Monday 17 October 2016

नोंदणीकृत संस्थेमध्ये ६.६७ लाखांची अफरातफर

भंडारा,दि.17 : विविध कार्यकारी सेवा संस्थांतर्गत चार नोंदणीकृत संस्थेमध्ये ६.६७ लाखांची अफरातफर केल्याचे प्रकरण उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हा विशेष लेखा परिक्षक व निबंधक सहकारी संस्था यांच्या लेखी तक्रारीवरुन गटसचिव उमेश सदाशिव लंजे याच्या विरुध्द साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ एप्रिल २0११ ते ३१ मार्च २0१२ या कालावधीत गटसचिव पदावर असलेल्या उमेश लंजे यांनी सरकारी संस्थांतर्गत येत असलेल्या रेंगेपार, सातलवाडा, मोखे व किन्ही येथील विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये उपरोक्त रकमेची अफरातफर केली. नियमाला डावलून हेतुपुरस्सर विश्‍वासघात केल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले.
या संदर्भात चारही संस्थामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची वा अफरातफरीची लेखी तक्रार सहायक निबंधक सहकारी संस्था साकोली व जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग१ सहकारी संस्था भंडारा यांच्याकडे रामभाऊ कारेमोरे रा. साकोली यांनी केली होती. सहकारी संस्थेच्या अहवालावरुन उमेश लंजे याने चारही संस्थांमधून ६ लक्ष ६७ हजार ४९५ रुपयांची अफरातफर केल्याची लेखी तक्रार साकोली पोलीस ठाण्यात करण्यात आली. यामध्ये रेंगेपार संस्थेतून १ लक्ष १३ हजार २६0 रूपये, सातलवाडा येथील संस्थेतून २ लक्ष ५२ हजार ८५८ रूपये, किन्ही यथील संस्थेतून २ लक्ष ५६ हजार ८६८ तर मोखे येथील संस्थेतून ४४ हजार ५0९ रूपयांची अफरातफर केल्याचे उघडकीला आले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...