Friday 21 October 2016

सिरी सिध्दार्थ गौतम चित्रपटाचे नायक गगण मलिक व नायिका अंशू मलिकने साधला गोंदियात सवांद

गोंदिया दि.21: बॉलीवूड आणि सोनी, झीटिवी, स्टारप्लस, कलर्स टिव्ही आणि स्टार वन या हिंदी टिव्ही मालिकेत रामायण तसेच संकटमोचन महाबली मालिकेतील तसेच सिरी सिध्दार्थ गौतम चित्रपटातील गौतमाची भूमिका करणारा बॉलीवूड अभिनेता गगण मलीक यांनी आज गोंदियात  सिरी सिध्दार्थ गौतम या चित्रपटाच्या प्रोमोच्या निमित्ताने पत्रकारांशी सवांद साधताना चित्रपटात काम करतांना आपणास खुप काही शिकण्यास मिळाल्याचे सांगितले. यावेळी अभिनेत्री अंशु मलिक, प्रस्तूतकर्ता नितीन गजभिये, प्रशांत गजभिये, धनंजय वैद्य,वसंत गणवीर,मोहिनी निंबार्ते आदी उपस्थित होते.
श्रीलंका, चीन, जपान, थायलँड, उत्तर कोरीया, व्हिएतनाम आदी देशांमध्ये विश्वशांतीचा संदेश देणाNया तथागत गौतम बुध्दाचे वास्तव जगासमोर आलेले नाही. धम्मचक्र प्रवर्तनदिन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून सिरी सिध्दार्थ गौतम हा चित्रपट महाराष्ट्रात १४ ऑक्टोबरपासून प्रदर्शीत करण्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले.हा चित्रपट तयार करण्यासाठी सुमारे 12 कोटी खर्च आला असून भविष्यात गौतम बुध्द आणि बुध्द धम्म जिंवत ठेवण्यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्यावर दोन वेगवेगळे चित्रपट निर्माण करण्याची संकल्पना असल्याचे सांगितले.बौध्द राष्ट्रात गाजलेला व आठ पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या सिरी सिध्दार्थ गौतम या चित्रपटातून मिळणारे उत्पन्न लोकांच्या कल्याणासाठी दिला जाईल असे अभिनेता गगण मलिक यांनी  सांगितले.
अभिनेता गगण मलिक यांनी अनेक चित्रपटात काम केले. तसेच झी टिव्हीवरील रामायण’ साथसाथ बनायेंगे अभियान’ सोनी टिव्हीवरील ‘संकटमोचन महाबली हनुमान’ या मालिकेत श्रीराम, क्रिष्णा, विष्णुची भूमिका केली. स्टार वन टिव्हीवर ‘सवुंâतला’ मालिकेत ‘सेनापती वीरची’ भूमिका केलेली आहे. तसेच स्टार प्लस टिव्हीवर ‘कुमकुम’ कलर्स टिव्हीवर ‘रिस्तो से बडी प्रथा’ अशा अनेक मालिकेत व चित्रपटात काम केले आहे.
सिरी सिध्दार्थ गौतम या चित्रपटात अभिनेता गगण मलिक यांनी युवराज सिध्दार्थ गौतमाची भूमिका व'विली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण श्रीलंकेत झाले असून सिंहली भाषेत तयार करण्यात आला. या चित्रपटाचे हिंदी भाषेत डफ करण्यात आले असून महाराष्ट्रात १४ ऑक्टोबर पासून प्रदर्शीत झालेला आहे. इतर देशात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. युनायटेड नेशनच्या जागतीक बुध्दीष्ट फिल्म फेस्टीवलमध्ये पाच तर दिल्ली इंटरनॅश्नल फिल्म फेस्टीवलमध्ये तीन अशा आठ पुरस्कारानी गौरविण्यात आले आहे.अंशुल मलिक यांनी महामायाची भूमिका पार पाडतांना आपणास वेगळाच एक अनुभव आल्याचे सांगत पांढरा हत्ती आणि कमळाचा फुलाचा एक प्रसंग त्यांनी सांगितला.तसेच श्रीलकंन भाषेत काम करतांना काही दिवस अडचण गेल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...