Tuesday 18 October 2016

कोपर्डी प्रकरण : सुनावणी सुरु

अहमदनगर,दि.18 : कोपर्डी बलात्कार प्रकरणावर आजपासून अहमदनगर सत्र न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. या प्रकरणात जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर बलात्कार आणि हत्येचा आरोप आहे. या तिन्ही संशयित आरोपींना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
संतोष भवाळ आणि जितेंद्र शिंदे या दोन संशयित आरोपींनी सरकारी वकिलांची मागणी केली. त्यामुळे या प्रकरणाची उर्वरित सुनावणी उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. तर नितीन भैलुमे या संशयित आरोपीने जामीन मिळावा, तसेच खटल्यातून मुक्त करावं, यासाठी वकिलामार्फत अर्ज केला आहे. त्यावर पुरावा आणि साक्षीदाराची माहिती घेऊन उद्या सुनावणी होणार आहे.
कोपर्डी प्रकरणाचा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याची सरकारने सूचना दिली आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...