Wednesday, 7 August 2019

नव्वद टक्के असलेल्या समाजाच्या हाती सत्ता हवी- प्रा. मोहन गोपाल


हेदराबाद,दि.07- भारतातील सामाजिक चित्र एकदम उलटे आहे. बहुसंख्य असलेल्या समाजाचे आजही  आर्थिक, समाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात खुलेआम शोषण केले जात आहे. या समाजात आजही प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, डॉक्टर्स नाहीत. त्यामुळे हा समाज दारिद्र्याच्या खाईत खितपत पडला आहे. वर्णव्यवस्थेने भारतीय समाज पोखरला गेला आहे. या बहुसंख्य समाजात ओबीसी टक्केवारी तर मोठा आहेच, पण सर्वात जास्त बौद्धिक, सामाजिक आर्थिक शोषण हे ओबीसी समाजाचे होत आहे. या वर्णविरोधी व्यवस्थे विरुद्ध लढा देण्याची गरज आहे.त्यासाठी एससी एसटी आणि ओबीसी या तिनही प्रवर्गातील लोकांनी एकसंघ लढ्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. या देशातील प्रशासकीय आणि राजकीय सत्ता जोपर्यत 10 टक्केवाल्यांकडून 90 टक्के असलेल्या समाजाकडे येत नाही, तोपर्यंत येथील मागास समाजा उद्धार होणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे माजी संचालक प्रा. मोहन गोपाल यांनी केले.
ते हैदराबाद येथील एनटीआर इनडोअर स्टेडिअम येथे आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 4 थ्या राष्ट्रीय महाअधिवेशनात बोलत होते. या महाअधिवेशनाचे उद्घाटन तेलंगानाचे शिक्षण आणि आरोग्यमंत्री ना. इटेला राजेंदर यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे हे होते. यावेळी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे, महासंघाचे राजकीय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे, अखिल भारतीय मागासवर्गिय फेडरेशनचे अध्यक्ष न्यायमूर्ती व्ही ईश्वरैया, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पिली सुभाष चंद्रबोस, तेलंगानाचे पशुधन विकास मंत्री तलासनी श्रीनिवास यादव, तेलंगानाचे उत्पादन शुल्क मंत्री व्ही. श्रीनिवास गौड, महाराष्ट्राचे पशूधनविकासमंत्री महादेव जानकार, मागासवर्गीय कल्याण मंत्री एम शंकर नारायण, माजी खासदार नाना पटोले आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून राज्यसभा सदस्य के केशव राव, बदुगुला लिंगय्या यादव, बंदा प्रकाश, करीमनगरचे खासदार बंदी संजय, निजामाबादचे खासदार धर्मापुरी अरविंद, राष्ट्रीय मागासवर्गिय आयोगाचे सदस्य थालोजू आर्चरी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाराष्ट्र शासनाचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकार म्हणाले की, ओबीसी समाज ज्यांचेकडे मदतीची आस लावून बसले आहेत त्यांची नियत चांगली नसून काही देणे तर दूरच पण आपली साधी जनगणना सुद्धा करणार नाहीत. त्यासाठी स्वतःची राजकीय शक्ती निर्माण करणे काळाची गरज आहे. यासाठी ओबीसी समाजाने आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला पाहिजे.
दरम्यान, कलावत सुंमन तलवार यांनी सुद्धा ओबीसी महाधिवेशनात हजेरी लावली होती. आम्ही सगळ्यांनी  एकत्र येण्याची  आणि शिक्षित होण्याची गरज आहे.तसेच दक्षिणे- उत्तर - पुर्व- पश्चिम असा ओबीसी समाज जोडण्याची मोहीम सुरू केली तरत आपला दिल्लीच्या कानावर जाईल असे तलवार म्हणाले.या महाधिवेशनात आंध्रप्रदेश एमएलसी फोरमचे अध्यक्ष यांनीही विचार व्यक्त केले
तेलगंणाचे मंत्री मुरा नरसय्या गौड म्हणाले की, सर्व क्षेत्रात ओबीसींना आरक्षण मिळाले तरच सर्वांगिण विकास होणे शक्य आहे. ओबीसी प्रत्येक क्षेत्रात मागासला असल्याने एक नारा, एक विचार घेऊन काम करण्याची गरज आहे. 
महासंघाचे राजकीय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे यावेळा मार्गदर्शन करताना म्हणाले की, ओबीसी महासंघ ही एक अराजकीय संघटना आहे. पक्ष कुठलाही असो, आपण सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी ओबीसी म्हनूण एकत्र यायला हवे. आज सेव मेरीटच्या नावावर आम्हा ओबीसीच्या आरक्षणाचा विरोध करून संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आमची लोकसंख्या मोठी असताना सुद्धा आमची जनगमना होत नाही.  याचे मुख्य कारण म्हणजे आमच्या जागा ज्यांनी आपल्या ताबात घेतल्या, त्यांचे पितळ उघडे पडू नये, हे आहे.  यासाठी काम सुरू असून राष्ट्रीय ओबीसी महासंघ काम करीत आहे
तेलगंणात ५४ टक्के ओबीसी आहे केंद्रसरकार ओबीसीचे वर्गीकरण करण्यासाठी काम करीत असून त्यासाठी रोहिनी आयोग नेमल्याचेही त्यांनी सांगितले.
या महाधिवेशनाला देशातील महाराष्ट्र,दिल्ली,केरळ,तेलंगणा,आंध्रप्रदेश,पुडुच्चेरी येथील ओबीसी पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...