Wednesday, 7 August 2019

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन


how sushma swaraj helped indians who stuck aborad | तुम्ही मंगळ ग्रहावर जरी असाल तरी मदत करु: सुषमा स्वराज


नवी दिल्ली,of.07: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे हृदय विकाराच्या धक्काने निधन झाले आहे. छातीत वेदना होत असल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ६७ वर्षांच्या होत्या. मोदी सरकार १ मध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम करताना स्वराज यांनी त्यांच्या कामानं छाप पाडली होती. 
तीन तासांपूर्वीच स्वराज यांनी ट्विट करुन काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले होते. या क्षणाची आपण आयुष्यभर वाट पाहत होते, असे स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटल होते. त्यानंतर काही वेळातच स्वराज यांची प्रकृती नाजूक असल्याचे वृत्त आले. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हर्षवर्धन त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर थोड्या वेळातच त्यांच निधन झाले.
राजकारणातला तेजस्वी अध्याय समाप्त- नरेंद्र मोदी

जनतेच्या सेवेसाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या एका उल्लेखनीय नेत्याच्या निधनाबद्दल भारत दु: खी आहे. कोट्यवधी लोकांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.सुषमा स्वराज  या जबरदस्त वक्त्या होत्या आणि उत्कृष्ट खासदार होत्या. पक्षाच्या पातळीवर त्यांचा नेहमीच आदर आणि सत्कार केला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजकारणातील तेजस्वी अध्याय समात्प झाल्याची भावना व्यक्त केली.

मोठी बहीण गेली! देश, पक्ष, आणि माझं वैयक्तिक नुकसान – नितीन गडकरी

त्यांच्या जाण्याने देशाचं, पक्षाचे आणि माझे वैयक्तिक नुकसान झाल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मी जेव्हा पक्षाचा अध्यक्ष होतो, तेव्हा मोठ्या बहिणीप्रमाणे मला नेहमी मार्गदर्शन करत होत्या. माझी तब्येत खराब झाली होती तेव्हा त्या डॉक्टरांना घेऊन माझ्या घरी आल्या होत्या. एक मोठी बहीण म्हणून त्यांनी माझ्यावर प्रेम आणि माया केली. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी देशाचा सन्मान जगभरात वाढविला. त्यांनी जो मार्ग आम्हाला दाखविला त्या मार्गाने आम्ही पुढे जाऊ. स्वराज यांचे अचानक जाणे हे संघटना, देश आणि कौटुंबिक नुकसान आहे असे त्यांनी सांगितले. 

सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी ऐकून मी स्तब्ध झालो – राहुल गांधी 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. स्वराज यांच्या निधनाची बातमी ऐकून मी स्तब्ध झालो आहे अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.सुषमा स्वराज देशातील अशा नेत्या होत्या ज्यांचा मित्रपरिवार सगळ्या पक्षात होता. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्व संबंध ठेवले होते. सुषणा स्वराज यांच्या निधनाचे मी दुःख व्यक्त करतो आणि स्वराज यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी प्रार्थना करतो, असे राहुल गांधी म्हणाले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...