Tuesday 18 October 2016

रहांगडाले यांच्या प्रयत्नाने पाच रुग्णांना अर्थसहाय्य

तिरोडा : आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री अर्थसहाय्य निधीतून विधानसभा क्षेत्रातील पाच रुग्णांना उपचारासाठी अर्थसहाय्य मिळाले आहे.
चंपाबाई दशरथ दमाहे यांच्या वैद्यकीय उपचाराकरिता ६२५00 रुपये, नव्या डिलीराम डोबनेऊके यांच्या वैद्यकीय उपचाराकरिता १लक्ष रुपये, रामजी संतोषकुमार असाटी यांच्या ओठाच्या सर्जरीकरिता ३0 हजार रुपये, होमराज कोठूजी तिडके यांच्या हृदय शस्त्रक्रियेकरिता ५0 हजार रुपये व संदीप डोंगरे यांच्या चेहर्‍याच्या सर्जरीकरिता ५0 हजार रुपयांची मदत मिळवून दिली.
क्षेत्रातील गरजवंत नागरिकांनीारुग्णांच्या वैद्यकीय उपचाराकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी आपण सदैव तत्पर असून या योजनेचा लाभ घेण्याकरिता तसेच संपूर्ण माहिती मिळवून घेण्याकरिता जनसंपर्क कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क करण्याचे आवाहन आमदार रहांगडाले यांनी केले आहे. .

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...