भंडारा,दि.17 : अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.राघव सतीश मेंढे (२) असे मृत बालकाचे नाव आहे. राघव शुक्रवारी घरापुढील अंगणात खेळत होता. खेळण्यात मग्न असताना अचानक एका विषारी सापाने दंश केला. मात्र कुणाला कळले नाही. काही वेळाने तो अस्वस्थ झाल्याचे पालकांच्या लक्षात आले. बघितले तर त्याच्या उजव्या पायाला कशाचा तरी दंश झाल्याचे लक्षात आले. त्याला तात्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालय उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आई-वडिलांचा एकुलता मुलगा मृत्युमुखी पडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment