Monday 31 October 2016

‘जलयुक्त’मधून एक लाख ४५ हजार टीसीएम पाणीसाठा

पुणे दि. 31: पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविले आहे. अभियानातून राज्यभरात तब्बल एक लाख ४५ हजार टीसीएम एवढा पाणीसाठा झाला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी असलेली टंचाई कमी होऊन हजारो हेक्टरला फायदा होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.
 
पिकांच्या वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड, यामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा मोठा परिणाम शेतीवर झाला होता. त्याचप्रमाणे राज्यातील बहुतांशी ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासली. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाने योग्य पाऊले उचलत जलसंधारणाची कामे हाती घेतली. गेल्या दोन वर्षांत १८ हजार ५६८ गावांमध्ये सिंमेट साखळी बंधारे, जुन्या अस्तित्वातील सिंमेट नालाबांध, केटी वेअर दुरुस्ती व नूतनीकरण, जलस्राेतांतील गाळ काढणे, जलस्राेत बळकटीकरण करणे, विहीर पुनर्भरण, अशी विविध कामे हाती घेण्यात आली होती. यंदा चांगल्या झालेल्या पावसामुळे या कामांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. 
 
गेल्या वर्षी ९ हजार ७५३ गावांमध्ये शासकीय व लोकसहभागातून १५ हजार ७९८ गावात कामे केली. त्यातून सुमारे एक लाख सात हजार घनमीटर गाळ काढला होता. त्यासाठी तब्बल ६५९ कोटी रुपये खर्च झाला अाहे. त्यात सुमारे एक लाख ७ हजार टीसीएम एवढा पाणीसाठा झाला. यंदा ८ हजार ८१५ गावांत चार हजार २४२ कामे केली आहेत. त्यातून ३७ हजार ९५० घनमीटर एवढा गाळ काढला असून, त्यावर १७२ कोटी ७१ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. 

विनाअनुदानित सिलिंडर 38.50 रुपयांनी महागला

नवी दिल्ली, दि. 31 - विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर वापरणा-या ग्राहकांच्या खिशाला आता भुर्दंड बसणार आहे.
 विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 38 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणात ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. 

मलायकाचे ‘सेक्सी’ फोटो शेअरिंग सुरूच

‘छैया छैया’ गर्ल मलायका अरोरा खान तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. इन्स्टाग्रामवर सक्रीय राहणारी मलायका तिचे हॉट फोटोज् फॉलोवर्सशी शेअर करत असते. मुलांची आई म्हणून तरी तिने असे फोटो शेअर करू नये, अशी टीका करणाऱ्या लोकांच्या टोमण्यांचा तिला काही फरक पडत नाही असे ती सांगते.
‘लोक काय म्हणताहेत, ते काय विचार करतात यावर माझे नियंत्रण नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. माझे आयुष्य आहे, मी माझ्या मतांप्रमाणे जगणार. त्यासाठी दुसऱ्यांच्या परवानगीची मला गरज नाही.’ नुकताच तिने एका अति सेन्शुअस फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता, जो तिच्या चाहत्यांनासुद्धा जरा जास्तच बोल्ड वाटला होता.
तसे त्यांनी कमेंट करून बोलूनसुद्धा दाखवले. मात्र, ‘व्हू केअर्स’ या अविर्भावात तिने असे हॉट फोटो शेअर करणे सुरुच ठेवले. बॅले नृत्यप्रकारच्या एका पोझमध्ये तिने काढलेला फोटो नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय बनला होता. त्यासोबत तिने कॅप्शन दिले होते की, ‘ही सध्या माझ्या मनाची स्थिती आहे. लोकांचा विचार सोडा, तुमच्या मनाचे करा.’

शहीद नितीन कोळी अनंतात विलीन

सांगली,दि.31- कुपवाडा येथे पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले होते. त्यात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील दुधगावचे नितीन कोळी यांचा समावेश होता. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर मूळगावी दुधगावमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भाऊ उल्हास आणि मुलगा देवराज यांनी शहीदाच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
यावेळी पंचक्रोशीतील लोक शहीदाला श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित होते. 'नितीन कोळी अमर रहे' आणि 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. दुधगावमधून वाहणाऱ्या वारणा नदीच्या काठावर शहीद कोळी यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यसंस्कारासाठी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी उपस्थित होते.

चंद्रपूरमध्ये सुपर मार्केटला भीषण आग

चंद्रपूर,दि.31 : चंद्रपूर शहरातील समाधान पूर्ती सुपर मार्केटला काल रात्री मोठी आग लागली. या भीषण आगीत कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाले आहे.
चंद्रपूर शहरातील महत्त्वाच्या जटपुरा चौकात पोपट बिल्डिंगमध्ये हे सुपर मार्केट आहे. काल रात्री 1 वाजताच्या सुमारास सुपर मार्केटच्या गोदामात अचानक आग लागली. काही वेळातच ही आग संपूर्ण बिल्डिंगमध्ये पसरली. सुदैवाने या आगीत कुणाल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही मात्र सुपर मार्केटमध्ये असलेला कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.
सध्या या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु असून अग्निशमन विभागाच्या 6 गाड्या या कामात तैनात करण्यात आल्या आहेत.

तुरुंगातून पळालेले सिमीचे आठ दहशतवादी चकमकीत ठार

वृत्तसंस्था भोपाळ, दि. ३१ - सुरक्षा रक्षकाची हत्या करुन भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पळालेले सिमीचे आठ दहशतवादी मध्यप्रदेश पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाले आहेत. भोपाळ कारागृहापासून १० किमी अंतरावर अचारपुरा गावाजवळ ही चकमक झाली.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षकाची हत्या करुन हे दहशतवादी तुरुंगातून फरार झाले होते. मध्यवर्ती कारागृहाच्या बी ब्लॉकमध्ये या आठही दहशतवाद्यांना ठेवण्यात आले होते. या प्रकरणी तुरुंग अधीक्षकासह पाच जणांना निलंबित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्रालयाने या पलायनासंबंधी मध्यप्रदेश सरकारकडून अहवाल मागवला आहे.
त्यांनी स्टीलच्या प्लेटने सुरक्षा रक्षकाची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर चादरींच्या सहाय्याने भिंत चढून त्यांनी पलायन केले. मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास ही घटना घडली अशी माहिती भोपाळचे डीआयजी रमन सिंह यांनी दिली. पळालेल्या आठ दहशतवाद्यांमध्ये जाकीर मेहबूब शेख आणि अमजद यांचा समावेश असून, ते २०१३ मध्येही कारागृहातून पळाले होते.
सिमीचे दहशतवादी मध्यप्रदेशातील कारागृहातून पळून जाण्याची ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये सिमीचे सात दहशतवादी खांडवा तुरुंगातून पळाले होते. स्नानगृहाच्या खिडकीला असलेल्या सळया तोडून या दहशतवाद्यांनी पलायन केले होते. मोठा सुरक्षा बंदोबस्त असलेल्या मध्यवर्ती कारागृहातून या दहशतवाद्यांनी अशा प्रकारे पलायन केल्याने सुरक्षा व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

Sunday 30 October 2016

मध्य इटलीला भूकंपाचा जोरदार धक्का

रोम - मध्य इटलीला आज (रविवार) सकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या असून, अद्याप जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी बसलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.6 इतकी मोजण्यात आली आहे. रोममधील काही इमारतींना गेल्या आठवड्यातच बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे तडे गेले होते. आता पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसल्याने इमारती कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सुरवातीला 7.1 तीव्रतेचा आणि नंतर 6.6 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. 

ऑगस्टमध्ये मध्य इटलीला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात 300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा याच भागाला भूकंपाचा धक्का बसला आहे.

जवानांसोबत मोदींनी साजरी केली दिवाळी

किन्नौर (हिमाचल प्रदेश),  दि. 30 - " दिवाळी आपल्या लोकांसोबत साजरी करावी असे वाटते, म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलो आहे," असे उद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस, लष्कर आणि डोग्रा स्काऊटच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली.  यावेळी पंतप्रधान आणि जवानांनी एकमेकांना मिठाई भरवली. तसेच तासाभराच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी जवानांशी संवाद साधत त्यांच्या शौर्याचे कौतुक केले.  
पंतप्रधान  मोदींच्या प्रत्येक वर्षीच्या दिवाळी कार्यक्रमाप्रमाणेच यावर्षीही दिवाळीच्या कार्यक्रमाबाबत गोपनीयता बाळगण्यात आली. दरम्यान, आज हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील सुमडो येथे पंतप्रधान जवानांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी आले. येथे येण्यापूर्वी, मोदींनी वाटेतील स्थानिकांचीही भेट घेतली. 

बिबट्या पडला विहिरीत, मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

मुक्ताईनगर, दि. 30 - तालुक्यातील रामगड गावालगत असलेल्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना आज पहाटे घडली. या बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली आहे.  
रामगड गावालगत दत्तू उखा चौधरी यांचे शेत आहे. आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास बिबट्या या शेतातील  विहिरीत पडला. पांडुरंग उखा पाटील यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. दरम्यान,  वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून असून, बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी जळगाव येथूनही पथक येत असल्याचे सांगण्यात आले.   बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

Saturday 29 October 2016

नक्षल्यांचा ३ नोव्हेंबरला पाच राज्यांमध्ये बंद

गडचिरोली, : पाच दिवसांपूर्वी आंध्रप्रदेश-ओरिसा सीमेवर पोलिसांनी ३० नक्षल्यांना कंठस्नान घातल्याच्या निषेधार्थ माओवाद्यांनी ३ नोव्हेंबरला पाच राज्यांमध्ये बंद पुकारला आहे.
२४ ऑक्टोबरला ओरिसातील मलकानगिरी जिल्ह्यातील चित्रकोंडा येथे ग्रेहाऊंड कमांडोंशी झालेल्या चकमकीत २८ नक्षलवादी ठार झाले. त्यानंतर २७ ऑक्टोबरला पानस्पूत जंगलात आणखी दोन नक्षल्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. या घटनांच्या निषेधार्थ
माओवाद्यांच्या केंद्रिय समितीने ओरिसा, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये बंदचे आवाहन केले आहे. माओवाद्यांच्या पूर्व विभागाचा सचिव कैलास याने एक ऑडिओ टेप जारी करुन ३० नक्षल्यांच्या हत्येला ओरिसा व आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीका केली आहे, असे वृत्त ओडिशा सनटाईम्स या प्रादेशिक इंग्रजी ई-दैनिकाने दिले आहे.

भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मालिकाही खिशात!

वृत्तसंस्था
विशाखापट्टणम,दि.29 : विशाखापट्टणमच्या फिरकीच्या आखाड्यामध्ये न्यूझीलंडचे फलंदाज आज (शनिवार) भारतीय गोलंदाजांसमोर टिकूही शकले नाहीत आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने 190 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयासह पाच सामन्यांची मालिकाही भारताने 3-2 अशी जिंकली. अमित मिश्राने केवळ सहा षटकांमध्येच पाच गडी बाद केले.

रोहित शर्माला गवसलेला सूर आणि विराट कोहली, महेंद्रसिंह धोनीच्या उपयुक्त योगदानांमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक पाचव्या सामन्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सहा गडी गमावून 269 धावांपर्यंत मजल मारली. हे आव्हान न्यूझीलंडला पेलवलेच नाही. पहिल्याच षटकात उमेश यादवने अप्रतिम चेंडूवर मार्टिन गुप्टिलचा त्रिफळा उडविला. त्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर फक्त हजेरीच लावली.

वास्तविक, ही खेळपट्टी फलंदाजी फार अवघड नव्हती. याच खेळपट्टीवर रोहित शर्मा आणि कोहलीने अर्धशतके झळकाविली होती. उमेश यादव आणि जसप्रित बुमराह या वेगवान गोलंदाजांचा ‘स्पेल‘ न्यूझीलंडने कसाबसा खेळून काढला. त्यानंतर धोनीने दोन्ही बाजूंनी फिरकी गोलंदाजांद्वारे आक्रमण सुरू केले. अक्षर पटेलने धोकादायक केन विल्यम्सनला बाद केल्यानंतर न्यूझीलंडचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. अमित मिश्रा, पटेल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ऑफस्पिनर जयंत यादव या तिघांनी मिळून आठ गडी बाद केले. विशेष म्हणजे, अमित मिश्राने सहा षटकांत 18 धावा देत पाच गडी बाद केले. न्यूझीलंडचा हा डाव केवळ 23 षटकेच चालला.

कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी स्वीकारली. अजिंक्‍य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी दमदार सुरवात केली. पण अजिंक्‍य रहाणे पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. केवळ 20 धावा करून तो बाद झाला. या मालिकेमध्ये रहाणेची फलंदाजी बहरलीच नाही. रहाणे लवकर बाद झाल्यामुळे रोहित शर्मावरही दडपण आले होते. पण कोहलीच्या साथीत त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजविण्यास सुरवात केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली.

या मालिकेत प्रथमच रोहित शर्माला सूर गवसला. त्याने 65 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह 70 धावा केल्या. 22 व्या षटकात रोहित बाद झाला, तेव्हा भारताच्या 119 धावा झाल्या होत्या. त्यानंतर कोहली-धोनीच्या जोडीने पुन्हा एकदा महत्त्वाची भागीदारी केली. 59 चेंडूंत 41 धावा करून धोनी बाद झाला. त्यानंतर धावगती उंचावण्याच्या प्रयत्नांत कोहलीही बाद झाला. डावाच्या अखेरच्या षटकांमध्ये केदार जाधव (37 चेंडूंत नाबाद 39) आणि अक्षर पटेल (18 चेंडूंत 24) यांच्या फटकेबाजीमुळे भारताने अडीचशे धावांचा टप्पा पार केला.

धावफलक:
भारत : 50 षटकांत 6 बाद 269 

अजिंक्‍य रहाणे 20, रोहित शर्मा 70, विराट कोहली 65, महेंद्रसिंह धोनी 41, मनीष पांडे 0, केदार जाधव नाबाद 39, अक्षर पटेल 24, जयंत यादव 1
अवांतर : 9
न्यूझीलंड : 23.1 षटकांत सर्वबाद 79 
टॉम लॅथम 19, केन विल्यम्सन 27, रॉस टेलर 19
गोलंदाजी : अमित मिश्रा 5-18, अक्षर पटेल 2-9, जयंत यादव 1-8, उमेश यादव 1-28, जसप्रित बुमराह 1-16 

फटाक्यांचे 200 स्टॉल्स जळून खाक

औरंगाबाद, दि. 29 - जिल्हा परिषदेच्या मैदानात फटाक्यांच्या स्टॉल्सना भीषण आग लागली होती. या मैदानात असणारे जवळपास 200 फटाक्यांचे स्टॉल्स आगीत जळून खाक झाले आहेत. एकमेकांना लागून फटाक्यांचे स्टॉल्स असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली. आगीमध्ये 20 ते 25 दुचाकी आणि अनेक चारचाकी वाहनेदेखील जळून भस्मसात झाली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीमुळे कोट्यवधीचं नुकसान झालं आहे. सध्या आग आटोक्यात आली आहे.

गोंदिया-भंडारा मतदारसंघातील मतदारांचे भाव वधारले

नागपूरातील 200वर बाऊंसर्स मतदारसंघात दाखल
भाजपचे परिणय फुके आज नामांकन दाखल करणार
खेमेंद्र कटरे

गोंदिया- नुकत्याच होऊ घातलेल्या गोंदिया-भंडारा विधान परिषदेच्या निवडणुकीत एका बड्या राष्ट्रीय पक्षाच्यावतीने मतदारांना देऊ केलेल्या रकमेत भरघोष वाढ करीत मोबदला म्हणून 50 लाख रोख वा कायम नोकरी, अशी ऑफर दिली आहे. याशिवाय निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या या प्रमुख पक्षाच्या उमेदवाराने मतदारांना प्रभावीत करण्यासाठी नागपूरहून सुमारे 200 खास बाउंसर्सची टोळी या मतदारसंघात पाठविल्याच्या चर्चेने भंडारा-गोंदिया जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली आहे. दरम्यान, भाजपच्या वतीने नागपूरातील परिणय़ फुके हे आपला नामांकन आज दाखल करणार असल्याचे वृत्त आहे.उल्लेखनीय म्हणजे साप्ताहित बेरारटाईम्सने यापूर्वी भाजप या निवडणुकीत ओबीसी कॉर्ड खेळणार असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.
येत्या 19 नोव्हेंबर रोजी राज्यात विधान परिषदेच्या रिकाम्या झालेल्या जागांसाठी निवडणुक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीतील उमेदवारांचे नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी उमेदवारी अर्जाची उचल केली आहे. आज भाजपच्या वतीने नागपूरचे नगरसेवर परिणय फुके हे नामांकन दाखल करणार असल्याचे वृत्त आहे.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण या निवडणुकीमुळे चांगलेच तापलेले असताना या मतदारसंघातील मतदारांचे भाव एका प्रमुख पक्षाने चांगलेच वाढविल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. यानुसार, आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदारांनी मतदान करावे यासाठी नगरसेवक, सभापती व जिल्हा परिषद सदस्य यांना प्रत्येकी 50-50 लाख वा कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले जात आहे. हा निवडणुकीचा फंडा राबविण्यासाठी व मतदारांना प्रभावित करण्यासाठी नागपूरवरून सुमारे 200 खास बाऊंसर्सची टोळी दोन्ही जिल्ह्यात पाठविण्यात आली आहे. हे बाऊंसर्स पिशवीमध्ये रक्कम घेऊन चक्क मतदारांना गाठत असून त्यांना प्रभावाने अज्ञात स्थळी रवाना करीत असल्याची चर्चा मतदारसंघातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. परिणामी, मतदारांचे अच्छे दिन आल्याचे  बोलले जात आहे.
मतदारांची खरेदी करणाऱ्या पक्षाच्या वतीने कॉंग्रेसच्या मतदारांना टार्गेट केल्याचे बोलले जात आहे. गोंदियातून कॉंग्रेसच्या वतीने डमी उमेदवार पक्षाच्या वतीने उभा केला जाणार असल्याच्याही चर्चा आहेत. पक्षनिष्ठा दाखविण्यासाठी गोंदिया जिल्ह्याबाहेरील कॉंग्रेसची मते त्या पक्षाला विकली जाणार असल्याचे नियोजन दोन्ही पक्षाचे नेते करीत असल्याने जिल्ह्यातील वातावरण तंग आहे. याकडे निवडणुक आयोगाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Friday 28 October 2016

ऍट्रॉसिटीचा गैरवापर करण्यावर हायकोर्टाची तीव्र नाराजी

नागपूर, -आपल्या वैयक्तिक कारणांसाठी ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करण्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
न्या. भूषण गवई आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर एक प्रकरण आले असताना, दंडाधिकार्‍यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(३) अंतर्गत तांत्रिक आदेश पारित करू नयेत, अशी स्पष्ट समज खंडपीठाने दिली आहे.
वैयक्तिक कारणांसाठी उठसूठ ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करण्याच्या कृतीवर खंडपीठाने तीव्र आक्षेप नोंदविला आहे. अगदी क्षुल्लक कारणासाठीही या कायद्याचा गैरवापर केला जातो असे नमूद करून याचिकाकर्ते, नागपूर कारागृहाचे तत्कालीन पोलिस उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे यांची खंडपीठाने चांगलीच कानउघाडणी केली आहे. त्यांना पदोन्नती नाकारल्याने आपल्यावर अन्याय झाल्याचे दर्शवीत शिंदे यांनी पोलिस महासंचालक व गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांविरुद्ध ऍट्रॉसिटीची तक्रार पोलिसात दाखल केली होती. यावर भाष्य करीत, आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा मानसिक छळ आणि मानहानी करण्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. शशिकांत शिंदे यांनी पोलिस महासंचालक, गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात दाखल तक्रार रद्द समजण्यात यावी, असे नमूद करीत कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकालही खंडपीठाने रद्द ठरविला. दंडाधिकार्‍यांकडून हा निव्वळ न्यायालयीन प्रक्रियेचाच अवमान असल्याची तीव्र टिपणी खंडपीठाने केली आहे.
काही उदाहरणे देताना खंडपीठाने निरीक्षण नोंदविताना म्हटले आहे की, ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला की, लगेच अनेक लोक ऍट्रॉसिटी कायद्याखाली तक्रारी दाखल करतात. खंडपीठाचे स्पष्ट मत आहे की, यापैकी अनेक प्रकरणांमध्ये उमेदवार पराभूत झाला की, तो आपल्या पराभवाचे उट्टे विजयी उमेदवाराच्या विरोधात काढण्यासाठी या कायद्याचा वापर करतात.
दंडाधिकार्‍यांनी अनेक प्रकरणात दिलेल्या आदेशांवर खंडपीठाने आपली तीव्र नापसंती नोंदविताना म्हटले आहे की, प्रकरण न्यायालयासमोर आले असताना, त्यात सत्य आहे का? कायद्याचा आधार बिनचूक आहे का, तक्रारीत नमूद बाबींवर ऍट्रॉसिटी कायदा लागू होतो का, याचा कोणताही विचार दंडाधिकारी करीत नाहीत. ते थेट फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५३ (३) अन्वये तांत्रिक आदेश पारित करतात. हा आदेश पारित केल्यानंतर जे निष्पाप लोक भरडले जातात, ज्यांची समाजातील प्रतिष्ठा धुळीस मिळते, त्यांना आरोपी म्हणून हिणवले जाते, याचा गांभीर्याने विचारच कनिष्ठ न्यायालये करीत नाहीत.
अशा अनेक उदाहरणांकडे खंडपीठाने लक्ष वेधले आहे. अनेक प्रकरणी तर असे दिसून आले की, संपत्तीचे वाद, पैशाचा व्यवहार, सहकारी संस्थांमधील विश्‍वस्तांचे वाद यातही फौजदारी संहितेच्या कलम १९० सोबत २०० किंवा कलम १५६(३) अंतर्गत लोक ऍट्रॉसिटीच्या तक्रारी दाखल करतात. दंडाधिकार्‍यांना समज देताना खंडपीठाने म्हटले आहे की, अशा प्रकरणी तक्रारीतील सत्य पूर्णपणे निर्विवाद आहे की नाही, याची सूक्ष्मतेने तपासणी करण्याची दंडाधिकार्‍यांची जबाबदारी आहे. अन्यथा हा पोलिस यंत्रणेचा आणि कायद्याचा अवमान केल्यासारखे ठरेल.
केसोराम सिमेंट कंपनीतही अशाच प्रकारची तक्रार दाखल झाली होती. प्रकरण होते एका कोळसा व्यापार्‍याचे. त्यात कोळशाचा पुरवठा, वाहतूक आणि काही वादग्रस्त कागदपत्रे सादर केल्यामुळे कंपनीने कारवाई केली होती. कोळसा व्यापार्‍याने कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या विरोधात थेट ऍट्रॉसिटीची तक्रार पोलिसात दाखल केली. यात दंडाधिकार्‍याने तक्रारीची कोणतीही शहानिशा न करता, केवळ तक्रार दाखल झाली म्हणून तपास करण्याचे आदेश दिले. दंडाधिकार्‍याने हा आदेश पारित करताना मुळीच सद्सद्बुद्धीचा वापर केलेला नाही, एवढेच नव्हे तर हे फौजदारी स्वरूपाचे प्रकरण असताना, कायद्याचा दुरुपयोगच केला आहे, अशा शब्दात खंडपीठाने आपला संताप व्यक्त केला आहे.

ड्रग्सच्या व्यवसायात गुंतलेला गोंदियातील "तो" युवक कोण?

नागपूर पोलीसांनी पकडलेल्या युवतींने सांगितले गोंदियाचे नाव
बाजारचौकात असलेल्या एका व्यवसायकाच्या मुलाच्या सहभागाची चर्चा
 
गोंदिया,दि.28:- गोंदिया शहर हे तसे विविध कारणांनी ओळखले जाते.आधीपासूनच गोंदियाची मिनी मुंबई अशी ओळख व्यवसायीक क्षेत्रात आहे.कारण या शहरात यापुर्वीही नकली निरमा,नकली मेवा,मिठाईसह दुचाकी वाहनातील आॅईलमध्येच नव्हे तर औषधी विक्रीत आघाडीवर असल्याची चर्चा होती.नकली दारुच्या वाहतुकीसाठी गोंदिया जिल्हा नवा नाही.परंतु आत्ता हळूहळू या शहरातील युवकामध्ये ड्रग्स,कोकीनसारख्या नशेचे पावडर गोंदिया शहरात दाखल झाले असून 20 आॅक्टोंबरला नागपूर पोलीसांनी ड्रग्स पोचविणार्या एका युवकासह युवतीला ताब्यात घेताच त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरुन नायजेरिया येथून मुंबई मार्गे गोंदियाला ड्रग्स(कोकीन),व्हाईट व क्रिस्टलचे पावडर गोंदियात पोचविले जाणार असल्याची माहिती पोलीसांना दिली होती.विशेष म्हणजे या व्यवसायात गोंदियातील एका प्रतिष्ठित व्यवसायीक असलेल्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा सहभागी असल्याचे बोलले जात असून गोंदियात तर "तो" युवक कोण  या चर्चांना उधाण आले आहे.विशेष म्हणजे हा युवक बाजारचौकातील एका व्यवसायीकाचा मुलगा असल्याचे बोलले जात आहे.या संदर्भात नागपूरातील अनेक वृत्तपत्रांनी हा प्रकार गोंदियात सुरु असल्याचे वृत्तही प्रकाशित केले आहे.
नायजेरियातून आयात करण्यात येत असलेल्या व्हाइट आणि क्रिस्टल नामक ड्रग्सला गोंदियातील महाविद्यालयीन युवकांमध्ये चांगलीच मागणी असल्याची चर्चा असून कुडवा नाका,अभियांत्रीकी महाविद्यालय परिसरात अशा युवकांची गर्दी असल्याचे बोलले जाते. महाविद्यालयीन युवकासंह गोंदियातील काही धनाढ्य लक्ष्मीपुत्रांना या नशेची सवय लावण्यासाठी काही युवक काम करीत असल्याची चर्चा असून मोक्षधाम मार्गावरील भागात सुध्दा अशा प्रकाराला चालना देण्यासाठी काही असामाजिक तत्व काम करीत असल्याची चर्चा आहे. गोंदिया पोलीसांनी जिल्ह्यात शिरकाव होत असलेल्या डॅग्सच्या पुरवट्यावर नकेल कसण्याची गरज निर्माण झाली असून पोलीसांनी कितीही मोठा धनाढ्य व्यापारी,राजकीय पाठबळ असलेल्या किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचाही व्यक्ती असला तरी त्याचा शोध घेऊन तडीपारच नव्हे तर तुरुंगात डाबण्यासाठी सार्थक पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
व्हाइट आणि क्रिस्टल ड्रग्स घेतल्याच्या नंतर नशेच्या शौकीन युवा रजनीगंधा, पानबहार तसेच पान पराग च्या पाउच किंवा डबा घेउन त्याच्यात  ड्रग्स मिळवतात. तसेच रजनीगंधाच्या पाउच मध्ये ड्रग्सचे मिश्रण करून, खिश्यात ठेवले जातात आणि शौकच्या हिशोबाने त्याचे चटकारे घेतले जाते. या नशेच्या आदी झालेले युवकांचे प्रतिदिन खर्रे-पाउच का खर्च ३ ते ५ हजार रूपयांपर्यंत पोहोचते. एवढेच नाही तर या घातक नशेची सवय लागते आणि त्याची आपुर्ती काही कारणाने न झाल्यास ते मनोरोगाचे शिकार होउन काहीपण करायला आतूर होतात.
नायझेरीया वरून निघालेला ड्रग्स मुंबईमार्गे गोंदियाला पोहोचत असल्याची माहिती २० आॅक्टोंबर रोजी मुंबईवरून ड्रग्स घेउन निघालेल्या सचिन अंबागुये नामक युवकाच्या अटकेनंतर समोर आले आहे.नागपूर पोलीसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अल्ताफ शेख उर्फ बबलू ला ज्यावेळी अटक केली त्यावेळी त्याच्यासोबत २२ ते २४ वर्षिय एक युवती सुध्दा पकडली गेली. त्या युवतीकडून १० ग्रॅम व्हाइट आणि क्रिस्टल ड्रग्स हस्तगत करण्यात आले.त्या युवतीने पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार ते ड्रग्स गोंदियात पोहोचविले जाणार होते.चर्चेनुसार गोंदियात व्हाईट कोकीन व क्रिस्टल ड्रग्स ची एक पुडी पात्र हजार ते सात हजार रूपये प्रती ग्राम दराने युवकांना विकले जात असून सदर युवतीच्या माहितीनंतर या व्यवसायाशी संबध असलेला व्यक्ती फरार नव्हे तर शहरातून गायब असल्याचेही बोलले जात असल्याने तो युवक कोण या चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना-भाजपची युती पक्की, स्था.स्व. निवडणुकीत एकत्र लढणार!

मुंबई: दिवाळीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि भाजपमध्ये सारं काही आलबेल झालं असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजप आणि शिवसेनेनं मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत आज अधिकृत घोषणा केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी या युतीची घोषणा केली आहे.
 राज्यभरातील 212 नगरपालिकांसाठी राज्यपातळीवर युती करण्यात आली आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच भाजप आणि शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांच्या घरी बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आणि संध्याकाळी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.‘चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वत्र युती व्हायला हवी अशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळेच दिवसभर याबाबत चर्चा सुरु होती. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेना-भाजपच्या युतीचा निर्णय घेण्यात आला आहे.’ अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

Thursday 27 October 2016

नियंत्रण रेषेजवळ पाकचा मोर्टार आणि ग्रेनेडने हल्ला

श्रीनगर, दि. 27 - पाकिस्तानकडून गुरूवारी संध्याकाळपासून नियंत्रण रेषेजवळ जोरदार गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानी रेंजर्सकडून भारतीय  लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करण्यात आलं असून यामध्ये भारताचे 5 जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे.  भारतीय लष्कर पाकिस्तानच्या या नापाक हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. तर जोरदार गोळीबारामुळे सीमेवरील गावक-यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांना फोन करून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
 
पाकिस्तानी सेनेचे जवान नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ  दबा धरून बसले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे. तसेच ग्रेनेड अटॅक आणि मोर्टारने  देखील मोठ्याप्रमाणात हल्ला केला जात असल्याचं वृत्त आहे. हिरानगर, कठुआ, सांबा, अरनिया, तंगधार, अखनूर आणि मेंढर या ठिकाणांवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू असल्याचं प्राथमिक वृत्त आहे. तर तंगधारमध्ये भारतीय लष्कराच्या चौकीवर केलेल्या हल्ल्यात एक भारतीय जवान शहीद झाला आहे. 
 

गृहखात्यावर आबांसारखा देवेंद्रांचा अंकुश नाहीच; स्मिता पाटील यांची टीका

मुंबई- ‘माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा गृह खात्यावर अंकुश होता. राज्यात एखादी महत्त्वाची घटना घडली की ते तत्काळ तिथे जात होते. विद्यमान मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मात्र गृह विभागावर वचक दिसत नाही. राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली असून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे योग्य नसून राज्याचे गृहमंत्रिपद हे स्वतंत्र व्यक्तीकडेच असले पाहिजे,’ अशी टीका राष्ट्रवादी युवती संघटनेच्या नूतन अध्यक्षा स्मिता अार. पाटील यांनी बुधवारी केली. स्मिता या अार. अार. पाटील यांच्या कन्या अाहेत.

शकुंतला रेल्वे लाईनचे भारतीय रेल्वेत होणार विलीनीकरण

नवी दिल्ली, दि. २७ - भारतीय रेल्वे ही सरकारी मालकीची आहे. पण भारतात एक रेल्वेमार्ग असा आहे जो खासगी मालकीचा आहे. शकुंतला रेल्वे असे या रेल्वेमार्गाचे नाव असून, लवकरच शकुंतला रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण होणार आहे. ब्रिटीशकालीन रेल्वेची ही शेवटची ओळख लवकरच इतिहासजमा होणार आहे. 
 
विदर्भातील यवतमाळ ते अचलपूर दरम्यानचा १८८ किमीचा रेल्वे मार्ग शकुंतला रेल्वेच्या मालकीचा आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हा रेल्वेमार्ग ताब्यात घेण्याच्या प्रस्तावला मंजुरी दिली आहे. ब्रिटीश कंपनी किलीक निक्सनने १९१० साली शकुंतला रेल्वेमार्गाची उभारणी केली. 
 
स्वातंत्र्यपूर्वकाळात कापसाची निर्यात करण्यासाठी या मार्गाचा वापर केला जायचा. स्वातंत्र्यानंतर अन्य खासगी मालकीच्या रेल्वेमार्गाचे राष्ट्रीयकरण झाले. पण शुकंतला रेल्वे मार्गाची मालकी खासगी कंपनीकडेचं राहिली. करारानुसार भारत सरकारने हा मार्ग २०१६ मध्ये ताब्यात घेतला नाही तर, राष्ट्रीयकरणासाठी आणखी दशकभर थांबावे लागेल. 
 
या अरुंद रेल्वे मार्गाचा विस्तार करण्याची योजना असून त्यामुळे दिल्ली-चेन्नई-बंगळुरुमधील अंतर ८० किमीने कमी होईल. हा मार्ग वापरण्यासाठी भारतीय रेल्वे शकुंतला रेल्वेला वर्षाला २ ते ३ कोटी रुपये दोते. दोन प्रवासी गाडया आणि काही मालगाडया या मार्गावरुन धावतात. सध्या शकुंतला रेल्वेची मालकी भारतीय व्यक्तीकडे आहे. 
 

Wednesday 26 October 2016

आधी ओबीसी नंतर राजकारण हाच ध्येय हवा

अर्जुनी मोरगाव,दि.26-येथील बहुउद्देशीय हायस्कुलच्या प्रांगणात आज बुधवारला झालेल्य ओबीसी संघर्ष कृती समितीच्या सहविचार सभेत येत्या 26 नोव्हेंबरला सविंधान दिनी तालुकास्तरीय ओबीसी मेळावा आयोजित करण्यासोबतच 8 डिसेंबरचा मोर्चा यशस्वी करण्याचा संकल्प उपस्थितांनी घेतला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी डाॅ.दिलीप काकडे होते.या बैठकीला मार्गदर्शन करतांना मान्यवरांनी आधी आपण ओबीसी आहोत नंतर कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या संघटनेचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आहोत हे लक्षात ठेवून आपल्या समाज संघटनेला आधी प्राधान्य दिल्याशिवाय कुठलाही इतर संघटनांचा विचार केलाच जाऊ शकत नसल्याचा सुर या सहविचार बैठकित व्यक्त केला.आजपर्यंत आपण सर्वांना राजकीय पक्षाच्या प्रमुखांना आपआपसातच भांडत ठेवून आपल्या न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम केल्यानेच आम्ही ओबीसी विकासापासून वंचित राहिलो आहे,आत्ता मात्र संघर्षाची वेळ आली असून कुणी कितीही आपणास तोडण्याचा प्रयत्न केला तरी आपण ओबीसीचा महामोर्चा यशस्वी केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे विचार व्यक्त करीत येत्या 26 नोव्हेंबरचा तालुकास्तरीय ओबीसी मेळावा न भुतो न भविष्यतो असा करण्याचा विचार बोलून दाखविला.
प्रमुख वक्ते म्हणून ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,खेमेंद्र कटरे, तालुका खरेदी विक्रीचे अध्यक्ष नामदेव पाटील कापगते,प्रमोद लांजेवार,डाॅ.गजानन डोंगरवार,प्राचार्य यशवंत परशुरामकर,प्रा.सुनिता हुमे,नारायण बहेकार,भोजराम रहेले,अनिरुध्द ढोरे,योगेश गहाणे,भालचंद्र पटले,सचिन फटिंग ,तालुकाअध्यक्ष गिरीश बागडे, नविन नशिने,बालू बडवाईक , सौ .मंजुषा तरोणे,राधेश्याम भेंडारकर, सतिश कोसरकर आदी उपस्थित होते.संचालन ओमप्रकाशसिंह पवार यांनी केले.आभार नविन नशिने यांनी मानले.

गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील आफ्रिकन आणि इंडियन सफारी - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 26 :   नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील अफ्रिकन आणि इंडियन सफारी नोव्हेंबर 2017 पर्यंत सुरु करावी,  असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गोरवाडा प्राणी संग्रहालयाची आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वन मंत्री सुधीर मुनगंटीवार,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, वन सचिव विकास खारगे, मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख नागपूर सर्जन भगत, मुख्य वन्य जीव संरक्षक श्री भगवान यांच्यासह वन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
गोरेवाडा प्राणी संग्रहालयासाठी 451 कोटी रुपयांचा आराखडा निश्चित केला असून या प्रकल्पाचे काम चार वर्षांत पूर्ण करावयाचे आहे. त्या दृष्टीने आराखड्यात नमूद कामांना  आवश्यक त्या केंद्र शासनाच्या मान्यता मिळवून वेग देण्यात यावा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले
या प्राणी संग्रहालयाचे एकूण क्षेत्र हे 564 हेक्टर असून आतापर्यंत येथे रेस्क्यू सेटर, संरक्षक भिंती (कंपाऊंड वॉल), नेचर ट्रेल,  गोरेवाडा
रिझव्ह - जंगल सफारी, वॉच टॉवर्स, नैसर्गिक अधिवासाशी संबंधित कामांसह वॉटर होल्सची कामे पूर्ण झाली आहेत. इंडियन सफारी अंतर्गत टायगर सफारी,बिबट सफारी,   चितळ, नीलगाय यासारख्या प्राण्यांची संमिश्र सफारी यांचा समावेश आहे. एकूण 145 हेक्टर क्षेत्रावरील या सफारीमधून नैसर्गिक अधिवासांमधील वन्यजीव पाहण्याचा आनंद पर्यटकांना घेता येईल.
या उद्यानातील चार कि.मी.च्या रोप वे च्या कामास ही आज तत्वत: मान्यता देण्यात आली. याचा विकास आराखडा तयार करून त्यास केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. प्राणी संग्रहालयातील 16 कि.मी रस्त्यांचे श्रेणीवर्धन करण्यास ही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सर्व ऋतूंमध्ये पर्यटकांना येथील चितळ, मोर,  बिबटे आणि सांबर यासारखे वन्यजीव पाहाता यावे हा त्यामागचा हेतू आहे.  प्राणी संग्रहालयातील व्हेटरनरी सर्जन पदे भरण्याबाबत आजच्या बैठकीत सूचना
देण्यात आल्या.

कोलामार्क संवर्धन राखीवात रान म्हशी संवर्धनास प्रोत्साहन

मुंबई दि. 26 :  गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्क  संवर्धन राखीव क्षेत्रात रानम्हशीच्या संवर्धनास विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्य वन्य जीव मंडळाची 12 वी बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बंटी भांगडिया, आमदार सुधाकर देशमुख, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, वन विभागाचे सचिव विकास खारगे, मुख्य वन सरंक्षक वनबल प्रमुख सर्जन भगत, मुख्य वन्यजीव संरक्षक श्रीभगवान यांच्यासह राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य आणि वन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
कोलामार्का हे गडचिरोली जिल्ह्यातील 180 चौ.कि.मी चे क्षेत्र 2013 मध्ये संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथे लोकसहभागातून शासनाने केलेल्या वन व्यवस्थापनाच्या प्रयोगास यश मिळाले असून येथील रान म्हशींची संख्या 10 वरून 22 इतकी झाली आहे. आजमितीस जगामध्ये तीन हजार आठशे रानम्हशी आहेत.  भारतात याची संख्या 3 हजार 500 इतकी आहे यामध्ये महाराष्ट्र आणि छत्तीसगड येथील रान म्हशींची संख्या 200 च्या आसपास आहे अशी माहिती आज बैठकीत देण्यात आली. त्यामुळे दुर्मिळ  होत असलेल्या रान म्हशींच्या संवर्धनाला कोलामार्का  येथील प्रयोगात मिळालेले यश पाहता त्यास अधिक प्रोत्साहन दिले जावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
आजच्या बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,बोरिवली ते गोरेगाव-मुलूंड दरम्यान भूमीगत बोगदा तयार करण्याकरिताच्या भूतकनिकी सर्व्हेक्षणाच्या कामास मंजुरी देण्यात आली. तसेच ठाणे-बोरिवली या मार्गावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रातून जाणाऱ्या रोप वे च्या सर्व्हेक्षण आणि अन्वेषणाच्या कामास ही यावेळी मान्यता देण्यात आली. रोप वे ची ऊंची, त्यामुळे होणारा आवाज तसेच वन्यजीवांना त्रास होणार नाही  या गोष्टींचा विचार यात केला जावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. आजच्या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील वडाळी तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर बिबट सफारीच्या निर्मितीस ही मान्यता देण्यात आली.

ओबीसीसांठी संवैधानिक अधीकाराची लढाई- बोपचे

अर्जुनी/मोरगाव:- संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३४० नुसार ओबीसींच्या हक्काची तरतूद केली. मात्र, गेली ६० वर्षे राजकिय इच्छाशक्तीच्या अभावाने देशात ७५१ ओबीसींवर अन्याय सुरू आहे. इंग्रजी राजवटीनंतर ओबीसींची जणगणणाच झाली नाही. आम्हाला कुठल्याही जाती किंवा धर्माला विरोध नाही. आम्हाला आमचे संवैधानिक अधीकार मिळावेत. आम्ही कुठल्याही राजकिय पक्ष अथवा शासनाच्या विरोधात नाही. येणाèया ८ डिसेंबर आपल्या न्याय हक्कासाठी ओबीसींनी एकत्र येऊन सरकारला जाग आणावी असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे यांनी केले. ते ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड मध्ये आयोजीत सभेत बोलत होते. यावेळी जिवन लंजे, जि.प. सदस्य किशोर तरोणे, खेमेंद्र कटरे, गिरीष बागडे, नविन नशीने, सेवा.सह. संस्था संचालक लोकेश हुकरे, ललीत बाळबुध्दे, नगरसेवक मुकेश जायस्वाल, राजू शिवणकर, मनोहर शहारे, बालू बडवाईक, रत्नाकर बारेकर, ओम प्रकाश सिंह पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नुतनलाल सोनवाने, अश्वीन गौतमख् चेतन शेंडे, कृ.उ.बा.स. संचालक सोमेश्वर सौदरकर, राहूल ब्राम्हणकर, राजू बेरीकर, प्रा. भालचंद्र पटले, कृ.उ.बा.स. संचालक प्रमोद लांजेवार उपस्थित होते.

वस्तीगृहाला पालकमंत्र्यांची भेट

अर्जुनी/मोरगाव:- येथील मागास वर्गीय मुलींचे शासकिय वस्तीगृहात पालक सभा सुरू करतांना अचानकपणे जिल्ह्यांचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी भेट दिल्याने सारेच अवाक राहिले. पालकमंत्री भेटीला आल्याचे बघून विद्यार्थ्यानींना आनंद झाला. यावेळी उपस्थित पालकांशी ना. बडोलेंनी संवाद साथला. मार्गदर्शनातून मागासवर्गिय विद्यार्थी हे शिक्षणात कुठेही कमी नाहीत. ते शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून तालूकास्तरावर मुला मुलींचे वस्तीगृह स्थापन करून प्रत्येकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य शासन करीत असल्याचे सांगितले. सामाजीक न्याय विभागामार्फत  शिक्षणासाठी बहुउपयोगी योजनांची माहिती दिली. कुठलीही शैक्षणिक अडचण असल्यास आम्हाला कळवा. आम्ही ती जबाबदारीने पुर्ण करण्याचे आश्वासन यावेळी ना. बडोलेली उपस्थितांना दिले. संपूर्ण वस्तीगृहातील सोई सुवीधांची पाहणी बडोलेंनी केली. विद्यार्थीनींना नियमीत नास्ता, जेवण याची तपासणी केली. पहाणी अंती व्यवस्थापन गुणवत्ता पुर्ण असल्याचे समाधान बडोलेंली व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापीका सुनिता हुमे, हृपाल ए.पी. राठोड, ए.जी. बन्सोड, सि. एम. झोके, विलास रणदिवे, नानाजी दवळे, अर्चना नाकाडे, तसेच पालकवर्ग उपस्थित होते.

‘त्या’ सागवान तस्करांवर वन्यप्राण्यांच्या शिकारीचेही गुन्हे

गोंदिया दि.26: जिल्ह्याच्या संरक्षित वनक्षेत्रात सागवान वृक्षांची तस्करी करताना वनविभागाच्या हाती लागलेले पाचही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वन्य प्राण्यांची शिकार केल्याचे अनेक गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. आता सागवान तस्करीतही ते अडकल्यामुळे सागवान तस्करीत अप्रत्यक्ष सहकार्य करणार्‍यांपर्यंत त्यांच्यामार्फत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
गोंदिया वन परिक्षेत्राच्या चमूचे नेतृत्व करणारे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात दि.२३ व २४ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत राजेश श्यामराव मरस्कोल्हे (३५), निरंजन सदाशिव कुंभरे (३५), रवी कांतिलाल धुर्वे (३६), बाबुलाल सुखदेव भदाडे (३८) व नरेंद्र सुखराम सोनटक्के (३२) सर्व रा. धामनेवाडा यांना अटक करून त्यांच्यावर वनगुन्हा (जी/६२/१९, दि.२२/१0/२0१६) नोंद करण्यात आला आहे.
सदर आरोपींनी संरक्षित वनक्षेत्र (कक्ष क्र.४७) जुनेवानी बीट व (कक्ष क्रमांक ३६७) निमगाव (इंदोरा) बीटमध्ये सागवान वृक्षांची अवैध कटाई केली होती. या घटनेची माहिती गोंदिया वनक्षेत्र कार्यालयात मिळताच चमुने तत्काळ कारवाई करून सागाचे कापलेले वृक्ष व साहित्य जंगलातून जप्त केले. तसेच घटनास्थळावरून राजेश मरस्कोल्हे, निरंजन कुंभरे व रवी धुर्वे या तीन आरोपींना अटक केली. मात्र चौथा आरोपी बाबुलाल भदाडे पळून जाण्यात यशस्वी ठरला. ही कारवाई २३ ऑक्टोबरला करण्यात आली. सदर तीन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना २५ ऑक्टोबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली होती. वनकोठडी संपल्यानंतर मंगळवारी त्यांची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली.
वनविभागाच्या चमुने दि.२४ रोजी चौथा फरार आरोपी बाबुलाल भदाडे व नरेंद्र सोनटक्के या दोघांना अटक केली. सोनटक्के याने सदर चारही आरोपींकडून सागवानची लाकडे विकत घेवून अवैध वृक्षतोडीस चालना देवून मदत केल्याने त्यालाही अटक झाली. सर्व पाचही आरोपींना २५ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्यावर वन अधिनियम १९२७ च्या कलम ३२ (अ), ३३ (१) (अ) (एफ) (एच) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने पाचही आरोपींची रवानगी भंडारा कारागृहात करण्यात आली.

BERARTIMES- 26 OCT- 01 NOV





Tuesday 25 October 2016

शहिद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सव्वाशे कोटी भारतीय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 25 : देशाच्या सीमेवर अहोरात्र लढताना शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी देशातील सव्वाशे कोटी जनता खंबीरपणे
उभी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे उरी येथील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचा कार्यक्रम फोर्ट येथील
बँकेच्या मुख्यालयातील वसंतदादा पाटील सभागृहात झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख,
राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार आशिष शेलार, बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर, सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले की, अतिशय खडतर परिस्थितीत सीमेवर देशाच्या सैन्यातील जवान हे देशाच्या व नागरिकांच्या रक्षणासाठी सतत कार्यरत
असतात. त्यामुळे देश प्रगती करत असतो. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात प्रचंड संतापाची लाट पसरली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी शांततेची भूमिका घेतली. मात्र कोणी आपल्या देशावर हल्ला केला तर त्याला त्याच प्रकारे उत्तर देण्याची तयारी ही देशाने ठेवली. त्यानंतर
आपल्या सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करुन आपली कोणतीही हानी न होता हल्ला यशस्वी केला. जगात पाकिस्तानला एकाकी पाडण्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र
मोदी यशस्वी झाले असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी उरी येथील दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवानांच्या कुटुंबियांना मदतीच्या धनादेशाचे वाटप मुख्यमंत्री श्री. फडणवीस, सहकार मंत्री देशमुख,
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्तेकरण्यात आले.

हिंदुत्व हा धर्म नसून जगण्याचा मार्ग - सर्वोच्च न्यायालय

मुंबई, दि. २५ - हिंदुत्व हा आयुष्य जगण्याचा एक मार्ग आहे, तो धर्म नाहीच या १९९५ साली दिलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पुन्हा ठाम मत व्यक्त केले आहे. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर विचार करण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाचा धर्माशी संबंध नसल्याचेच स्पष्ट केले आहे.
 
हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली होती. पुढच्या वर्षी होणा-या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा वापर करण्यावर बंदी घालावी अशीही त्यांनी याचिकेतून मागणी केली होती. तिस्ता सेटलवाड यांच्या याचिकेवर हिंदूत्व किंवा हिंदू धर्म आदी विषयावर सुनावणी नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. 
 
धार्मिक नेत्याने आपल्या अनुयायांना विशिष्ट उमेदवाराला मत देण्याचे आवाहन करणे, जनप्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम १२३ (३) नुसार बेकायदेशीर आहे का, हा मूळ विषय आहे. त्यामुळे या संदर्भातील कायदेशीर वैधता इतक्यापुरताच सुनावणीचा विषय मर्यादीत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. कलम १२३ (३) अंतर्गत उमेदवार किंवा त्याच्यावतीने कोणीही नागरिकांमध्ये धर्म, जात, समाज आणि भाषेच्या आधारावर शत्रूत्वाची भावना निर्माण करत असेल तर त्याच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
 
१९९०च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या उमेदवारांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या दोन भाषणांचा प्रचारासाठी वापर केला होता. हिंदूत्व आणि हिंदू राष्ट्राच्या आधारावर त्यांनी मते मागितली होती त्यामुळे सदर उमेदवारांची निवडणूक रद्द करण्याची याचिका करण्यात आली होती. शिवसेना-भाजपच्या अनेक विजयी उमेदवारांविरोधात त्यावेळी खटले दाखल झाले होते आणि मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजुने निकाल दिला होता.
 
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर दोन प्रकरणे वगळता अन्य सर्व प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला होता. तर या दोनपैकी एक याचिका बरखास्त करण्यात आली तर एक प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या भूमिकेमुळे हिंदुत्ववादी राजकारण्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.

तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर

नवी मुंबई, दि. 25 - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. 105 विरुद्ध  6 मतांनी हा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्षांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं तर भाजपाने प्रस्तावाला विरोध केला. यावेळी सभागृहात मुंढे हटावच्या घोषणाही देण्यात आल्या. अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती.
 
रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेमध्ये आयुक्तांवरील पहिला अविश्वास ठराव मंगळवारी मांडण्यात आला. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापौरांसह नगरसेवकांना अवमानजनक वागणूक देणे, मनमानी कारभाराचा ठपका ठेवण्यात आला होता. 

Monday 24 October 2016

महावितरणच्या गोंदिया झोनचे मुख्य अभियंतापदी जिजोबा पारधी


जानवीर यांची जळगाव येथे बदली

गोंदिया- महावितरणच्या मुख्य अभियंता संवर्गातील स्थानांतरणाचे आदेश आज मुख्य सामान्य व्यवस्थापक कविता घरत यांनी काढले आहेत. महावितरणच्या गोंदिया झोनची जबाबदारी आता जळगावचे मुख्य अभियंता जिजोबा महादेवराव पारधी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (ता२४) महावितरणच्या मुख्य सामान्य व्यवस्थापक कविता किरण घरत यांनी स्थानांतरणाचे आदेश काढले. यात जळगाव झोनचे मुख्य अभियंता असलेले पारधी यांची गोंदिया येथे बदली करण्यात आली. तर गोंदियाचे मुख्य अभियंता ब्रिजकुमारqसग कुवरqसग जानवीर यांचे जळगाव येथे समान पदावर स्थानांतरण करण्यात आले. याशिवाय लातूर झोनचे मुख्य अभियंता असलेले अनिल भगवान भोसले यांची कोकण विभागाचे गुणवत्ता नियंत्रक म्हणून मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. ते कोकण विभागाचे गुणवत्ता समन्वयक म्हणून काम पाहतील. लातूर विभागात कार्यरत मुख्य अभियंता किशोर जयराम मेश्राम यांचेवर नागपूर विभागातील गुणवत्ता नियंत्रक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कल्याण विभागात गुणवत्ता नियंत्रक म्हणून कार्यरत असलेले रफिक गफूर शेख यांचे नागपूर झोनचे मुख्य अभियंता म्हणून स्थानांतरण करण्यात आले आहे. या सर्व अधिकाèयांना २९ तारखेपर्यंत कार्यमुक्त होण्याचे आदेश आहेत.

वाघाच्या कातडी तस्करी प्रकरणातील आरोपींची संख्या १९ वर


 आठ आरोपींची न्यायालयीन तर आठ आरोपींची वनकोठडीत रवानगी

देवरी(ता.२०)- गेल्या १५ आक्टोबर रोजी वन विभागाच्या देवरी दक्षिण वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाèया सालईनजीक वाघाच्या कातडीची तस्करी करणाèया टोळीला वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले होते. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता ११ वरून १९ वर पोचली आहे. यापैकी आज न्यायालयाने पुन्हा ८ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून उर्वरित आठ आरोपींना वनकोठडी सुनावली आहे.
 पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिस व वनविभागाच्या पथकाने वाघाच्या कातडीची तस्करी करणाèया तीन आरोपींना अटक केली होती. यानंतर राबविलेल्या अटकसत्रामुळे आरोपींची संख्या ११ वर पोचली. या सर्व आरोपींना मंगळवारी (ता.१८) ला न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींना गुरुवारपर्यंत (ता.२०) वन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर २० आक्टोबर रोजी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता यातील आरोपी महेंद्र बिलाजी घमगाये, सुरेंद्र रामचंद्र शहारे आणि  विलास हरिदास बडोले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर हेमंत भारत अरकरा, रामसाय सन्याराम मडावी, शिवराम सुंदर तुलावी, लोकेश कलिराम मुलेटी, दिनेश कुवरqसग यादव, राजकुमार शत्रुघ्न मेश्राम, भावेश गणेश करमकर आणि सुरेश केवळराम राऊत यांना वनविभागाचे कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, वनविभागाने केलेल्या चौकशीत २२ ते २४ तारखेदरम्यान आरोपींच्या संख्येत आणखी भर पडली. या नव्या आरोपींमध्ये सीताराम परदेशी सलामे, सुनील माणिकलाल मेंढे, लोकेश भरत शिवणकर, रोहित अशोक शिवणकर, हरिकिसन चमरू बहेकार, गोपाल मेहतर कोराम, कुवरलाल रावजी हिडामी, होमराज रावजी कोरेटी यांचा समावेश आहे. आज सोमवारी (ता.२४) सोळाही आरोपींना देवरीच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता राजकुमार मेश्राम, शिवराम तुलावी, रामसाय मडावी, गोपाल कोराम,सुरेश राऊत, कुवरलाल हिडामी, होमराज कोरेटी, आणि भावेश करमकार या आरोपींना वनकोठडी सुनावण्यात आली. उर्वरित आठ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणात आणखी मासे गळाला लागण्याची शक्यना वनविभागातील सूत्रांनी वर्तविली आहे.

टाटा बोर्डने सायरस मिस्त्री यांना हटवले

नवी दिल्ली : टाटा सन्सचे चेअरमन सायरस मिस्त्री यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. ग्रुपने रतन टाटा यांना पुढील चार महिन्यांसाठी तात्पुरते चेअरमन पदावर नियुक्त केले आहे. पुढील चेअरमन पदासाठी एक सर्च पॅनल नियुक्त करण्यात आला आहे. 28 डिसेंबर, 2012 मध्‍ये टाटा सन्सची जबाबदारी रतन टाटा यांनी सायरस मिस्‍त्री यांच्‍याकडे दिली होती.

ही टीम सर्च करेल नवीन चेअरमन - 
- सर्च कमिटीमध्ये रतन टाटा, वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोनेन सेन आणि कुमार भट्टाचार्या यांचा समावेश आहे.
- वेणू श्रीनिवासन टीव्हीएस मोटरचे चेअरमन आहेत.
- रोनेन सेन टाटा सन्सचे इंडिपेंडेंट डायरेक्टर आहेत. 
- अमित चंद्रा टाटा सन्सचे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्‍टर आणि बेन कॅॅपिटलचे एमडी आहेत.
- कुमार भट्टाचार्या वार्विक मॅॅन्‍यूफॅॅक्‍चरिंग ग्रुपचे चेअरमन आणि टाटा सन्सचे इंडिपिडेंट डायरेक्‍टर आहेत.

मणिपूरचे मुख्यमंत्री गोळीबारातून सुदैवाने बचावले

इंफाळ,  दि. 24 - मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग सोमवारी सकाळी झालेल्या गोळीबारात बालंबाल बचावले. राज्यातील उखरूल येथे  अज्ञात इसमाने सिंग त्यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले मणिपूर रायफल्सचे दोन जवान जखमी झाले आहेत. एनएससीएन (आयएम)च्या कार्यकर्त्यांनी हा गोळीबार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 
उखरूल येथील रुग्णालय आणि इतर इमारतींचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग आणि उपमुख्यमंत्री गैखांगम हे सकाळी 9.30 वाजता इंफाळहून रवाना झाले. त्यांचे हेलिकॉप्टर  उखरुल जिल्ह्याच्या मुख्यालयाबाहेर उतरल्यावर त्यांच्याविरोधात स्थानिकांनी आंदोलनास सुरुवात केली. त्याचदरम्यान अज्ञात व्यक्तीने या हेलिकॉप्टरच्या दिशेने गोळीबार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

रामभाऊ अस्वले यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 24 - भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार रामभाऊ अस्वले यांच्या
निधनाने सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने काम
करणारे व्यक्तीमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
           मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, रामभाऊंच्या निधनाने
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक सच्चा स्वयंसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे
निष्ठावंत व्यक्तिमत्त्व हरपले आहे. रामभाऊ हे वक्तशीरपणा आणि
काटेकोरपणासाठी ओळखले जायचे. आपल्या विधानसभा मतदारसंघात अतिशय समर्पण
भावनेने त्यांनी काम केले. आपल्या विधानसभा क्षेत्राचा दौरा त्यांनी
निश्चित केला की, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी ते उपस्थित असायचे.
अतिशय शिस्तप्रिय असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. सलग तीनवेळा ते
विधानसभेचे सदस्य होते आणि त्यांच्यारूपाने भंडारा शहर मतदारसंघात
भाजपाला प्रथमच प्रतिनिधित्त्व मिळाले होते. ग्रंथालयाच्या चळवळीत सुद्धा
त्यांनी अतिशय चांगले काम केले. भंडाऱ्यातील सार्वजनिक जीवन अधिक समृद्ध
करण्यात त्यांचा वाटा मोठा होता

च्याइकॉंडो स्पर्धा २०१६: गोंदिय जिल्ह्यात ब्लॉसम स्कूल अव्वल

देवरी- गोंदिया जिल्हा क्रीडा विभागातर्फे नुकत्याच आयोजित च्याइकॉंडो स्पर्धेत देवरीच्या ब्लासम पब्लिक स्कूलने अव्वलस्थान पटकाविले.

या क्रीडास्पर्धेतील 29-30 वजन गटातून वंश हेडाऊ याने सुवर्ण पदक मिळविले. 48-50 वजन गटातून दक्ष गवते याने रजत तर 58-62 वजन गटातून केतन आंबिलकर याने कास्य पदन मिळविले. हे तिनही विद्यार्थी स्थानिक ब्लासम स्कूलचे आहेत. या स्पर्धकांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक सुजित टेटे, क्रीडा प्रशिक्षक राहुल मोहुर्ले आणि पालकांना दिले.  विजेत्या स्पर्धकांचे मुख्याध्यापक टेटे यांनी भेटकार्ड देऊन कौतुक केले.

क्रिमिलेअरची अट रद्द करा : ओबीसी सेवा संघाचे प. महाराष्ट्र अधिवेशन

पुणे दि. २४ :: क्रिमिलेअरची अट घालण्यात आल्याने ५0 टक्के ओबीसींना सवलती मिळत नाहीत, त्यामुळे ही अट रद्द केली जावी, अशी मागणी रविवारी ओबीसी सेवासंघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र अधिवेशनात स्वागताध्यक्ष विठ्ठलराव सातव यांनी केली.
जागे होण्याची वेळ येऊनही ओबीसी समाज झोपलेला आहे. त्याला जाग आणण्याचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा ओबीसी सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी केले.
सध्याचा काळ ओबीसींना अडचणीचा आहे, मात्र ते एकत्र येत आहेत, ही समाधानाची बाब असल्याचे सांगून भगवानराव बिडवे म्हणाले, बलुतेदारांनी ओबीसी ही एकच जात मानून संघटीत व्हावे.केवळ जातीच्या आधारावर जे संघटीत होतात, ती आंदोलने संपल्याशिवाय राहत नाहीत, असे सांगून प्रतिमा परदेशी म्हणाल्या, जातीअंताच्या लढय़ासाठी सर्व जातींना एकत्र आले पाहीजे.
कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात गौरव उबाळे यांना ओबीसी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तर, सुमनताई पवार, प्रल्हाद वडगावकर, संजय राजे यांनाही ओबीसी जाणीव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

८ डिसेंबरच्या ओबीसी महामोर्चात सहभागी व्हा-प्राचार्य तायवाडे

ओबीसी महामोच्र्यासाठी आ.वड्डेटीवारांनी दिल्या १०० गाड्या
ब्रह्मपुरी दि. २४ : आपल्या ओबीसी बांधव अनीक न्यायहक्कापासून वंचित आहे. आम्ही चळवळ चालवतो पण परिवर्तन आवश्यक आहे यासाठी बंधूनो जागृत व्हा आणि ८ डिसेंबरला नागपूरच्या विधानभवनावर निघणाèया महामोर्चात मोठया संख्येने शामील व्हा असे आवाहन ब्रह्मपुरीच्या विठ्ठल समिती सभागृहात आयोजित सभेत राष्ट्रीय ओबीसी महासंघानेचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी केले.
ब्रह्मपुरी तालुका ओबीसी संघटनेच्यावतीने नियोजन मार्गदर्शन सभा पार पडली. विचारपीठावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, आ. विजय वडेट्टीवार,माजी आ. सेवक वाघाये,संदीप गड्डमवार,सचिन राजुरकर,खेमेंद्र कटरे,मनोज चव्हाण,श्रीराम लांजेवार, बबनराव फंड,सुषमा भड, माजी आमदार उद्धवराव सिंगाडे, प्राचार्य डॉ.एल.एस. कोकोडे, प्रा.नामदेव जेंगठे,अनिता ठेंगडी,जिवन लंजे,पाडुंरग काकडे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना तायवाडे म्हणाले की आम्ही कुणाचे मोर्चे बघून अधिवेशनावर मोर्चा काढत नाही तर आमच्या मोच्र्याची घोषणा ही मे महिन्यातच सर्वात आधी करण्यात आली आहे.त्यातच आपल्या सवैधानिक अधिकारासाठी आम्ही संघटित होत आहोत.
याप्रसंगी माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे म्हणाले की राज्यघटनेने आम्हाला ३४० व्या कलमात अधिकार दिले आहेत.ते अधिकार मिळवून घेण्यासाठी आम्ही सर्व राजकीय मतभेद विसरुन या गैरराजकीय समाजसंघटनेत काम करीत आहोत.आम्ही कुणाच्या विरोधात लढा देत नसून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवलेला अधिकार सरकारने द्यावा यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ लढा देत आहे.मंडल आयोगाच्यापुर्वी कुणालाही ओबीसी शब्द माहित नव्हता आत्ता होत असून समाज जागृत आहे.आम्हाला जेव्हा आरक्षण लागू करण्यात आले त्यात कुठेही क्रिमीलयरची अट नाही.तसेच एस.सी., एस.टी.ला ही क्रिमिलेअर नाही.पण काही तथाकथीतांनी न्यायालयाच्या माध्यमातून आमच्यावर क्रिमीलयरची अट लादली आहे ती रद्द करण्यासाठी व आपला स्वतंत्र मंत्रालय व जातगणना व्हावी यासाठी ओबीसींनीही आपली ताकद दाखवावी लागणार आहे.सोबतच धान,कापूस,ज्वारी उत्पादक शेतकरी यांच्यावर सातत्याने अन्याय झाला असून त्यांच्या समस्यांनाही आपण या माध्यमातून सरकारपुढे मांडणार असल्याचे सांगितले. आ. वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी नेतृत्व मोठे आहे. दुसèयांना पाहावत नाही.आज उच्चवर्णीयांच्या हजारो कंपन्यामध्ये कोट्यावधीचा घोटाळा होतो परंतु ते तुरुंगात जात नाही परंतु एखाद्या ओबीसी बहुजनातील नेत्याने दोनचार कंपन्या उघडून पैसा कमावला तर त्याला भ्रष्टाचारी म्हणून तुरुगात टाकले जाते इथपासून आमच्या समाजाला तोडण्याचे काम सुरु झाले आहे.आजपर्यत काँग्रेसने ओबीसीला हिणवले आत्ता सत्तेत आलेल्या पक्षानेही हिनवने सुरु केले आहे.कुठलाही पक्ष हा ओबीसीच्या हिताचा विचार न करता विरोधातच राहिला फक्त आम्हाला त्यांनी वापरुन घेतले आहे आता मात्र आपण सर्वांनी राजकीय जोडे बाहेर ठेवून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून आयोजित मोच्र्याला यशस्वी करावे असे आवाहन करीत आपल्या मतदारसंघात मी या महामोर्चासाठी १०० गाड्या उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. प्रा. जेंगठें यांनी ओबीसी संघटनेच्या सुरवातीपासूनची माहिती देत आयएएस ओबीसी मुलावर झालेल्या अन्यासाठी सुध्दा लढा दिल्याचे सांगत ज्या मराठ्यानी मंडलच्यावेळी ओबीसींचा विरोध केला तेच आज ओबीसीमध्ये कसे आरक्षण मागत आहेत असा प्रश्न उपस्थित करुन ओबीसींना जागृत होण्याची आवश्यकता असल्याचे म्हणाले.सुषमा भड यांनी २७ नोव्हेंबरला आयोजित महिला अधिवेनात या भागातून हजारोच्या संख्येने महिलांना सहभागी करुन घेण्याचे आवाहन करीत या निमित्ताने निघणाèया स्मरणिकेसाठी महिलांनी लेख,कविता आदी पाठवावे असे आवाहन केले.माजी आमदार सेवक वाघाये यानीही विचार व्यक्त केले.यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रा.श्याम झाडे यांनी गेल्या ३० वर्षापासून ब्रम्हपूरी भागात सुरु असलेल्या ओबीसी संघटनेच्या कार्याचा आढावा देत मंडल आयोगासाठी दिल्लीपासून लढा देणारे कार्यकर्ते संघटक या भागात आजही आहेत.परंतु त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही त्यामुळे समन्वय साधून दरी दूर करण्याचे आवाहन करीत.ओबीसींनी आपल्या सवैधानिक अधिकारासाठी लढण्यास सज्ज होण्याची हीच खरी वेळ आहे.विशेष करुन मंडल आयोगाच्यावेळी ज्या आमदार खासदारांनी साथ द्यायला हवी होती परंतु त्यांनी त्यावेळी दिली नाही कारण त्याना कळले नाही.पण आज आपल्यासोबत सर्वच आजी माजी खासदार आमदार बसून लढण्यासाठी सज्ज झाले आहेत ही खरी ओबीसी संघटनेच्या बळकटीचे यश असल्याचे म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. हितेंद्र धोटे तर आभार प्रा. डॉ. रवींद्र विखार यांनी केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.दिगंब पारधी,मोहन जगनाडे,प्रा.शेषराव येलेकर, डॉ. गहाणे, प्राचार्य डॉ.लांजेवार, गिरीधर लडके, सुजीत खोजरे,राकेश तलमले,रवि पिसे,विलास लेगनुरे,मंगेश ठाकुर,वामनराव वझाडे, पंकज बंदेवार, कुथे, जगदिश मेहेर, प्रा. धनराज खनोरकर, डॉ. युवराज मेश्राम, डॉ. हजारे, अरविंद चुनारकर, ठाकरे आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...