Monday 17 October 2016

समाजाच्या प्रगतीसाठी संघटित होणे गरजेचे-डॉ. भांडारकर



जैनकलार समाजाची कोजागरी उत्साहात

देवरी,(ता.१७)- आपल्या समाजाची संस्कृती जपणे, ही प्रत्येक समाजघटकांची जबाबदारी आहे. आधुनिक युगात वावरताना आपल्या संस्कृतीचा ठेवा नव्या पिढीकडे सोपविण्याची जबाबदारी ही ज्येष्ठांकडे आहे. त्यासाठी समाजाचे स्नेहसंमेलन होणे आवश्यक असते. जेव्हा समाज एकत्र येतो, तेव्हा विचारांचे आदानप्रदान होते आणि एक दुसèयाच्या अडचणी, सुख-दुःखाची जाणीव होते. त्यातून मार्गदेखील सुचतात. त्यातूनच समाजापुढे असलेल्या अडचणी सोडविण्याचे प्रयत्न यशस्वी होतात. अशा आयोजनाच्या माध्यमातून समाजप्रगतीच्या वाटा देखील मोकळ्या होतात. आपल्या समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर प्रत्येकाने संघटित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन देवरीच्या मनोहरभाई पटेल महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुधीर भांडारकर यांनी केले.
ते काल रविवारी(ता.१६) स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूलच्या प्रांगणात आयोजित जैन कलार समाज मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कोजागरी कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी हेमचंद रामटेककर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. सुधीर भांडारकर, आत्माराम रणदिवे, देवरीचे नगरसेवक प्रवीण दहिकर, रामेश्वर मुरकुटे, दिलीप दुरुगकर,सुशील शेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सृष्टी भदाडे आणि गुंजन भांडारकर यांनी नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाचे संचलन जागेश्वर ठवरे यांनी केले. उपस्थितांचे आभार सचिन भांडारकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरेश भदाडे, संदीप तिडके, प्रा. मधुकर शेंद्रे, गौरीशंकर दहिकर, दिगंबर मुरकुटे, दिवाकर शेंद्रे आदींनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...