Sunday, 4 August 2019

बडोलेंच्या गावात मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे

गोंदिया,दि.04 : माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या सडक-अर्जुनी गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना हा प्रकार घडला. मुख्यमंत्री गोंदियावरून आज(ता. ४) अर्जुनी मोरगाव येथे महाजनादेश यात्रेला मार्गदर्शन करण्याकरिता जात होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान जिल्ह्यात गोरेगाव येथील सभेच्या ठिकाणी कुठलीही परवानगीनसताना ड्रोन कॅमेरा उडविण्यात आला. या प्रकरणात अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन किती गंभीर आहे, ते या प्रकरणातून दिसून येत आहे. गोंदियाजिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा असून जिल्ह्याच्या सीमेला लागून छत्तीसगड राज्य आहे. त्या ठिकाणी काल (शनिवारी) सुरक्षा बल व नक्षलवाद्यांध्ये चकमक झाली. त्यामध्ये 7 नक्षलवाद्यांनासुरक्षा बलाने कंठस्थान घातले. म्हणून या यात्रेदरम्यान ही मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पोलीस प्रशासनाच्या सतर्केतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...