Sunday, 11 August 2019

हजारोच्या संख्येत निघाली ओबीसी,एससी,एसटी,अल्पसंख्याकांची जनआक्रोश रॅली

गोंदिया,दि.१०-जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी समाजासह एससी,एसटी,भटक्या विमुक्त जाती,जमाती अल्पसंख्याक बहुजन समाजाच्या विविध मुद्यांना घेऊन तसेच ईव्हीएम हटाव आरक्षण बचाव मोहिमेंतर्गंत सqवधान मैत्री संघ,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवासंघ,आदिवासी एम्पलाईज संघटनेसह ७२ संघटनांच्या माध्यमातून आज शनिवार १० ऑगस्ट रोजी ५ ते ६ हजारांच्या संख्येत जनआक्रोश रॅली गोंदिया शहरात निघाली.
श्रीटॉकीज चौकापासून सुरु झालेली ही जनआक्रोश रॅली गोरेलाल चौक,गांधी प्रतिमा मार्ग जयस्तंभ चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे कार्यक्रमस्थळी इंदिरा गांधी स्टेडीयम जवळ पोचली.विशेष म्हणजे या जनआक्रोश रॅलीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून महिलापुरुष मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.तर आदिवासी समाजाने ९ ऑगस्टरोजी दरवर्षी साजरा होणारा मुलनिवासी दिवस कार्यक्रम जनआक्रोश कार्यक्रमात सहभागी होऊन साजरा केला.
या जनआक्रोश आंदोलनांतर्गत लोकशाही वाचवा,सqवधान वाचवा यासोबतच ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा मोहीम,ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावे,ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे,ओबीसींचे नोकरीतील बँकलाग भरण्यात यावे,ओबीसी विद्याथ्र्यांना वसतीगृहासह सर्व सुविधा देण्यात यावे,१९९६ चा पेसा कायदा,२००६ चा वनाधिकार कायदा,१९९९ चा एससीएसटी अत्याचार कायदे कार्यान्वित करण्यात यावे.डॉ.पायल तडवी प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावे या मागणसंह शिक्षणाचे बाजारीकरण,ईव्हीएम,रेल्वे,बँका,बीएसएनल,ओनजीजीसी सह उच्च पदावरील नौकरीतील खासगीकरण,मॉबलिqचग सारख्या घटनांचा निषेध नोंदविणारे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी सभास्थळी येऊन स्विकारले.
या जन आक्रोश आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी सेल्प रिसपेक्ट मुव्हमेंटचे बलीराज धोटे,प्रा.रमेश राठोड,डॉ.नामदेव किरसान,एड.सविता बेदरकर,एड.नरेश शेंडे,विक्की बेलखोडे,डॉ.प्रशांत मेश्राम,मो.जुबेर खान,एड रामदयाल हिरकमे,करण टेकाम,मिqलद गणवीर,जितेश राणे,ज्ञानेश्वर उके,एल.टी.पंधरे,अनिल मेश्राम,प्रा.बी.एम.करमकर,खेमेंद्र कटरे, शिशिर कटरे,कैलास भेलावे,प्रेम साठवणे,प्रा.डी.एस.मेश्राम,सावन कटरे,राजीव ठकरेले,क्रांती ब्राम्हणकर,सतिश बनसोड,हौसलाल रहागंडाले,अतुल गजभिये,प्रमिला सिंद्रामे,विनोद नंदुरकर,संगीता पुसाम,संतोष वैद्य,योगेश रामटेके,सुनिल भोगांडे,रवि भांडारकर,सुनिता भालाधरे,डी.एल.तुमडाम,विजय कोठेवार, आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

यावेळी बोलतांना सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे बलीराज धोटे यांनी गोंदियात निघालेला हा जनआक्रोश वेगवेगळ्या क्षेत्रात होत असलेल्या अन्यायाविरुध्द असून देशातील कानाकोपèयात आक्रोश रॅलीच्या माध्यमातून आम्हीही qजवत आहोत हे दाखवून दिले जात आहे.आमच्या बारा बलुतेदार असलेल्या ओबीसी बहुजन समाजाचा व्यवसाय आधी हिरावून घ्यायचे नंतर त्याच व्यवसायाचे कौशल्य विकासाच्या नावावर आमच्या मुलांना प्रशिक्षण द्यायचे धोरण राबविणारे सरकार हे टाटा,अदानी अंबानीसारख्या उद्योगपतीसांठी काम करणारे आहे.शेतकरी आज नडला जात आहे परंतु त्याचा धानाला भाव नाही,मेरीटच्या नावावर आमच्या ओबीसी समाजातील शिक्षित पण अज्ञानी लोकांत गैरसमज निर्माण करुन भांडण लावण्याचे काम उच्चवर्णीय करीत असल्याची टिका केली.
तर आदिवासी समाजाचे नेते एड.नामदेव किरसान यांनी सेव मेरीट सेव नेशनचा qढढोरा पिटणाèयांनी न्यायालयात १०-१५ वर्ष प्रकरणे का प्रलqबत असतात ते सांगावे,तिथे कोण न्यायाधीश वकील आहे हे सुध्दा जनतेला सांगावे असे आवाहन करीत संविधानाने आरक्षण म्हणजे दिलेले घटनात्मक प्रतिनिधीत्व आहे,ते कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही असे विचार व्यक्त केले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा जि.प.अध्यक्षा सीमा मडावी यांनी आपण आज याठिकाणी बाबासाहेबांनी लिहिलेल्या सqवधानामुळे उभ्या आहोत.तर ज्या पदावर आपल्याला बसण्याची संधी मिळाली ती सुध्दा सqवधानाने दिलेल्या प्रतिनिधीत्वामुळे त्यामुळे आज आम्ही समाजात मानाने जगू शकतो अन्यथा उच्चवर्मीय समाजाने तर आम्हा महिलांनाही घराच्याबाहेर पडू नये अशी व्यवस्था राबविली होती अशी परखड टिका व्यक्त केली.यावेळी एड.सविता बेदरकर,जितेश राणे,पुरुषोत्तम मोदी,राजीव ठकरेलेसह आदीनीही विचार व्यक्त केले.
आयोजनासाठी सqवधान मैत्री संघाचे सयोंजक अतुल सतदेवे,महेंद्र कठाणेसह आदी सामाजिक कार्यकत्र्यांनी पुढाकार घेतला होता.रॅली शहरात भ्रमण करुन आल्यानंतर सभेत रुपांतरीत झाली.सभेचे प्रास्तविक पौर्णिमाताई नागदेवे यांनी केले.तर सभेचे संचालन सुनिल पटले व शिव नागपूरे यांनी केले.या जनाक्रोश आंदोलनात जिल्ह्यातील सqवधान मैत्री संघ,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,बहुजन युवा मंच,मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेडसह,आदिवासी एम्पालईज फेडरेशन,मुलनिवासी संघासह ७२ विविध संघटना सहभागी झालेल्या होत्या.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...