Monday 17 October 2016

निर्माल्य विसर्जन करताना तरुणाचा बुडून मृत्यू

तिरोडा,दि.17- : दुर्गाविसर्जन कार्यक्रमातील हवन कुंडात असणारी विभूती विसर्जनासाठी आलेल्या तरुणाचा चांदपूर जलाशयाचे टाकीत आंघोळ करित असतांना शनिवारी  बुडून मृत्यू झाला. यात अन्य तीन तरुण समयसुचकतेने थोडक्यात बचावले. अश्‍विन टेंभरे (२१) रा. खैरबोडी ता. तिरोडा जि. गोंदिया असे मृत तरुणाचे नाव आहे.
दुर्गा विसर्जन कार्यक्रमात हवन कुंडात असणारी विभूती विसर्जनासाठी खैरबोडी येथील २५ ते ३0 तरुण वाहनाने ग्रिन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळी आले. काल शनिवारी त्यांनी चांदपूर जलाशय शेजारी स्वयंपाक करण्याचे आयोजन केले. सध्या परिसरात पानी वाटप सुरु असल्याने जलाशयाचे दरवाजा उघडण्यात आला आहे. यामुळे दरवाजा नजिक पाण्याचा प्रवाह असणारा वेग अधिक आहे. याच पाण्याचे प्रवाह भाविक आंघोडी करिता ८ ते १0 तरुण पाण्यात उतरले. तर अन्य तरुण स्वयंपाकात व्यस्त होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास आंघोळ करित असतांना अश्‍विन टेंभरे हा तरुण पाण्याच्या अधिक प्रवाहात वाहून गेला. तर अन्य तीन तरुणाने संतुलन बिघडल्याने काहिंनी त्यांना मदतीचा हात दिला. यात सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. अश्‍विन पाण्याच्या प्रवाहात बुडत असल्याचे दिसताना या तरुणांनी आरडाओरड केला. यामुळे अनेक जण मदतीला धवून गेले. पंरतु टाकीत पाणी अधिक असल्याने तरुणाला वाचविण्याची मदत प्रभावित झाली. या टाकीत जुनी लाडे असून टाकीची निर्मीती ब्रिटीश कालीन असल्याने या टाकीचा अंदाज नाही. यामुळे अश्‍वीनचा मृतदेह शोधण्यासाठी पाटबंधारे विभागाने सहकार्य घेण्यात आले. जलाशयाचा मुख्य दरवाजा बंद करुन पाण्याचा प्रवाह थांबविण्यात आला. यानंतर अश्‍विनचा मृतदेह टाकीत अडकला असल्याचे दिसून आला. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...