Tuesday 18 October 2016

22 आक्टोेंबरला ब्रम्हपुरी येथे ओबीसी संघटनेची बैठक

ब्रम्हपुरी,दि,18- राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी कृती समिती व ओबीसी संघटनेच्या वतीने दिनांक 22 ऑक्टोबर २०१६ शनिवारला दुपारी 2 वाजता नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपूरी,जि.चन्द्रपूर येथे बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकित १) ओबीसी समाजाची जात निहाय आकडेवारी जाहीर करून केंद्रात व राज्यात ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणे २) ओबीसी विद्यार्थाना १००% शिष्यवृत्ती देण्यात यावी. ३) प्रत्येक जिल्हात विध्यार्थ्यासाठी वसतिगृह सुरु करण्यात यावे. ४) क्रिमीलेअरची अट रद्द करणे.५) खा.नच्चीपण कमिशन लागू करणे. ६)मंडल आयोग लागू करणे. ७) स्वामिनाथन आयोग लागू करणे. व इतर मागण्या घेऊन, हिवाळी अधिवेशनावर होणार्या ८ डिसेंबरला २०१६ महामोर्च्याचे आयोजनावर चर्चा होणार आहे. तरी या आंदोलनाला ओबीसी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर,मान्यवर लोकप्रतिनिधीची आंदोलनाला आपल्या पाठीब्याची गरज आहे. करिता आपणास विनंती करण्यात येत आहे कि, आपण सदर बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन द्यावे, सूचना कराव्या करिता आपणास आमंत्रित करण्यात येत आहे.
या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य डाॅ.बबनराव तायडावे,राजकीय पक्ष समन्वयक माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,खासदार नाना पटोले,आमदार विजय वड्डेटीवार,माजी आमदार सेवक वाघाये,माजी आमदार सुदर्शन निमकर,सचिन राजुरकर,प्रा.शेषराव येलेकर,प्रा.रमेश पिसे,मनोज चव्हाण,शरद वानखेडे,जिवन लंजे,खेमेंद्र कटरे,सुषमा भड,गुणेश्वर आरीकर,विजय तपाडकर,बबलू कटरे,महेंद्र निंबार्ते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या बैठकीला ओबीसी जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक प्रा.डी.एस.कोकोडे,गोविंद भेडांरकर,प्रा.नामदेवराव जेंगठे, प्रा.शाम झाडे.प्रा.हितेंद्र धोटे,प्रा.दिंगबर पारधी,प्राचार्य राकेश तलमले,विलास लेनगुरे,मंगेश ठाकुर,प्रा.लडके,वामनराव वझाडे,रवी पिसे आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...