अर्जुनी/मोरगाव:- येथील मागास वर्गीय मुलींचे शासकिय वस्तीगृहात पालक सभा सुरू करतांना अचानकपणे जिल्ह्यांचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी भेट दिल्याने सारेच अवाक राहिले. पालकमंत्री भेटीला आल्याचे बघून विद्यार्थ्यानींना आनंद झाला. यावेळी उपस्थित पालकांशी ना. बडोलेंनी संवाद साथला. मार्गदर्शनातून मागासवर्गिय विद्यार्थी हे शिक्षणात कुठेही कमी नाहीत. ते शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून तालूकास्तरावर मुला मुलींचे वस्तीगृह स्थापन करून प्रत्येकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य शासन करीत असल्याचे सांगितले. सामाजीक न्याय विभागामार्फत शिक्षणासाठी बहुउपयोगी योजनांची माहिती दिली. कुठलीही शैक्षणिक अडचण असल्यास आम्हाला कळवा. आम्ही ती जबाबदारीने पुर्ण करण्याचे आश्वासन यावेळी ना. बडोलेली उपस्थितांना दिले. संपूर्ण वस्तीगृहातील सोई सुवीधांची पाहणी बडोलेंनी केली. विद्यार्थीनींना नियमीत नास्ता, जेवण याची तपासणी केली. पहाणी अंती व्यवस्थापन गुणवत्ता पुर्ण असल्याचे समाधान बडोलेंली व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापीका सुनिता हुमे, हृपाल ए.पी. राठोड, ए.जी. बन्सोड, सि. एम. झोके, विलास रणदिवे, नानाजी दवळे, अर्चना नाकाडे, तसेच पालकवर्ग उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment