून आरोपी ऑटोचालक महेश ऊर्फ मुकेश भय्यालाल खरे (वय २९, रा. राजीव गांधीनगर, जुना कामठी) याने मृताचे नाव शेख माजिद ऊर्फ मतिन कुल्फीवाला असल्याचे सांगून तो फुकटनगरातील रहिवासी असल्याचे सांगितले. दोन हजार रुपयाच्या उधारीसाठी त्याने तगादा लावल्याने त्याची दोन साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली.त्यावरून पोलिसांनी खरे तसेच त्याचा साथीदार शेख सलमान अब्दुल रहिम शेख (वय २५, रा. येरखेडा) यालाही अटक केली. त्यांचा एक साथीदार फरार असून आम्ही त्यालाही लवकरच अटक करू, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
आयुक्तांनी दिला ८० हजारांचा रिवॉर्ड !
मृत मतिन अकोला जिल्ह्यातील तेल्हारा (मालेगाव) येथील रहिवासी होता. तो येथे एकटाच राहायचा अन् कुल्फी विकून उदरनिर्वाह करायचा. त्यामुळे त्याची हत्या झाल्यानंतर आरोपी वगळता कुणालाही त्याची माहिती नव्हती. पोलिसांनी त्याची ओळख पटविण्यासाठी संगणकाच्या साहाय्याने मतिनचे चित्र बनवून त्याचे फ्लेक्स तयार केले आणि ते जागोजागी लावले. मात्र, मतिनची कुणी ओळख पटवली नाही. तरीसुद्धा एका ऑटोवरून पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा केला. पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, सहायक निरीक्षक पंकज धाडगे, योगेश चौधरी, एएसआय राजेंद्र बघेल, रफिक खान, हवलदार शत्रुघ्न कडू, अनिल दुबे, शैलेश पाटील, अरुण धर्मे, अतुल दवंडे, शाम कडू, प्रवीण गोरटे, राकेश यादव, टप्पूलाल चुटे, परवेज शेख, संदीप मावळकर, सूरज शिंगणे, राजू पोतदार, शेख फिरोज, शेख शरिफ आणि सत्येंद्र यादव यांनी ही कामगिरी बजावली. याच पथकाने यापूर्वी कळमना, गणेशपेठ, जरीपटका आणि आता या गंभीर गुन्ह्याची उकल केली. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या पथकाला ८० हजारांचा रिवॉर्ड घोषित केला.

21 ते 27 आॅगस्ट 2019 बेरार टाईम्सचा अंक.............गोंदिया विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची गर्दी ....berartimes.com





Tuesday 20 August 2019

जि.प.अध्यक्ष व पालकमंत्र्यांच्या हस्ते शालेय दप्तरांचे वितरण


देवरी: दि.१९ :देवरी येथील आफताब मंगल कार्यालय येथे इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेणाऱ्या २३४३ विद्याथ्र्याना शालेय दप्तर वितरणाचा शुभारंभ  पालकमंत्री डॉ. परिणय फुके व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते सोमवारला करण्यात आला.यावेळी आमदार संजय पुराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली, महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनोडे, जि.प. समाजकल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, देवरीच्या पंचायत समिती सभापती सुनंदा बहेकार, देवरीच्या नगराध्यक्षा कौशल्या कुंभरे,जि.प. सदस्य उषा शहारे व माधूरी कुंभरे,शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबईचे सहायक व्यवस्थापक हितेंद्र गांधी, इनोबल सोशल इनोव्हेशन मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग भंडारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीने देवरी, सालेकसा व अर्जुनी/मोरगाव या आदिवासी बहूल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेणाऱ्या २३४३ विद्याथ्र्यांना शालेय दप्तर पुरविण्यात येणार आहे. यावेळी देवरी तालुक्यातील जि.प.च्या १२ प्राथमिक शाळेतील ९७ विद्याथ्र्यांना शालेय दप्तर वितरीत करण्यात आले. या दप्तराचे वजन ४०० ग्राम असून त्याचे रुपांतर विद्याथ्र्यांना बसण्यासाठी चटई, लिहीण्या व वाचण्याकरीता डेस्क या दप्तरासोबत देण्यात आले आहे. पर्यावरण पुरक असे हे दप्तर आहे. विद्याथ्र्यांना साबणाने हात धुण्यासाठी साबण ठेवण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. मुलांनी केलेला कचरा इतरत्र न टाकावा यासाठी दप्तरामध्ये छोटी पिशवी सुध्दा आहे. या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, सर्व शिक्षा अभियानाचे श्री बिसेन, श्री ठोकने यांचेसह विविध शाळांचा केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी त्यांचे पालक तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

देवरी ग्रामीण रुग्णालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन


देवरी दि. 19 : देवरी हा तालुका राज्याच्या टोकावर आहे तसेच येथून राष्ट्रीय महामार्ग जातो. महामार्गावर अपघात झाल्यास जखमीला तातडीने उपचार मिळाले पाहिजे. हा तालुका आदिवासी बहुल, दुर्गम व नक्षलग्रस्त असल्यामुळे या तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
19 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय देवरीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन डॉ. फुके यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार केशवराव मानकर, नगराध्यक्ष कौशल्या कुंभरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ अकबर अली, जि.प.समाजकल्याण समिती सभापती विश्वजीत डोगंरे, पंचायत समिती सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके,प्रमोद संगीडवार, महेश जैन,  यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. फुके म्हणाले, देवरीसारख्या मागास, दुर्गम व नक्षलग्रस्त भागात चांगली आरोग्याची सुविधा देवरी येथे नव्याने निर्माण होणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत मिळणार आहे. इमारतीचे बांधकाम उत्तम दर्जाचे झाले पाहिजे. देवरी हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे अपघाताच्या घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे यासाठी चांगले ट्रामा केअर सेंटर सुरु करावे. चांगला बगीचा या नवीन इमारतीच्या परिसरात तयार करावा. जुने झाडे तोडू नये. पाच वर्षात देवरी तालुक्यात विकास कामे झाली आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार पुराम म्हणाले, तालुक्यातील रुग्ण व नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. यासाठी सुसज्ज अशी ग्रामीण रुग्णालयाची इमारत दिडवर्षाच्या आतच तयार होणार आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या देखील पाहिजे त्या प्रमाणात असली पाहिजे. हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे अपघातातील जखमींना वेळीच उपचार मिळाले पाहिजे. जिल्हयात अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती करतांना या नक्षलग्रस्त तालुक्यातील रिक्त पदे प्राधान्याने भरावे. देवरी शहराच्या विकासासाठी सतरा कोटीची विकास कामे मंजूर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नव्याने बांधण्यात येणाऱ्या देवरी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीवर 12 कोटी 32 लाख 65 हजार रुपये खर्च येणार असून ही इमारत एक वर्षाच्या आत पूर्ण होणार आहे. याइमारतीमध्ये वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांचे निवासस्थाने, विविध कक्ष राहणार आहे.

Monday 19 August 2019

नक्सलग्रस्त अतिसवेंदनशील मिसपीरी/धमदीटोला ग्राम पहुँचे पालकमंत्री, 2011 में नक्सलियों ने ग्राम पंचायत सहित सभी दस्तावेजो को जला डाला था।

8 साल बाद मिसपीरी ग्राम के लोगो को उनकी पहचान मिली- पालकमंत्री डॉ.परिणय फुके

देवरी (चिचगड) दि 19 ऑगस्ट :-आजादी के बाद से अब तक ये पहला अवसर है कि कोई मंत्री, पालकमंत्री देवरी तहसील के इस अतिसवेंदनशील नक्सलग्रस्त भाग मिसपीरी/धमडीटोला क्षेत्र में पहुँचा होगा। यहाँ वर्ष 2011 में नक्सलियों द्वारा मिसपीरी ग्राम पंचायत को जला दिया था जिसमें 5 गाँव का रिकॉर्ड जलकर खाक हो गया था। तब से पिछले 8 साल से यहां के ग्रामीण अपनी पहचान पाने, शासकीय योजनाओं का लाभ उठाने आदि से वंचित थे। जिन्हें न्याय दिलाने का कार्य महाराष्ट्र शासन, पालकमंत्री फुके व विधायक पुराम ने किया है।

पालकमंत्री डॉ. परिणय फुके को इस गाँव मे जाने के लिए अनेको लोगो ने मना किया। पर पालकमंत्री ने निर्भीक और निडर होकर इस क्षेत्र में आने की सहमति दर्शायी। गौर हों कि इस क्षेत्र के लोगो को न्याय दीलांने हेतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विशेष तौर पर यहा भेजा। मुख्यमंत्री ने कहा था कि उनके गोंदिया आगमन के पूर्व ही इस गाँव के साथ न्याय होना चाहिए। और 3 अगस्त मुख्यमंत्री के आगमन के पूर्व 2 अगस्त को इस ग्राम पंचायत के साथ न्याय हो गया। 

आज 19 अगस्त को आदेश की प्राप्ति होते ही, 8 साल बाद ग्रामीणों को जन्म मृत्यु अभिलेख नोंदणी, जन्म प्रमाण पत्र का वितरण किया गया।

पालकमंत्री ने कहा, वे आदिवासीयो के साथ न्याय करेंगे। उनके खेती उत्पादन के अलावा उन्हें विकास की धारा में लाने के लिए रोजगार के अवसर उपलब्ध कराएंगे। उन्होंने कहा भंडारा जिले में केंद्र सरकार के भारत पेट्रोलियम मंत्रालय के माध्यम से इथेनॉल निर्मिति का बड़ा प्रकल्प प्रारंभ करने जा रहे। ये इथेनॉल धान की तनस से निर्मित होगा। तनस का प्रति क्विंटल 7 हजार भाव मिलेगा और करीब 15 हजार युवाओ को रोजगार मिलेगा। देवरी में स्टील फैक्टरी प्रारंभ हो चुकी है जहाँ इसी क्षेत्र के आदिवासी युवाओ को रोजगार प्राप्त हो रहा है। 

इस दौरान क्षेत्र के विधायक संजय पुराम, जिप अध्यक्ष सीमा मड़ावी, जिप उपाध्यक्ष अल्ताफ हामिद, सीईओ राजा दयानिधि, जिला भाजपा संगठन मंत्री बालाभाऊ अंजनकर, मिसपीरी सरपंच दुर्गसिंग कुंभरे, उपसरपंच जीवनलाल सलामे,  जीप सभापति लता दोनोड़े, जिप सदस्य माधुरिताई कुंभरे, देवरी पंस सभापति सुनंदाताई बहेकार, उपसभापति गणेशभाऊ, जिप सदस्य उषा ताई सहारे, सुंदर लाल सिंदराम, गिरधारी करसाल, रविन्द्र पराते, मोतीराम सयाम, गोपाल ओमेटि, बपेरियाजी, भगदानी टेकाम, सुखराम जी, समेत अनेको नागरिक उपस्थित थे।

आदिवासी दुर्गम भागों में स्वास्थ्य सुविधा हेतु बाइक एम्बुलेंस प्रारंभ करेंगे- पालकमंत्री डॉ. फुके


देवरी,19 ऑगस्ट :-   नक्सल प्रभावित देवरी तहसील के अतिदुर्गम क्षेत्र ग्राम ककोडी में 2 करोड़ 29 लाख रुपयों की लागत से निर्मित सुसज्ज भव्य प्राथमिक आरोग्य केंद्र का लोकार्पण पालकमंत्री डॉ. परिणय फुके के हस्ते आज किया गया। पालकमंत्री ने कहा, इतने दुर्गम क्षेत्र में अत्याधुनिक सुविधाओं से सुसज्ज अस्पताल का निर्माण सम्भव होना, ये विधायक संजय पुराम का अथक प्रयास है। मैं उनका हृदय से आभार मानता हूँ। इस आरोग्य केंद्र में ओपीडी, शस्त्रक्रिया, प्रसूति, कुटुबं कल्याण, ओषधी, लैब, 24 घंटे प्रसूती सुविधा सहित कैंसर जैसी जटिल बीमारी की जांच भी इस दुर्गम भाग के ग्रामीणों को प्राप्त हुई है, जो इस क्षेत्र के लिए एक वरदान साबित होगी। ग्रामीणों को स्वास्थ्य सुविधा का लाभ प्राप्त होगा। अब अनेक गावो के लोगो को देवरी और गोंदिया नही जाना पड़ेगा।पालकमंत्री ने कहा, दुर्गम, अतिसवेंदन शील आदिवासी क्षेत्रों के नागरिकों को स्वास्थ्य लाभ देने हेतु जल्द ही प्राथमिक उपचार के लिए बाइक एम्बुलेन्स सेवा प्रदान की जाएगी। पालकमंत्री ने कहा मैं सवास्थ्य के साथ साथ रोजगार, विकास पर अनेक कार्य कर विकसित क्षेत्र बनाने हेतु कृतसंकल्पित हूँ।

इस दौरान क्षेत्र के विधायक संजय पुराम, जिप अध्यक्ष सीमा मड़ावी, जिप उपाध्यक्ष अल्ताफ हामिद,सीईओ राजा दयानिधि,ककोडी सरपंच रियाज खान, जिला स्वास्थ्य अधिकारी श्याम निमगड़े, जीप सभापति लता दोनोड़े, जिप सदस्य माधुरिताई कुंभरे, देवरी पंस सभापति सुनंदाताई बहेकार, उपसभापति गणेशभाऊ, जिप सदस्य उषा ताई सहारे, तालुका वैधकीय अधिकारी ललित कुकडे, आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी सुनील यरने, महेंद्र मोहबंसी आदि समेत अनेको नागरिक उपस्थित थे।

Sunday 18 August 2019

महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

गडचिरोली,दि.18ः-राज्य शासनाने जारी केलेल्या नव्या बिंदू नामावलीत गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी प्रसर्गासाठी जुनेच ६ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. यामुळे दहा दिवसांपूर्वी गडचिरोली व देसाईगंज येथील महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा हवेत विरली आहे.गेल्या पाच वर्षात या मुख्यमंत्र्यांनी व भाजप सरकारने ओबीसीच्या गळचेपी धोरणालाच महत्व दिले असून ओबीसी विरोधी निर्णय घेण्यातच ही सरकार राहिल्याची टिका ओबीसीच्या वतीने व्यक्त केली जाऊ लागली आहे.
राज्य शासनाच्या वेगवेगळय़ा आदेशान्वये गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्क्यावर आणण्यात आले आहे. त्यामुळे २00२ पासून वर्ग ३ व ४ च्या पदभरतीतून ओबीसी प्रवर्गातील युवक, युवती बाद झाले आहेत . जिल्ह्यातील ४२.५ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय केला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, या मागणी बरोबरच जिल्ह्यात अनुसूचित क्षेत्रातील गावे घोषित करताना त्या गावांमध्ये ५0 टक्क्यापेक्षा अधिक आदिवासी समाजाची लोकसंख्या असणे गरजेचे आहे. परंतु ज्या गावांमध्ये गैरआदिवासींची संख्या ५0 टक्क्यांहून अधिक आहे; अशी गावेसुद्धा अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बिगर अनुसूचित क्षेत्र कमी झाले असून, ओबीसी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा गडचिरोली जिल्ह्यात पोहचली. तेव्हा देसाईगंज व गडचिरोली येथील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाचे कमी झालेले आरक्षण १५ दिवसांच्या आत निर्णय घेऊन मार्गी लावू, असे आश्‍वासन दिले होते. यामुळे जिल्ह्यातील ओबीसी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु १६ ऑगस्ट २0१९ रोजी सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढून ओबीसींना जुनेच ६ टक्के व अनूसचित जमातीसाठी २४ टक्के आरक्षण कायम ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी बांधवावर अन्याय केला आहे. उलट, मराठा समाजाला (एसईबीसी) १३ टक्के व ईडब्लूएसला १0 टक्के आरक्षण दिले आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ५0 टक्क्यांहून अधिक ओबीसी समाज असतानाही ओबीसी आरक्षण जैसे थे ठेवण्यात आले, तर एक टक्काही नसलेल्या मराठा समाजाला १३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ १४, नंदुरबार ,धुळे , ठाणे , नाशिक ,पालघर, रायगड येथे ९ टक्केच आरक्षण म्हणजेच जैसे थे आरक्षण आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी बांधवानी नाराजी व्यक्त केली आहे.

साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य


मृत गौतम फुलकुवरच्या वडिलांचा पत्रकार परिषदेत आरोप


मृत गौतम फुवकुवर
देवरी,दि.18-देवरीपासून दक्षिणेला सुमारे 15 किलोमीटरवर असलेल्या कवलेवाडा येथील गौतम फुलकुवर आणि परमेश्वर खोबा यांच्यात क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली. यात गौतमचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात पुराव्यासह तक्रार देवूनही पोलिस आरोपीवर कारवाई करीत नसल्याचा आरोप मृताचे वडील रामभरोस फुलकुवर यांनी गेल्या गुरूवारी देवरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत (दि.15) केला. 
पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, गौतम रामभरोस फुलकुवर (वय 30) आणि परमेश्वर हिरालाल खोबा हे दोन्ही नागपूरला कामाच्या शोधात गेले होते. परंतु, नागपूरात काम न मिळाल्याने 25 जुलैला ते देवरी येथे परत आले. संध्याकाळी सात त आठ वाजेच्या दरम्यान स्थानिक फुंडे हॉटेलमध्ये नाश्त्याच्या देवाण घेवाणीवरून त्यांच्या हाणामारी झाली.
फत्रकार परिषदेत बोलताना रामभरोस फुवकुवर आणि नातेवाईक
यामध्ये गौतम हा बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर परमेश्वर याने आपल्या वडिलांना फोन करून देवरीस येण्यास सांगितले. दरम्यान, मृत गौतमचे वडील देखील रुग्णालयात आले. देवरी पोलिसांत तक्रार करावी लागेल, असे म्हणताच परमेश्वर आणि त्याच्या वडिलांनी मनाई करून गौतमच्या वडिलांनाच जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे गौतमच्या वडिलांनी घाबरून मुलाला वाचविण्यासाठी गोंदियाला नेण्याची विनंती केली. विशेष म्हणजे गौतमवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सुद्धा बघ्याचीच भूमिका घेतल्याचा आरोप सुद्धा गौतमच्या नातेवाइकांसह वडिलांनी केला आहे. 
 गौतमला गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथे जागा उपलब्ध नसल्याने त्याला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान गौतमचा 30 जुलै रोजी मृत्यू झाला.. या सर्व घटनेचे साक्षीदार मनोज टेंभूर्णे, पवन देशमुख आणि भाऊराव वालदे हे असून या तिघांनी देवरी पोलिसांसमोर साक्ष दिली आहे. असे असताना सुद्धा देवरी पोलिस संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप रामभरोस फुलकुवर यांनी केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकरणी नागपूर पोलिसांनी मर्ग दाखल केल्याची सूचना देवरी पोलिसांना प्राप्त झाली आहे. अद्याप शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला नसल्याने मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मृत गौतम हा दारूच्या नशेत असल्याचा अहवाल वैद्यकीय सूत्रांनी दिला असून कोणतीही तक्रार नसल्याचे मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला लेखी दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याशिवाय नागपूर रुग्णालयातही कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे लेखी निवेदन दिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तरीही शवविच्छेदन अहवालाची आम्ही वाट पाहत आहोत. चौकशी योग्य दिशेने सुरू असून कोणी दोषी आढळ्यास कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Saturday 17 August 2019

सर्पदंशाने दोन वर्षीय बालकाचा मृत्यू




भंडारा,दि.17 : अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.राघव सतीश मेंढे (२) असे मृत बालकाचे नाव आहे. राघव शुक्रवारी घरापुढील अंगणात खेळत होता. खेळण्यात मग्न असताना अचानक एका विषारी सापाने  दंश केला. मात्र कुणाला कळले नाही. काही वेळाने तो अस्वस्थ झाल्याचे पालकांच्या लक्षात आले. बघितले तर त्याच्या उजव्या पायाला कशाचा तरी दंश झाल्याचे लक्षात आले. त्याला तात्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालय उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आई-वडिलांचा एकुलता मुलगा मृत्युमुखी पडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

राजकारणाची दिशा बदलत चालल्याने विकासाचे व्हिजन संपले-खा.पटेल




गोंदिया,दि.17:गेल्या चार पाच वर्षातील राजकारणाकडे बघितल्यास राजकारणात समाजकारण आणि विकासाचे व्हिजन संपलेले लोक आले असून आता पैसा, कंत्राटदारी आणि सत्ता या बळावर राजकारणी आपला फायदा करून घेऊ लागल्याने राजकारणाची दिशाच बदलत चालल्याने विकासासाठी मारक असल्याचे राष्ट्र वादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रपरिषदेत सांगितले. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे स्पष्ट करीत लोकसभेसारख्या निकालाची अपेक्षा सत्ताधार्यांनी करु नये परिवर्तन नक्की होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.पत्रपरिषदेला माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते.
अलिकडे नेत्यांना विकासाची दुरदृष्टी नाही. पैसा, ठेकेदारी आणि सत्तेच्या भरोशावर राजकारण केले जात आहे. भावनात्मक प्रचार करून तात्कालीक फायदा करून घेतला जातो. समाजसेवा, चांगले काम करण्याची वृत्ती, क्षमता आणि दुरदृष्टी राजकीय नेत्यांमधून हरवत चालल्याचे दिसत आहे. हा प्रकार आता जनतेने समजून घेतला पाहिजे अन्यथा जिल्हा विकासापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही, असे खासदार पटेल म्हणाले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार आहे. जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. भाजपा सरकारने ३७० कलम काश्मीरमधून हटविले. सुरूवातीला आम्ही त्यांच्या विरोधात नव्हतो. परंतु ज्यापद्धतीने त्यांनी काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून केंद्रशाशित प्रदेश केला. त्यामुळे आम्ही नाराज झालो. परिणामी आम्ही मतदानातही भाग घेतला नाही, असे त्यांनी सांगितले. बॅलेट पेपरवर मतदान व्हावे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. परंतु निवडणूक आयोग काय निर्णय घेते यावर सर्व अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.वंचित बहुजन आघाडीने सकारात्मक भूमिका घेतल्यास त्यांनाही सोबत घेता येईल असे म्हणाले.

विनाअनुदानित दोन शिक्षकांचे झाडावर चढून आंदोलन




गोंदिया ,दि.17: कनिष्ट महाविद्यालय विना अनुदानीत शाळेच्या दोन शिक्षकांनी त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास स्थानिक जि.प.च्या आवारातील झाडावर चढून आंदोलन केल्यामुळे जि.प.प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. जोपर्यंत आमच्या खात्यावर वेतन जमा केले जात नाही आणि मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत झाडावरुन खाली उतरणार नाही.अशी भूमिका या शिक्षकांनी घेतली.अखेर उपशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर तब्बल दीड तासानंतर दोन्ही शिक्षक खाली उतरले.
एन.सी.मच्छीरके आणि भास्कर लांजेवार असे झाडावर चढून आंदोलन करणाऱ्या विना अनुदानीत शाळेच्या शिक्षकांची नावे आहे. मागील तेरा चौदा वर्षांपासून आम्ही विना वेतन विद्यार्थ्यांना विद्या ज्ञानाचे काम करीत आहोत.शासनाने वेळावेळी आम्हाला वेतन आणि इतर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याची पुर्तत: अद्यापही केली नाही. त्यामुळे आम्हाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मागील बारा वर्षांपासून आम्ही उधार उसणवारी करुन कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत आहोत. मात्र आता ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना सुध्दा ते परत द्यायचे आहे.आधीचेच कर्ज असल्याने आता नवीन कर्ज कोण देणार अशी स्थिती विना अनुदानीत शाळेतील शिक्षकांची आहे. वांरवार आंदोलने आणि निवेदन देऊन सुध्दा शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही.त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागल्याचे या दोन्ही शिक्षकांनी सांगितले. या दोन्ही शिक्षकांनी जि.प.च्या आवारातील एका झाडावर चढून आंदोलन केले.त्यामुळे जि.प.मध्ये काही वेळ चांगलीच तारांबळ उडाली होती. या दोन्ही शिक्षकांना झाडावरुन खाली उतरण्याची विनंती त्यांचे सहकारी, जि.प.चे अधिकारी आणि पोलीस करीत होते. मात्र जोपर्यंत आमच्या खात्यावर दोन दिवसात वेतन जमा होण्याचे आणि इतर मागण्या मंजूर करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका या शिक्षकांनी घेतली होती. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. तर झाडावरील शिक्षक उडी मारुन खाली पडू नये यासाठी झाडाच्या खाली जाळी लावण्यात आली होती. चोख पोलीस बंदोबस्त सुध्दा तैनात करण्यात आला होता.अखेर जि.प.शिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर दोन्ही शिक्षक तब्बल दीड तासाने खाली उतरले. त्यानंतर उपस्थित सर्व शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

लायन्स क्लब देवरीच्या वतीने रक्षाबंधन साजरी

देवरी,17 -लायन्स क्लब देवरीच्या वतीने आई टी बी पी च्या जवानांसोबत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या वेळी कंपनी कमांडर भाजराम भट्ट, इन्स्पेक्टर ताराचंद, श्यामलाल, सब इन्स्पेक्टर रामजी लाल, सहाय्यक उप निरीक्षक जितेंद्र, योगेंद्र, वीरेंद्र ,कर्नल सिंग, हवालदार सतीश , ईश्वरसिंग, शिपाई हेमंत,अमित, परशुराम , अरविंद, सदर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
रक्षाबंधनाच्या सणाला सदर जवान घरी जाऊन सण साजरा करू शकत नाही त्यामुळे लायन्सक्लबचे अध्यक्ष पिंकी कटकवार, कोषाध्यक्ष लक्ष्मी पंचमवार ,पुष्पा नलपते,ज्योती रामटेककर यांच्या सहकार्यानेसदर कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्रातील वृक्ष लागवड ही सरकारी नौटंकी - अभिनेता सयाजी शिंदेंनीचा आरोप

Tree planting in Maharashtra is a bit tricky; Actor Sayaji Shinde makes serious allegations against the government | महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे थोतांड; अभिनेता सयाजी शिंदेंनी सरकारवर केला गंभीर आरोप   
मुंबई,दि.17 - महाराष्ट्रातील 5 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम म्हणजे शुद्ध नौटंकी आहे.  या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून फार मोठ्या भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे, असा आरोप अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या 33 कोटी वृक्ष लागवडीवर टीका करत सयाजी शिंदे म्हणाले की, मोजक्याच ग्रामपंचायती झाडे लावण्याचा उपक्रम करतात. 3 हजार 300 झाडे किती ग्रामपंचायतीने लावलेत?  33 कोटी वृक्ष लावल्यावर जपणार कुठे? पाणी आणणार कुठून? दरवर्षी लावलेल्या झाडांचे, त्याला जगविण्यासाठी आलेल्या खर्चाचा हिशोब द्यावा ,अशी मागणी त्यांनी राज्य सरकारला केली. 
तसेच वृक्षांमध्ये 250 जाती आहेत. नगरपालिका शाळांच्या प्रत्येक अंगणात गुलमोहर, उंच झाडे दिसतील. दरवर्षी त्याच खड्ड्यात जाऊन झाडं लावली जातात. मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना वृक्षांच्या जातीची माहिती नाही. कोणतं झाड लावलं पाहिजे याची माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे केवळ नाटक आहे. असा संताप अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. 
या वृक्ष लागवडीबाबत सयाजी शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वनखात्याला अनेक प्रश्न विचारले आहेत. 
1) शासनाच्या नर्सरीमध्ये सगळ्या जाती का उपलब्ध नाहीत 
2) शासन दुसऱ्या राज्याचा आदर्श का घेत नाही. उदा. कर्नाटकातील नर्सरी अनेक जाती उपलब्ध होतात. 
3) सगळे अधिकारी आहे त्यांच्याकडून माहिती घ्या
4) लोकांकडून पैसे घेऊन वृक्ष लागवड होत असेल तर त्या सर्व करदात्यांचा पैशाचा हिसोब द्यावा 


स्वातंत्र्यदिनी देवरी येथे वृक्षारोपण

देवरी,दि.17- भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गटसाधन केंद्राच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
अध्यक्षस्थानी देवरीचे गटशिक्षणाधिकारी मोटघरे हे होते. प्रमुख पाहुणे पोलिस उपनिरीक्षक दिलीप जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी साकुरे, पोलिस बिनतारी संदेश विभागाचे राजू अतकरी, इंगोले,, बाहेकार आदी मान्यवर उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गटसमन्वयक धनवंत कावळे, आयईडी समन्वयक रमेश पटले, विषय साधनव्यक्ती उमेश भरणे, विजय लोथे, रामू शेंदरे, शंकर वलथरे, संजय मस्के, प्रमोद सिंगणजुडे, रामटेके, संजय मेश्राम, शर्मा गाते,व केंद्रप्रमुख मोरेश सूर्यवंशी आदींनी सहकार्य केले.


Friday 16 August 2019

स्कुलव्हॅनच्या चाकात येऊन मुलाचा मृत्यू

गोंदिया,दि.16ः-गोंदिया शहर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या मुर्री येथील मुख्य चौकपरिसरात आज गोंदियातीलच एका खासगी शाळेच्या स्कुलव्हॅनच्या चाकात येऊन लहान मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज घडली.
अपघात होताच आजुबाजूच्या नागरिकांनी सदर वाहनाची तोडफोड केली.मिळालेल्या माहितीनुसार अपघातात ठार झालेला मुलगा त्याच स्कुलव्हॅनमधून उतरला आणि त्याच व्हॅनच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे त्यामुलाच्या डोक्यावरुन व्हॅन गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनास्थळी पोलीस निरिक्षक उमेश पाटील आपल्या ताप्यासह दाखल झाले आहेत.मृत मुलाचे नाव वृत्तलिहिपर्यत कळू शकले नव्हते.(सविस्तर माहिती थोड्याच वेळात)

Wednesday 14 August 2019

नगरपंचायतच्या अपूर्ण नालीत पडुन मुलगा जखमी

देवरी :14 नगरपंचायत देवरी च्या प्रभाग क्रमांक ४ मधे नाली बांधकाम सुरु असून मागिल १ आठवड्यापासुन नालीचे काम बंद असल्यामुळे अपघाताना आमंत्रण सुरु आहे.
आज (१४) ला सायंकाळी वीर भाटिया हा मुलगा सायकल चालवित असतांना नालीत पडला आणि जखमी झाल्याचे वृत आहे. त्याला उपचारासाठी हलविल्याचे वृत आहे.
विशेष म्हनजे सदर वार्ड हे नगराध्यक्ष यांचे असल्याचे बोलले जाते.

acebail

नांदेडमध्ये शनिवारपासून पत्रकारांचे राष्ट्रीय अधिवेशन

नांदेड,दि.14 (नरेश तुप्तेवार) -  शहरातील मालेगाव मार्गावरील भक्ती लॉन्समध्ये दोन दिवसीय  मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या १७ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. या अधिवेशनाला देशभरातून अडीच हजार प्रतिनिधी येणार असल्याची शक्यता आहे. या अधिवेशनाची जय्यत तयारी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने केली आहे, अशी माहिती अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व संयोजन समितीचे अध्यक्ष आ.डी.पी.सावंत यांनी दिली आहे. 
मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद मुंबईचे हे ४२ वे राष्ट्रीय अधिवेशन आहे.या अधिवेशनाचे उद्घाटन दि.१७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,राज्यमंत्री अर्जुन खोतकर,प्रमुख मार्गदर्शक म्हणून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,झी-न्यूजचे कार्यकारी संपादक प्रसाद काथे तर अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.च्या अध्यक्ष श्रीमती शांताबाई जवळगावकर,महापौर सौ.दीक्षा धबाले,खा.हेमंत पाटील,खा.सुधाकर श्रृंगारे, आ.राम रातोळीकर, आ.अमर राजूरकर, आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ.सुभाष साबणे, आ.प्रदीप नाईक, आ.वसंतराव चव्हाण, आ.डॉ.तुषार राठोड, आ.अमिताताई चव्हाण, आ.नागेश पाटील आष्टीकर,माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील, माजी आमदार गंगाधर पटणे,माजी मंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे,पोलिस अधीक्षक संजय जाधव,जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी,गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भूपिंदरसिंघ मिनहास आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व माजी अध्यक्षांचा सत्कारही होणार आहे. 
दुसरे सत्र दुपारी २ ते ३.३० वा. होणार आहे. सोशल मिडीयाचं आव्हान इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मिडियाला पेलवणं आता अवघड झालयं का? यावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर, दै.सकाळचे संपादक श्रीमंत माने,जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक आशिष जाधव,जेष्ठ संपादक विलास आठवले,न्यूज नेशनचे संपादक सुभाष शिर्के,स्वा.रा.ति.म.वि.नांदेडच्या वृत्तपञ विभागाचे संचालक डॉ.दीपक शिंदे, बी.बी.सी.मराठी न्यूजच्या हलिमा कुरेशी या परिसंवादात सहभागी होणार आहेत. 
दुसरा परिसंवाद दुपारी ४ ते ५.३० वा.होणार आहे. यात माध्यम स्वातंत्र्य केवळ तोंडी लावण्यापुरतं उरलंय का? यावर परिसंवाद होणार आहे. यात भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये,ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत,डाव्या आघाडीचे नेते भालचंद्र कांगो,जेष्ठ कायदेतज्ञ असिम सरोदे,मुंबई मराठी पञकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे,सामाजिक कार्यकर्ते मंगल खिंवसरा हे सहभागी होणार आहेत.
दुसऱ्या दिवशी दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते १०.३० वा. दरम्यान ज्येष्ठ पत्रकार व परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याशी चर्चा व संवाद होणार असून ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी हे संवादक म्हणून काम पाहणार आहेत. परिषदेचे खुले अधिवेशन सकाळी १०.४५ ते दुपारी १२.३० वा.दरम्यान होणार आहे.समारोप समारंभ दुपारी २ ते ४ वा. दरम्यान होणार असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मुख्य अतिथी म्हणून तर, प्रमुख पाहुणे म्हणून कामगार मंत्री संभाजी पा.निलंगेकर उपस्थित राहणार आहेत. तर विशेष अतिथी मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख व अध्यक्षस्थानी परिषदेचे भावी अध्यक्ष गजानन नाईक हे राहणार असून यावेळी विशेष निमंत्रित म्हणून टाईम्स ऑफ इंडीयाचे वरिष्ठ संपादक प्रफुल्ल मारपकवार, आजतक चे संपादक साहिल जोशी, मुंबई मराठी पञकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे,मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष धमेंद्र जोरे, टि.व्ही.जर्नालिस्ट असोसिएशनचे विनोद जगदाळे,मंञालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे दिलीप सपाटे,महाराष्ट्र श्रमिक पञकार संघाचे प्रदीप मैत्र,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे किरण नाईक,महाराष्ट्र संपादक परिषदेचे संजय मलमे,बीयुजे चे सरचिटणीस इंदरकुमार जैन उपस्थित राहणार आहेत.
 या राष्ट्रीय अधिवेशनास पञकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,भावी अध्यक्ष गजानन नाईक, सरचिटणीस अनिल महाजन,नुतन कार्याध्यक्ष शरद पाबळे,उपाध्यक्ष शिवराज काटकर, राजेंद्रकुमार काळे,विजय दगडू,लातूर विभागीय सचिव विजय जोशी, सदस्य प्रकाश कांबळे, राम शेवडीकर,नुतन सरचिटणीस संजीव जोशी,विभागीय सचिव विनोद जगदाळे (मुंबई), समीर देशपांडे(कोल्हापूर),  योगेश कोरडे(नागपूर),प्रमोद माने(औरंगाबाद), अण्णासाहेब बोरगुडे (नाशिक),जगदीश राठोड (अमरावती),सोशल मिडीयाचे समन्वयक अनिल वाघमारे व सोशल मिडीयाचे निमंत्रक बापूसाहेब गोरे आदींसह नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापूरकर यांनी केले आहे. 
या अधिवेशनाची यशस्वितेसाठी संयोजन समिती अध्यक्ष आ.डी.पी.सावंत, परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव कुळकर्णी,शंतनु डोईफोडे,माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी,जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर,जिल्हा कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी,जिल्हा सरचिटणीस सुभाष लोणे, जिल्हाभरातील पदाधिकारी,पञकार व सदस्य परिश्रम घेत आहेत.

देवरीच्या म.प. महाविद्यालयात रेड रिबन क्लबची स्थापना

देवरी, दि.14 - आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि ग्रामीण रुग्णालयाच्या आयसीटीसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने एड्स रोगाविषयी जाणीवजागृतीसाठी नुकतीच रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अरुण झिंगरे हे होते. यावेळी प्रा. देवेंद्र बिसेन आणि आयसीटीसीचे प्रमोद कळमकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. झिंगरे यांनी युवकांनी एड्स सारख्या भयानक रोगाशी लढण्यासाठी युवकांनी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन करून युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. श्री. कळमकर यांनी सुद्धा या गंभीर आजारावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी स्थापन करण्यात आलेल्या क्लबमध्ये 10 विद्यार्थ्यांसह 5 विद्यार्थिनींचा सुद्धा समावेश करण्यात आला. अंशुल अमृतकर याची अध्यक्षपदी वर्णी लागली. यासाठी रासयो कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनीता रंगारी आणि सहकार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष गडवे यांनी मोलाची कामगिरी बजावली.
संचलन प्रा. रंगारी यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. गडवे यांनी मानले.

संततधार पावसामुळे घरांची पडझड,तर अर्जुनी मोरगावात रस्ते बंद


गोंदिया,दि.14ःजिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसापासून पावसाने चांगलेच पुनरागमन केले असून जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. दरदिवशी तालुक्यात पावसाच्या सरी बरसत असल्याने घरांची मोठ्याप्रमाणात पडझड सुरु झालेली आहे.सोमवारच्या रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अर्जुनी मोर तालुक्यातील केशोरी व महागाव या दोन मंडळात अतवृष्टीची नोंद करण्यात आली होती.सततच्या पावसामुळे इटखेडा ते सिरोली व बोरी ते कोरंभीटोला हा रस्ता बंद झालेला आहे.तर 100 च्या वर घऱांची पडझड जिल्ह्यात झाली आहे.त्यातच नदीकाठावरील गावांना सतकर्तेचा इशारा देण्यात आला असून पुरस्थिती उदभवू नये यासाठी पुजारीटोला धरणातून परिस्थीतीनुसार पाणी सोडले जात आहे.
मंगळवारला अर्जुनी मोर तालुक्यातील महागाव महसूल मंडळात ६८.४0 तर केशोरी महसूल मंडळात ६५.२0 मिमी सरासरी पाऊस पडला असून या दोन्ही मंडळात अतवृष्टीची नोंद करण्यात आली होती.आज बुधवारला जिल्ह्यात 65.51 मिमी पावसाची सरासरी नोंद करण्यात आली आहे. जिल्हयातील गोरेगाव,अर्जुनी मोरगाव,सडक अर्जुनी व तिरोडा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.  गोरेगाव तालुक्यात67.40 मिमी सरासरी पावसाची नोंद करण्यात आली तर अजुर्नी मोर तालुक्यात 72.96 मिमी, सालेकसा 47.27 मिमी, सडक अर्जुनी तालुक्यात 72.53 गोंदिया तालुक्यात 49.57 मिमी, तिरोडा 116 मिमी, देवरी 35.70 मिमी तर आमगाव तालुक्यात 50.35 मिमी सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथे 5,बेलाटी 2,चांदोरी खुर्द 1,नवेगाव खुर्दे 3,केसलेवाडा 6,मनोरा 1 घर तर बिर्सी, व लाखेगाव येथे गोठा पुर्णत पडला.तर विहीरगाव येथे घराची भिंत कोसळली तर प्रभू पाटील यांचा गोठा पडला.काचेवानी येथे 3,बेरडीपार 5,डब्बेटोला येथे 1 घर पडले आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव येथे 2 घरे खडकी येथे ३ घरे पडल्यामुळे नुकसान झाले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात पडलेल्या घरांची संख्या -2 व अंशतः पडलेल्या घरांची संख्या-62 एवढी झाली आहे. 

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...