Thursday 20 October 2016

वन व पर्यावरण जागृती कार्यक्रम नागझिरा-नवेगाव बफर झोनमध्ये

गोंदिया दि.20: भारतीय वन्यजीन न्यास गोरेगावतर्फे वन व पर्यावरण जागृती कार्यक्रम नागझिरा-नवेगाव बफर झोनमध्ये घेण्यात आले. ३२ गावांमध्ये घेण्यात आलेल्या सदर कार्यक्रमात २७ शाळांमधील दोन हजार ४३१ विद्यार्थी सहभागी झाले होते.
या वेळी विद्यार्थी व शिक्षकांना वाघावर आधारित लघू चित्रपट दाखविण्यात आले. यानंतर सदर चित्रपटावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. योग्य उत्तर देणार्‍या विद्यार्थ्यांना भारतीय वन्यजीव न्यास व गोरेगाव वन परिक्षेत्रातर्फे बक्षीस देण्यात आले. नऊ गावांमध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात १0९ जणींनी सहभाग घेतला. रांगोळी स्पर्धा असणार्‍या गावांना प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस भारतीय वन्यजीव न्यासतर्फे देण्यात आले. ग्रामस्थांना वनजोडणी व वृक्षारोपण दिन यावर लघू चित्रपट दाखविण्यात आले. वन व्यवस्थापन समिती कशाप्रकारे हाजलाफॉल येथे काम करते, हे एका लघू चित्रपटाद्वारे दाखविण्यात आले.
कार्यक्रमात गोरेगावचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.एम. जाधव, क्षेत्र सहायक डी.एम. शेंडे, भगत, ओ.व्ही.आग्रे, वनरक्षक देवेंद्र तुरकर, बचपेले, व्ही.आर. आडे, टी.आर. हटवार, जी.एस. पटले, एल.आर.लिल्हारे, एस.एम. मडावी, वनपाल आडे, वनपाल काईट, तेजस्विनी राठोड, छाया बोपचे, पं.स. उपसभापती देवेंद्र बिसेन, प्राचार्य डॉ.एन.वाय.लंजे, प्राचार्य पी.एल. पंचभाई, प्राचार्य रंजितकुमार डे, पं.स. सदस्य अल्का काटेवार, पोलीस पाटील हेमराज भगत उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...