देवरी,दि.02- तालुक्यातील वांढारा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या सभेत देवरी तालुकाध्यक्षपदी छोटेलाल कान्हाजी बिसेन यांनी सार्वमताने निवड करण्यात आली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे वरिष्ठ नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश ताराम हे होते. यावेळी, देवरी पंचायत समितीच्या सदस्य अर्चना ताराम, देवरीच्या माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन, गोपाल तिवारी, भैयालाल चांदेवार, माधुरी देशमुख, कौशल्या देशमुख,श्रावण बिंझलेकर, मनीष मोटघरे, मनोहर राउत बबलू भाटीया, रामजी हिरवानी, अमरदास वैष्ण, अमरदास सोनबोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पक्षाच्या वतीने स्थानिक श्रीराम मंदिरात पूजा अर्चना करण्यात आली.
सभेत पक्ष संघटन बळकटीकरण, दुष्काळी परिस्थिती आणि पक्षाध्यक्ष निवडीच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती तालुकाध्यक्ष पदासाठी छोटेलाल कान्हाजी बिसेन यांची सार्वमताने निवड करण्यात आली.
श्री बिसेन यांनी आपल्या निवडीचे श्रेय खासदार प्रफुल्ल पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, माजी जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीचे सभापती रमेश ताराम आदींना दिले.
प्रास्ताविक गोपाल तिवारी यांनी केले. संचलन तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष योगेश देशमुख यांनी केले. उपस्थितांचे आभार दिलीप कुंभरे यांनी मानले.यावेळी सत्यवान देशमुख पोशिक शहारे, राजेंद्र वालदे,चंद्रकांत देशमुख, गजेंद्र देशमुख, नंदलाल लटये, अमर शेख, राजेश बिंझलेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment