Monday 17 October 2016

पत्रकारांची संख्या कमी असली तरी शक्ती मोठी- पालकमंत्री प्रवीण पोटे

अमरावती, दि.17: पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता यात कालांतराने बदल होत आहे. जरी या क्षेत्रात पत्रकारांची संख्या कमी असली तरी माध्यमांची शक्ती मोठी आहे. त्यामुळे शासन अशा शक्तीचा आदर करुन पत्रकारांना कायदयाच्या चाकोरीत बसवून त्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करीत आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी केले.
येथील संत गाडगेबाबा अमरावती विदयापिठाच्या डॉ. के.जी. देशमुख सभागृहात ऑल जर्नालिस्ट फ्रेन्डस सर्कलचे राष्ट्रीय पत्रकार सम्मेलनाचे उद्घाटन ना.पोटे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. आ.डॉ.अनिल बोंडे, अमरावती मंडलचे संपादक अनिल अग्रवाल, संत गाडगेबाबा अमरावती विदयापिठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, अध्यक्ष यासिन पटेल, गणेश कोळी, श्याम जांभोलीकर, एम.डी.चव्हाण, संदीप बाजड, शरद मेहरे, विजय खवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले की, पत्रकार हा समाजाचे चित्र लोकांसमोर मांडत असतो. हे चित्र मांडतांना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.काहींना आपला जीव गमवावा लागतो. मधल्या काळात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच शासन पत्रकारांना अशा घटनांपासून संरक्षण मिळावे यासाठी कायदेशिरदृष्ट्या प्रयत्न करीत आहेत.
आ.डॉ.बोंडे म्हणाले की, पत्रकारांची लेखणी ही समाज परिवर्तनासाठी आहे. जे काम लोकप्रतिनिधी करु शकत नाही ते काम पत्रकारांच्या लेखणीतून साध्य होऊन समाजप्रबोधनाला चालना मिळते. त्यामुळेच पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कायदा तयार करणे गरजेचे आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय पत्रकार संम्मेलनाच्या माध्यमातून आपले विचार मांडले. अमरावती मंडलचे संपादक अनिल अग्रवाल यांचा पॉवर ऑफ मिडीया पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शरद मेहेरे यांनी तर समारंभाचे संचालन अमोल खोडे यांनी केले. यावेळी विविध जिल्ह्यातील पत्रकार बंधू उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...