Friday 14 October 2016

देवरी येथे जैनकलार समाजाची कोजागरी रविवारी


देवरी- स्थानिक जैनकलार समाज मंडळाच्या वतीने येत्या रविवारी (ता.१६) कोजागरीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रसिद्धीसाठी दिलेल्या माहितीनुसार, देवरी येथील जैनकलार समाज मंडळाच्या वतीने कोजागरीच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी दिलीप दुरुगकर, आमगावरोड यांच्या निवासस्थानी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जैनकलार समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. समाज संघटनेच्या दृष्टीने देवरी तालुक्यातील हे पहिलेच आयोजन असल्याने सर्व समाजबांधवांनी सुशील शेंद्रे, डॉ. सुधीर भांडारकर, दिलीप दुरुगकर, सुरेश भदाडे, गौरीशंकर दहिकर, ठवरे सर आदी समाजकार्यकर्त्यांशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...