Friday 21 October 2016

हातपंप अस्थायी कर्मचाèयांच्या समस्या मांडल्या मंत्रालयात

युवा स्वाभिमानचे जितेश राणे यांचा पुढाकार : कर्मचाèयांनी केले होते उपोषण

गोंदिया,दि.२१ : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर असणाèया हातपंपाच्या दुरुस्तीकरिता अस्थायी कर्मचाèयांची नियुक्ती केली जाते. मागील अनेक वर्षापासून या कर्मचाèयांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यांच्या या समस्या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासमोर मांडण्यात आल्या. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार रवी राणा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी कर्मचाèयांच्या समस्याबाबत पुढाकार घेऊन पाठपुरावा चालविला होता.
अनेक वर्षांपासून महत्वपूर्ण सेवेत असूनही हातपंप कर्मचाèयांचे पगार व अन्य सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष कायम होते. तसेच स्थानिक यंत्रणेसोबत अनेक वर्ष काम करुनही या कर्मचाèयांना कुठलीही स्थायी सेवेचे आदेश देण्यात आलेले नाही. या मागण्यांसाठी कर्मचाèयांनी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. परंतु या उपोषणाकडे सुद्धा दुर्लक्ष झाल्याने युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, शरणागत, रहांगडाले आदींनी जिल्हाधिकाèयांकडे या कर्मचाèयांची व्यथा मांडली होती. याच प्रश्नाला घेऊन जितेश राणे यांनी मुंबई येथे पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांची भेट घेऊन जिल्ह्यातील या कर्मचाèयांच्या व्यथा मांडल्या. या संदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन हा निर्णय संपूर्ण राज्यात लागू करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी लोणीकर यांनी आमदार रवी राणा, जितेश राणे, शेखर बिसेन यांना दिले. युवा स्वाभिमानच्या या पुढाकारामुळे कर्‘चाèयांत आनंद व्यक्त केला जात आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...