Friday 21 October 2016

पोलीस शहिद दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे शहिदांना अभिवादन

मुंबई, दि. 21 : पोलीस शहिद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पचक्र वाहून शहिदांना अभिवादन केले.
नायगावच्या पोलीस मुख्यालयातील मैदानात झालेल्या हुतात्मा दिन मानवंदना व संचलन कार्यक्रमाला राज्यमंत्री दीपक केसरकर, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अनेक मान्यवर
उपस्थित होते.
          कर्तव्यावर असताना हौतात्म्य आलेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्मरण दरवर्षी 21 ऑक्‍टोबर रोजी करण्यात येते. या हुतात्मा दिनाच्या निमित्ताने 1 सप्टेंबर 2015 ते 31 ऑगस्ट 2016 दरम्यान वीरमरण आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतींना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्मरण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शहिदांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...