Tuesday 18 October 2016

ओबीसी आरक्षणासाठी लोधी समाज एकवटला

सालेकसा : लोधी समाजाला केंद्र शासनाच्या ओबीसींच्या आरक्षण यादीत समाविष्ठ करण्यात यावे, या अनेक वर्षांपासूनच्या मागणीसह लोधी समाजाचे आदरस्थान असलेल्या राणी अवंतीबाई यांच्या इतिहासाला महाराष्ट्राच्या बालभारती पाठय़पुस्तकात समाविष्ठ करावे, तसेच राणी अवंतीबाई लोधी जयंतीचा कार्यक्रम शासनस्तरावर साजरा करण्यासाठी त्या दिवशी सरकारी सुटी घोषित व्हावी, अशा प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (दि.१७) जिल्ह्यातील लोधी समाज सालेकसात एकवटला. यावेळी भव्य मोर्चाने तहसील कार्यालयावर नेऊन मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
या मोर्चात लोधी समाजाचे महिला-पुरूष, युवा वर्ग आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान शहरात रॅली काढून जय लोधेश्‍वर, जय अवंतीच्या जयघोषाने संपूर्ण सालेकसा परिसर दणाणून सोडला.
लोधी समाज संघर्ष समिती सालेकसा तालुक्याच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व माजी आ. भेरसिंह नागपुरे, कुंदन कटारे, अँड.येशुलाल पालेवार, यादवलाल बनोठे आदींनी केले. मोर्चाचे संयोजक लक्ष्मण नागपुरे यांच्यासह बाबा लिल्हारे, राजीव ठकरेले, हेमराज सुलाखे, कारेलाल नागपुरे, बद्रीप्रसाद दसरिया आदींनी मोर्चाची धुरा सांभाळली.
भरतभाऊ बहेकार यांच्या वाड्यासमोर सर्व लोधी समाजबांधव एकत्रित आले. तेथून मोर्चाला सुरूवात झाली. हा मोर्चा शिस्तबद्धरित्या बस थांबा, पंचायत समिती चौक, को-ऑपरेटीव्ह बँक चौक, वनविभाग चौकातून मार्गक्रमण करीत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात धडकला.हजारोच्या संख्येत लोधी समाजबांधव एकत्रित झाल्याने सालेकसावासीयांसाठी हा मोर्चा कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवेंद्र मच्छिरके यांनी मांडले व मोच्र्याच्या आयोजनाबद्दल सविस्तर माहिती सादर केली. मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवराम सव्वालाखे, अरूण गिरीया, लेखसिंग मस्करे, ज्ञानी दमाहे, भिवराम दमाहे, शंकर नागपुरे, शिव नागपुरे, नंदकिशोर बिरणवार, मनोज दमाहे, अशोक दमाहे, अशोक नागपुरे, गजानन मोहारे, ओमप्रकाश लिल्हारे, राजकुमार दमाहे, जितेंद्र लिल्हारे, आर.एम.दमाहे, कैलाश दसरिया, पुस्तकला दमाहे, वर्षा लिल्हारे, सुषमा लिल्हारे, ललीत लिल्हारे, राजकुमार बसोने आदीनी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...