Monday 24 October 2016

८ डिसेंबरच्या ओबीसी महामोर्चात सहभागी व्हा-प्राचार्य तायवाडे

ओबीसी महामोच्र्यासाठी आ.वड्डेटीवारांनी दिल्या १०० गाड्या
ब्रह्मपुरी दि. २४ : आपल्या ओबीसी बांधव अनीक न्यायहक्कापासून वंचित आहे. आम्ही चळवळ चालवतो पण परिवर्तन आवश्यक आहे यासाठी बंधूनो जागृत व्हा आणि ८ डिसेंबरला नागपूरच्या विधानभवनावर निघणाèया महामोर्चात मोठया संख्येने शामील व्हा असे आवाहन ब्रह्मपुरीच्या विठ्ठल समिती सभागृहात आयोजित सभेत राष्ट्रीय ओबीसी महासंघानेचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी केले.
ब्रह्मपुरी तालुका ओबीसी संघटनेच्यावतीने नियोजन मार्गदर्शन सभा पार पडली. विचारपीठावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, आ. विजय वडेट्टीवार,माजी आ. सेवक वाघाये,संदीप गड्डमवार,सचिन राजुरकर,खेमेंद्र कटरे,मनोज चव्हाण,श्रीराम लांजेवार, बबनराव फंड,सुषमा भड, माजी आमदार उद्धवराव सिंगाडे, प्राचार्य डॉ.एल.एस. कोकोडे, प्रा.नामदेव जेंगठे,अनिता ठेंगडी,जिवन लंजे,पाडुंरग काकडे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना तायवाडे म्हणाले की आम्ही कुणाचे मोर्चे बघून अधिवेशनावर मोर्चा काढत नाही तर आमच्या मोच्र्याची घोषणा ही मे महिन्यातच सर्वात आधी करण्यात आली आहे.त्यातच आपल्या सवैधानिक अधिकारासाठी आम्ही संघटित होत आहोत.
याप्रसंगी माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे म्हणाले की राज्यघटनेने आम्हाला ३४० व्या कलमात अधिकार दिले आहेत.ते अधिकार मिळवून घेण्यासाठी आम्ही सर्व राजकीय मतभेद विसरुन या गैरराजकीय समाजसंघटनेत काम करीत आहोत.आम्ही कुणाच्या विरोधात लढा देत नसून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवलेला अधिकार सरकारने द्यावा यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ लढा देत आहे.मंडल आयोगाच्यापुर्वी कुणालाही ओबीसी शब्द माहित नव्हता आत्ता होत असून समाज जागृत आहे.आम्हाला जेव्हा आरक्षण लागू करण्यात आले त्यात कुठेही क्रिमीलयरची अट नाही.तसेच एस.सी., एस.टी.ला ही क्रिमिलेअर नाही.पण काही तथाकथीतांनी न्यायालयाच्या माध्यमातून आमच्यावर क्रिमीलयरची अट लादली आहे ती रद्द करण्यासाठी व आपला स्वतंत्र मंत्रालय व जातगणना व्हावी यासाठी ओबीसींनीही आपली ताकद दाखवावी लागणार आहे.सोबतच धान,कापूस,ज्वारी उत्पादक शेतकरी यांच्यावर सातत्याने अन्याय झाला असून त्यांच्या समस्यांनाही आपण या माध्यमातून सरकारपुढे मांडणार असल्याचे सांगितले. आ. वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी नेतृत्व मोठे आहे. दुसèयांना पाहावत नाही.आज उच्चवर्णीयांच्या हजारो कंपन्यामध्ये कोट्यावधीचा घोटाळा होतो परंतु ते तुरुंगात जात नाही परंतु एखाद्या ओबीसी बहुजनातील नेत्याने दोनचार कंपन्या उघडून पैसा कमावला तर त्याला भ्रष्टाचारी म्हणून तुरुगात टाकले जाते इथपासून आमच्या समाजाला तोडण्याचे काम सुरु झाले आहे.आजपर्यत काँग्रेसने ओबीसीला हिणवले आत्ता सत्तेत आलेल्या पक्षानेही हिनवने सुरु केले आहे.कुठलाही पक्ष हा ओबीसीच्या हिताचा विचार न करता विरोधातच राहिला फक्त आम्हाला त्यांनी वापरुन घेतले आहे आता मात्र आपण सर्वांनी राजकीय जोडे बाहेर ठेवून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून आयोजित मोच्र्याला यशस्वी करावे असे आवाहन करीत आपल्या मतदारसंघात मी या महामोर्चासाठी १०० गाड्या उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. प्रा. जेंगठें यांनी ओबीसी संघटनेच्या सुरवातीपासूनची माहिती देत आयएएस ओबीसी मुलावर झालेल्या अन्यासाठी सुध्दा लढा दिल्याचे सांगत ज्या मराठ्यानी मंडलच्यावेळी ओबीसींचा विरोध केला तेच आज ओबीसीमध्ये कसे आरक्षण मागत आहेत असा प्रश्न उपस्थित करुन ओबीसींना जागृत होण्याची आवश्यकता असल्याचे म्हणाले.सुषमा भड यांनी २७ नोव्हेंबरला आयोजित महिला अधिवेनात या भागातून हजारोच्या संख्येने महिलांना सहभागी करुन घेण्याचे आवाहन करीत या निमित्ताने निघणाèया स्मरणिकेसाठी महिलांनी लेख,कविता आदी पाठवावे असे आवाहन केले.माजी आमदार सेवक वाघाये यानीही विचार व्यक्त केले.यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रा.श्याम झाडे यांनी गेल्या ३० वर्षापासून ब्रम्हपूरी भागात सुरु असलेल्या ओबीसी संघटनेच्या कार्याचा आढावा देत मंडल आयोगासाठी दिल्लीपासून लढा देणारे कार्यकर्ते संघटक या भागात आजही आहेत.परंतु त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही त्यामुळे समन्वय साधून दरी दूर करण्याचे आवाहन करीत.ओबीसींनी आपल्या सवैधानिक अधिकारासाठी लढण्यास सज्ज होण्याची हीच खरी वेळ आहे.विशेष करुन मंडल आयोगाच्यावेळी ज्या आमदार खासदारांनी साथ द्यायला हवी होती परंतु त्यांनी त्यावेळी दिली नाही कारण त्याना कळले नाही.पण आज आपल्यासोबत सर्वच आजी माजी खासदार आमदार बसून लढण्यासाठी सज्ज झाले आहेत ही खरी ओबीसी संघटनेच्या बळकटीचे यश असल्याचे म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. हितेंद्र धोटे तर आभार प्रा. डॉ. रवींद्र विखार यांनी केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.दिगंब पारधी,मोहन जगनाडे,प्रा.शेषराव येलेकर, डॉ. गहाणे, प्राचार्य डॉ.लांजेवार, गिरीधर लडके, सुजीत खोजरे,राकेश तलमले,रवि पिसे,विलास लेगनुरे,मंगेश ठाकुर,वामनराव वझाडे, पंकज बंदेवार, कुथे, जगदिश मेहेर, प्रा. धनराज खनोरकर, डॉ. युवराज मेश्राम, डॉ. हजारे, अरविंद चुनारकर, ठाकरे आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...