गोंदिया,दि.04 : आगामी विधानसभा निवडणुका जिंकू शकत नाही याची खात्री आल्याने विरोधकांनी आपल्या महापराभवाची खरी कारणे सांगण्यापेक्षा ईव्हीएम वर खापर फोडण्याचे ‘कव्हर फायरिंगङ्क तयार करुन ठेवले असल्याची टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ४ ऑगस्ट रोजी हॉटेल गेटवे येथे आयोजित पत्रपरिषदेत केली.
यावेळी प्रामुख्याने पालकमंत्री डॉ. परिणय फुके, प्रदेश सरचिटणीस आ. सुजीतसिंह ठाकूर, खा. सुनिल मेंढे,आ. राजकुमार बडोले, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी खा. खुशाल बोपचे, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. रमेश कुथे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे, जिल्हा महामंत्री संघटन विरेंद्र अंजनकर उपस्थित होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, गेल्या तीन दिवसात महाजनादेश यात्रेने विदर्भातील पाच जिल्ह्यात, २५ विधानसभा मतदारसंघातून ४९१ किलोमीटर प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने ‘प्रो इन्कम्बन्सीङ्क फॅक्टर वर लोकसभा निवडणुका जिंकल्या. त्याचीच पुनरावृत्ती होण्याचे वातावरण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात ‘अँटी इनकंबन्सीङ्क नाही, असेच स्पष्ट चित्र आहे. पुन्हा महायुतीचे सरकार आणायचे अशी जनतेची मानसिकता तयार झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साथ देणारे सरकार महाराष्ट्रात पुन्हा आणायचे अशी लोकांची इच्छा आहे. या परिस्थितीत भांबावलेल्या विरोधी पक्षाला जनतेचे कुठले प्रश्न मांडावे याचे भान उरलेले नाही. विरोधी पक्षांच्या आंदोलनांना जनतेची साथ मिळत नाही. याउलट जनआंदोलनांना सामोरे जाण्याची आणि विविध समाज घटकांचे प्रश्न सोडवण्याची आमच्या सरकारची तयारी आहे, हे जनतेने अनुभवले आहे. या आधारावर राज्यात राज्य सरकार विषयी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. महापराभवाच्या दिशेने सामोरे जाणाèया विरोधी पक्षांनी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडायचे हे ठरवून टाकले आहे. ईव्हीएम च्या विरोधात एकजूट होऊन त्यासाठी काढण्यात येणारा मोर्चा हे विरोधकांचे ‘कव्हर फायरिंगङ्क आहे. विरोधी पक्षांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. कोणीच उमेदवारी मागण्यासाठी समोर येत नाही. अतिशय केविलवाण्या अवस्थेत, आम्ही पक्षातच राहू अशी कार्यकत्र्यांना शपथ देण्याची वेळ विरोधकांवर आलेली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
धान उत्पादक शेतकèयांना पाच वर्ष सातत्याने धानावर बोनस देण्याचे काम या सरकारने केले. खरेदी प्रक्रिया सुलभ करून गेल्यावर्षी धानाला पाचशे रुपये बोनस देण्यात आला. तसाच बोनस याहीवर्षी देण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. काँग्रेस आघाडी सरकारच्या तुलनेत बहुतांश कामे दुप्पट प्रमाणात आणि अनेक कामे तिप्पट प्रमाणात झाल्याचे सांगितले.खुल्या प्रवर्गातील गरीबांसाठी 10 टक्के आरक्षण दिले असून 650 अभ्यासक्रमात शैक्षणिक शुल्क अनुदान दिल्याचे म्हणाले.येत्या 2021 मध्ये ओबीसींची जनगणना होणार असल्याचे ओबीसीं लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाच्या मुद्यावर म्हणाले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कंत्राटी स्वरुपातील असल्याने तेथील कर्मचार्यांना स्थायी करण्याचा प्रश्नच नाही तर ज्या शिक्षण संस्थाचालकांनी शासनाकडून आम्हाला अनुदान नको असे म्हणत शाळा सुरु केल्या त्या शाळेतील शिक्षकांना आमच्या सरकारने 40 टक्के वेतन देण्याचे धोरण सुरु केले आहे.कुठलाही कंत्राटी कर्मचारी स्थायी होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच गोंदियाच्या विमानतळ विकासाबाबत मात्र ते काही बोलले नाही तर काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाबद्दल बोलतांना ज्यांची जेव्हा गरज भासेल तेव्हा त्यांना पक्षात नक्कीच स्थान मिळेल असे संकेत देत त्यांच्या भाजप प्रवेशावर एकप्रकारे शिक्कामोर्तंब केले.
No comments:
Post a Comment