Saturday 29 October 2016

नक्षल्यांचा ३ नोव्हेंबरला पाच राज्यांमध्ये बंद

गडचिरोली, : पाच दिवसांपूर्वी आंध्रप्रदेश-ओरिसा सीमेवर पोलिसांनी ३० नक्षल्यांना कंठस्नान घातल्याच्या निषेधार्थ माओवाद्यांनी ३ नोव्हेंबरला पाच राज्यांमध्ये बंद पुकारला आहे.
२४ ऑक्टोबरला ओरिसातील मलकानगिरी जिल्ह्यातील चित्रकोंडा येथे ग्रेहाऊंड कमांडोंशी झालेल्या चकमकीत २८ नक्षलवादी ठार झाले. त्यानंतर २७ ऑक्टोबरला पानस्पूत जंगलात आणखी दोन नक्षल्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. या घटनांच्या निषेधार्थ
माओवाद्यांच्या केंद्रिय समितीने ओरिसा, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये बंदचे आवाहन केले आहे. माओवाद्यांच्या पूर्व विभागाचा सचिव कैलास याने एक ऑडिओ टेप जारी करुन ३० नक्षल्यांच्या हत्येला ओरिसा व आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीका केली आहे, असे वृत्त ओडिशा सनटाईम्स या प्रादेशिक इंग्रजी ई-दैनिकाने दिले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...