Monday 24 October 2016

खड्डा दाखवाः बक्षिष मिळवा

मुंबई : येत्या १५ डिसेंबरनंतर राज्यातील सर्व रस्ते हे खड्डेमुक्त करू. ‘एक खड्डा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा,’ असे सरकारचे आव्हान असेल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, बांधकाम खात्याच्या अखत्यारित ८६ हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यातील १५ हजार किमीचे रस्ते आता राष्ट्रीय महामार्गाचा भाग बनणार आहेत. उर्वरित रस्त्यांवरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविण्यात येतील.
बांधकाम खात्याच्या अखत्यारितील रस्ते बांधताना कंत्राटदाराला दोन वर्षांत कामे पूर्ण करावी लागतील. त्या पोटी दोन वर्षांनंतर त्यांना ४० टक्के पैसा दिला जाईल. उर्वरित ६० टक्के पैसा हा त्यानंतरच्या आठ वर्षांनी दिला जाईल. या ‘अ‍ॅन्युइटी’ योजनेमुळे रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारीदेखील निश्चित होईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...