Tuesday 25 October 2016

शहिद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सव्वाशे कोटी भारतीय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 25 : देशाच्या सीमेवर अहोरात्र लढताना शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी देशातील सव्वाशे कोटी जनता खंबीरपणे
उभी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे उरी येथील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचा कार्यक्रम फोर्ट येथील
बँकेच्या मुख्यालयातील वसंतदादा पाटील सभागृहात झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख,
राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार आशिष शेलार, बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर, सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले की, अतिशय खडतर परिस्थितीत सीमेवर देशाच्या सैन्यातील जवान हे देशाच्या व नागरिकांच्या रक्षणासाठी सतत कार्यरत
असतात. त्यामुळे देश प्रगती करत असतो. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात प्रचंड संतापाची लाट पसरली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी शांततेची भूमिका घेतली. मात्र कोणी आपल्या देशावर हल्ला केला तर त्याला त्याच प्रकारे उत्तर देण्याची तयारी ही देशाने ठेवली. त्यानंतर
आपल्या सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करुन आपली कोणतीही हानी न होता हल्ला यशस्वी केला. जगात पाकिस्तानला एकाकी पाडण्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र
मोदी यशस्वी झाले असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी उरी येथील दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवानांच्या कुटुंबियांना मदतीच्या धनादेशाचे वाटप मुख्यमंत्री श्री. फडणवीस, सहकार मंत्री देशमुख,
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्तेकरण्यात आले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...