Wednesday 19 October 2016

मधुमेहावर मात करणे काळाची गरज-- डॉ.अंबुलकर

गोंदिया,दि.१९ : मधुमेह हा रोग जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात पाय पसरवित असून भारतात सुध्दा मधुमेह हा रोग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यावर रोजच्या आहारातून मानसिक विचारातून व रोज निदान एक तास पायदळ फिरण्यापासून मधुमेहावर मात करता येऊ शकतो. रुग्णांवर मी डायबेटीज रोगी आहे याचा बाहू न करता वैधकशास्त्रानी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन व कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता दैनंदिन क्रिया योग्य झाल्यास मधुमेह संपुष्ठात येणार नाही परंतू त्यावर नियंत्रण निश्चितपणे ठेवू शकतो. असे विचार नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे व्याख्याते डॉ.सुनिल अंबुलकर यांनी व्यक्त केले.
अधिकारी-कर्मचारी समन्वय समिती गोंदिया जिल्हा व पोलीस प्रशासन गोंदिया यांच्या वतीने आयोजित ‘मधुमेह मंत्र व तंत्रङ्क या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष व उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, तसेच समितीचे कार्याध्यक्ष डी.यु.रहांगडाले व सचिव दुलीचंद बुध्दे, तसेच गोंदियाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले यावेळी उपस्थित होते.
अधिकारी-कर्मचारी समन्वय समिती शासकीय सेवा व सामाजिक सेवा हे दोन्ही उपक्रम सोबतच राबवून चांगले कार्य करीत असून असे कामे करणारी समन्वय समिती महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात पाहायला मिळाले नसल्याचे डॉ.दिलीप पाटील-भुजबळ यांनी आपले विचार करतांना बोलत होते.
कार्यक्रमाला शहरातील गणमान्य व्यक्ती, अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. अनेकांनी मधुमेहाबाबत डॉ.अंबुलकरांना प्रश्न विचारुन मधुमेहाबाबत घ्यावयाची काळजी याबाबत पूर्णत: खात्री करुन घेतली. यावेळी गोंदिया जिल्हा अधिकारी-कर्मचारी समन्वय समिती व पोलीस प्रशासन वतीने डॉ.अंबुलकर यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाबाबतचे प्रास्ताविक समन्वय समितीचे सचिव दुलीचंद बुध्दे यांनी केले. संचालन इंजि.पायल बुध्दे यांनी तर आभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.संदिप पखाले यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...