Sunday, 11 August 2019

मुख्यालयी न राहणाऱ्या ग्रामसेवकांचे विविध मागण्यासांठी असहकार आंदोलन सुरु

गोंदिया,दि.10ः महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तिरोडा शाखेतर्फे क्रांतीदिनी शुक्रवार, ९ ऑगस्ट रोजी ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील 8 ही पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करुन पंचायत विकास अधिकारी पदाची निर्मिती करणे, ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करणे, ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता बदल करून पदवीधर ग्रामसेवक नेमणुका करण्यात यावी, २0११ च्या लोकसंख्येच्या आधारावर ग्रामविकास अधिकारी पदांमध्ये वाढ करावी, ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतनातील त्रुट्या दूर कराव्यात, २00५ नंतर लागलेल्या ग्रामसेवकांना जुनी पेंशन योजना लागू करणे, आदर्श ग्रामसेवकांना वाढीव वेतनवाढ करुन एक गाव एक ग्रामसेवक निर्मिती करणे, ग्रामसेवकाकडील अतिरिक्त कामे कमी करावी आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आले.आंदोलनात ग्रामसेवक संघटनेचे विभागीय अध्यक्ष कमलेश बिसेन,कार्तिक चव्हाण,दयानंद फटिंग,कविता बागडे,एल.आर.ठाकरे,सुनिल पटले,सुभाष सिरसाम,रामेश्वर जमईवार,सुषमा वाढई,सुभाष वाघमारे,आर.के.रहांगडाले, ओ.जे.बिसेन,के.एम.बागडे,पी.एस.हरिणखेडे,बी.एस.तुरकर,धर्मेद्र पारधी,योगेश रुद्रकार आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
भंडारा : ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यासाठी शासनाचे लक्ष देण्यासाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समिती समोर आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर २२ आॅगस्टपासून संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.
भंडारा पंचायत समितीसमोर शुक्रवारी ग्रामसेवकानी धरणे दिले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य संघटक विलास खोब्रागडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप फुंडे, सचिव प्रदीप लांजेवार, जयंत गडपायले, घनश्याम लांजेवार, विजय गोरडवार, श्याम बिलवणे यांच्यासह अनेक ग्रामसेवक उपस्थित होते.
तुमसर पंचायत समितीसमोर नरेंद्र सोंदाळकर, तारासिंग राठोड, अश्विन डोहळे, नशिम शेख यांच्या नेतृत्वात तर लाखांदूरमध्ये मनोज वरूडकर, अनिल शहारे, देवानंद कापगते, अनिल धमगाये यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. मोहाडी येथे आंदोलनात निरंजना खंडाळकर, सतीष गिते, मिनाक्षी फटकाळ, संध्या उद्धव भुरे. साकोली येथे तुळशीदास कोरे, प्रभाकर रामटेके, घनश्याम मडावी. पवनी येथे शैलेश खोब्रागडे, महेंद्र हेमणे, विश्वजीत उके, हरीष टेंभूर्णे आंदोलना सहभागी झाले होते. आपल्या मागण्यांचे निवेदन संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.
लाखनीः-ग्रामसेवक संघटनेच्यावतीने क्रांतीदिनाचे औचित्य साधून येथील पंचायत समितीसमोर धरणे देण्यात आले. यावेळी तालुका शाखा अध्यक्ष मंगला डहारे, अमित चुटे, माणिक शेंडे यांनी नेतृत्व केले. आंदोलनात डी.एम. बावनकुळे, अजय राऊत, प्रतीभा बोरकर, रवी टोपरे, सुधाकर गायधने, मंगला साखरकर, मुनेश्वरी चकोले, भुदेव बेंदरे, एस.पी. तरजुळे, रत्नमाला बावनकुळे आदी सहभागी झाले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...