भंडारा,दि.20 : कायम शब्द वगळलेल्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ माध्यमिक विभाग,
तुकड्या, विषय यांचा कायम शब्द वगळलेल्या तारखेपासून १00 टक्के अनुदान
देण्यात यावे यासह अन्य मागणीला घेऊन आज महाराष्ट्र राज्य (कायम) विना
अनुदानित उच्च माध्यमिक व कमवि शाळा कृती समितीच्या वतीने धरणे देण्यात
आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमूती चौकात उपस्थित शेकडो
शिक्षकांनी मागणीला घेऊन सकाळपासून धरणे दिले.यात राज्याच्या
मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकार्यांमार्फत निवेदन दिले आहे. निवेदनात
नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये कायम विनाअनुदानित उच्च
माध्यमिक शाळा कमवि यांच्या कायम शब्द काढून सन २0१४-१५ साठी लागणारे नियम
व्यय स्वतंत्ररित्या उपलब्ध करून देण्यात येईल. असा निर्णय फेब्रुवारी २0१४
मध्ये घेण्यात आला होता. परंतु अद्यापही तशी पात्र यादी जाहीर करण्यात
आलेली नाही. या शाळांमधील शिक्षकगण १६ वर्षांपासून वेतनापासून वंचित आहेत.
त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. अशा स्थितीत अनुदानपात्र यादी आर्थिक
तरतूद करून जाहीर करावी व शिक्षकांना तात्काळ १00 टक्के वेतन सुरु करावे
अशी मागणी आहे. तसेच जुन्या शिक्षकांवर अन्याय करणार्या कोणतेही शाळांची
संच मान्यता मुल्यांकन तपासणी पात्र यादी जाहीर करावी, कायम विना अनुदानित
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यामधील सेवा वरिष्ठ वेतन योजना,
वेतनवाढ यांच्यासाठी ग्राह्य धरले जावे व अतिरिक्त शिक्षकांना तात्काळ
सेवेत सामावून घेण्यात यावे, वेतनेत्तर अनुदान द्यावे, सन २0१३-१४ व
पूर्वीच्या संच मान्यतेनुसार शिक्षकांना वैयक्तिक मान्यतेसाठी रोष्टरची अट
शिथील करावी, स्वयं अर्थ सहाय्यीत कायदा व धोरण रद्द करून पूर्वीप्रमाणे
अनुदानित धोरण सुरु करावे व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वैयक्तिक
मान्यता देण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे.
धरणे आंदोलनात
जिल्हाध्यक्ष प्रा.शेषराम समरीत, प्रा.सुशिलकुमार कापगते, प्रा.शरद
पाखमोडे, प्रा.ए.व्ही. बावनकर, प्रा.एन.पी. डोंगरे, प्रा.पी.डी. वंजारी,
प्रा.पी.डी. हाडगे, प्रा.एल.बी. पारधीकर, प्रा.एस.एस. कांबळे, प्रा.यु.पी.
रहिले, सुधाकर देशमुख यांच्यासह शेकडो शिक्षक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment