Tuesday, 13 August 2019

लेंडीजोब येथील १७ वर्षीय युवती बेपत्ता

चिचगड,दि.१३ः- देवरी तालुक्यातील लेंडीजोब(बोरगाव बाजार)येथील रहिवासी असलेली १७ वर्षीय युवती पायल सुखदास खरोले ही ५ ऑगस्टपासून बेपत्ता झाली असून चिचगड पोलीसांनी कुणाला माहिती मिळाल्यास पोस्टेला कळविण्याचे आवाहन केले आहे.फिर्यादी सुखदास खरोले यांच्या तक्रारीनुसार पायलला कुत्र्याने चावा घेतल्याने ती ग्रामीण रुग्णालय देवरी येथे उपचारासाठी घरुन निघाली,मात्र ती परत आली नाही,त्यामुळे तिला कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याच्या शंकेवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सावळा रंग असलेली निळ्या रंगाचा सलवार अंगावर असून १६० सेमी उंची असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...