Saturday 3 August 2019

उन्नाव प्रकरणाच्या निषेधार्थ जिल्हा महिला काँग्रेसचे निवेदन

गोंदिया,दि.03 -ः गोंदिया जिल्हा महिला कॉग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे भारतीय जनता पक्षाचे आमदार कुलदीपसिह सेंगर व त्याच्या सहकार्याने अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी कठोर कारवाईच्या मागणीचे निवेदन देत घटनेचा निषेध नोंदविणारे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्र्यांना पाठविण्यात आले.
भाजप सरकार उत्तरप्रदेशात सर्वसामान्य बहुनज समाजातील महिलांवर सातत्याने अन्याय करीत असून याप्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याभूमिकेचा निषेध नोंदविला. निवेदन देतेवेळी जिल्हा महिला कॉग्रेस अध्यक्षा उषा शहारे,प्रदेश उपाध्यक्षा उषाताई मेंढे, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमाताई मडावी,प्रदेश महासचिव शीलाताई पटले गोंदिया तालुका अध्यक्षा सरिताताई अंबुले,गोंदिया शहर अध्यक्षा चेतना पराते,जिल्हा सचिव रोहिणी रहांगडाले,आमगाव शहर अध्यक्षा प्रभादेवी उपराडे,शहर अध्यक्षा अर्जुनी/मोरगाव प्रद्याताई गणवीर नगरसेविका वंदना जाभुळकर,वंदना शाहरे,उर्मिला जुगनाके,अर्जुनी/मोरगाव शहर उपाध्यक्ष शीला उईके,जिल्हा प्रतिनिधी योजना कोतवाल, सौ.उके ,सौ.मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...