Tuesday, 18 October 2016

14 भ्रष्टाचारी मंत्री घेऊन सरकार चालवताय मुख्यमंत्री, काँग्रेसची टीका

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली आहे. 14 भ्रष्ट्राचारी मंत्र्याना घेऊन फडणवीस सरकार चालवत असल्याचा घणाघाती आरोप देखील नारायण राणे यांनी यावेळी केला आहे. राणे यांनी मुंबईत मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यासह भाजपवर हल्लाबोल केला.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने कोर्टात वेळ मागितला आहे. मात्र, मुख्यमंत्री म्हणाले की, वेळ मागितला नाही. पण कोर्टाच्या आदेशाच्या प्रतींवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलत असल्याचे स्पष्‍ट झाले आहे. त्यामुळे खोटं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राणे यांनी केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...