Sunday, 4 August 2019

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; इनोव्हाची बोलेरोला धडकली




गोंदिया,दि.04ः-अर्जुनी-मोरगाव जवळील नवेगावबांधजवळ ताफ्यातील बोलेरो गाडीला इनोव्हा गाडीने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. ताफ्याचे नियोजन नसल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सध्या महाजनादेश यात्रा सुरू आहे. आज यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्याच्या गाड्यांचा ताफा गोंदियावरून अर्जुनी-मोरगाव या ठिकाणी जात असताना अर्जुनी-मोरगाव जवळील नवेगावबांधजवळ ताफ्यातील बोलेरो गाडीला इन्होव्हा गाडीने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. ताफ्याचे नियोजन नसल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...