Thursday 20 October 2016

वाघाच्या कातडी तस्करी प्रकरणातील आरोपींची कोठडीत रवानगी


देवरी(ता.२०)- गेल्या शनिवारी वन विभागाच्या देवरी दक्षिण वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सालईनजीक वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीला वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले होते. या प्रकरणातील तिघा आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून उर्वरित आठ आरोपींना वनकोठडी सुनावण्यात आली.
सविस्तर असे की. गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस व वनविभागाचे पथकाने वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली होती. यानंतर राबविलेल्या अटकसत्रामुळे आरोपींची संख्या ११ वर पोचली. या सर्वांना गेल्या मंगळवारी (ता.१८) ला न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. या सर्व आरोपींना आज गुरुवारपर्यंत (ता.२०) वनकोठडी सुनावण्यात आली होती. आज पुन्हा या सर्व आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता यातील आरोपी महेंद्र बिलाजी घमगाये, सुरेंद्र रामचंद्र शहारे आणि  विलास हरिदास बडोले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर आरोपींकडून आणखी तपास करण्यासाठी हेमंत भारत अरकरा, रामसाय सन्याराम मडावी, शिवराम सुंदर तुलावी, लोकेश कलिराम मुलेटी, दिनेश कुवरसिंग यादव, राजकुमार शत्रुघ्न मेश्राम, भावेश गणेश करमकर आणि सुरेंद्र रामचंद्र शहारे यांना वनकोठडी सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. प्रशांत संगीडवार यांनी तर आरोपींतर्फे अ‍ॅड. भूषण मस्करे, अ‍ॅड. भाजीपाले, अ‍ॅड. सचिन बावरिया यांनी बाजू मांडली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...