Monday 12 August 2019

अपघात भरपाईच्या व्याजावरील प्राप्तिकर बेकायदा- उच्च न्यायालय

High Court : Income-tax liability on accident compensation is illegal | हायकोर्टाचा निकाल : अपघात भरपाईच्या व्याजावरील प्राप्तिकर बेकायदा
मुंबई, दि.12 - मोटार अपघातात मृत वा जखमींना  न्यायालयाकडून मंजूर केल्या जाणा-या भरपाई रकमेच्या व्याजावर प्राप्तिकर आकारणी करणे बेकायदा असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. यामुळे अपघातग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार असून, अपघाताने आधीच आयुष्ये उद्ध्वस्त झालेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा संतापजनक प्रकार बंद होणार आहे.

मुंबईत नेपियन सी रोडवर राहणाऱ्या रूपेश रश्मीकांत शहा यांच्या याचिकेवर न्या. अकिल कुरेशी व न्या. एस. जे. काथावाला यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. प्राप्तिकर कायद्याच्या विविध तरतुदी आणि देशभरातील न्यायालयांनी दिलेल्या निकालांचे सखोल विश्लेषण करून, खंडपीठाने असा निर्वाळा दिला की, अपघातग्रस्ताने भरपाई दावा दाखल केल्यापासून, त्यावर निकाल होईपर्यंतच्या काळासाठी भरपाई रकमेवर जे व्याज दिले जाते. ते प्राप्तिकरापासून पूर्णपणे मुक्त मानले जायला हवे. म्हणजेच भरपाईची मूळ रक्कम जशी करमुक्त असते, तसेच त्यावरील व्याजही करमुक्त असते.




1 comment:

  1. Thanks for sharing, visit my site at http://bit.ly/2yrc9pw

    ReplyDelete

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...